सेवानिवृतांचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य राहील- महावीर माने
सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य राहील – माजी शिक्षण संचालक महावीर माने
कोल्हापूर/प्रतिनिधी
राज्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक ते सर्व सर्व सहकार्य राहील असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक महावीर माने यांनी केले.
कोल्हापूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समितीच्या राज्य अधिवेशन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे मावळते राज्याध्यक्ष विनायक घटे होते.
महावीर माने पुढे म्हणाले सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्यासाठी संघटित लढा देण्याची गरज आहे. शासनाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सकारात्मक भूमिकेतून सोडवणेचे आश्वासन दिले.
अधिवेशनात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवड श्रेणी लागू करून फरक मिळावा, निवृत्ती वेतन पुरेसे व वेळेवर मिळावे, निवृत्ती वेतन अंशराशीकरणाचा पुनःस्थापना कालावधी १२ वर्षाचा करण्यात यावा, सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना खाते प्रमुखांचे ओळखपत्र मिळावे आदी मागण्यांचे ठराव संमत करण्यात आले. तसेच विषय पत्रिकेवरील सर्व विषय सर्वानुमते मंजुर करण्यात आले.
यावेळी पुढील पाच वर्षासाठी संघटनेची नुतन राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ती पुढील प्रमाणे-
राज्याध्यक्ष-सुबराव पवार, राज्य कार्याध्यक्ष- विजय थोरे, राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत धोकटे, राज्य उपाध्यक्ष रामानंद पुजारी, राज्य कोषाध्यक्ष सुनिल जाधव, राज्य सरचिटणीस शहाजी एकशिंगे, राज्य सहसचिव विकास ढवण, संघटक बळीराम मोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य- आर एस पाटील, अनुजा देसाई, दिपाली भोईटे, उषा पाटील, दिलावर बागवान, अनिल जमदाडे, अंकुश चव्हाण, बाजीराव थोरात, रंगराव पाटील.
दरम्यान नुतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राज्यातील सर्व संवर्गातील जि.प. सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी यांनी त्यांचे प्रलंबित प्रश्न लेखी स्वरूपात संघटनेकडे सादर करावेत त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आवाहन नुतन राज्याध्यक्ष सुबराव पवार यांनी केले. तसेच विनायक घटे, सिताराम शिंदे, चंद्रकांत मांडवर यांनी सुरू विचाराचा वारसा आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे चालू ठेवू अशी ग्वाही नुतन अध्यक्ष पवार यांनी दिली.
अधिवेशनच्या सुरूवातीस ज्ञात अज्ञात दिवंगतांना श्रध्दांजली वाहण्यात आली. स्वागत संघटनेचे मावळते राज्य सरचिटणीस चंद्रकांत मांडवकर, प्रास्ताविक कार्याध्यक्ष सिताराम शिंदे यांनी केले तर आभार कोल्हापूर अध्यक्ष मच्छिंद्र कांबळे यांनी माणले.
कार्यक्रमास पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, एस के पाटील, जागर फौंडेशन चे अध्यक्ष प्रा.बी.जी.मांगले, सांगली अध्यक्ष दत्तात्रय बामणे, सातारा अध्यक्ष कृष्णराव कुंभार, शंकर पवार, रंगराव पाटील, रफीक काझी, शारदा वाडकर, प्रमिला माने, कुंडलीक बचाटे, विश्वनाथ कांबळे, शामराव माने, मुबारक शेख, मनोहर चौत्रे, एस टी पांडव तसेच सर्व संवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










