May 14, 2026

विकास तांबे यांची गाव पांढरीशी बांधिलकी- डीवायएसपी आप्पासो पोवार.

0
IMG-20250228-WA0051

विकास तांबे यांची गाव पांढरीशी बांधिलकी-
डीवायएसपी आप्पासो पोवार.

कर्तुत्वातूनच सामर्थ्य निर्माण होते.

भेडसगाव येथे  वतीने गुणीजणांचा सन्मान

भेडसगाव/मारुती फाळके

शाहुवाडी तालुका हा गुणवंत आणि कर्तुत्ववान लोकांचा असून कर्तुत्वातून सामर्थ्य निर्माण होते आणि असे सामर्थ्य निर्माण करणारी माणसं आपल्या मातीला विसरत नाहीत,गावापासून बाहेर गेलेली क्वचित माणसं मागे वळून पाहतात,विकास तांबे यांनी आजही गावपांढरीशी बांधिलकी जपली आहे,अशा संस्कार संंचितामुळे गावगाड्यातील कर्तुत्ववानांच्या पाठीवरती शाबासकीची थाप मिळत आहे असे प्रतिपादन डीवायएसपी आप्पासो पवार यांनी केले.

  ते भेडसगाव (ता. शाहुवाडी )येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज फाउंडेशन व दिवंगत शामराव तांबे प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित पोलीस पाटील, पत्रकार, आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंतांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजश्री छत्रपती शाहू महाराज फाउंडेशन व दिवंगत शामराव तांबे प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विकास तांबे  होते.

पुढे बोलताना आप्पासो पोवार म्हणाले, या फाउंडेशनचे काम आदर्शवत असून समाजातील तळागाळातील घटकांचे कार्याची दखल घेऊन त्यांचा गुण गौरव करून त्यांना यथोचित सन्मानित करते हे समाजाच्या दृष्टीने भाग्याचे असून विकास तांबे जरी मुंबई स्थित असले तरी गावच्या मातीला विसरले नाहीत गावच्या मातीशी त्यांनी आपली नाळ घट्ट ठेवली.

यावेळी बोलताना शाहुवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण म्हणाले प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार वतीने एक प्रेरणा मिळाली. समाजामध्ये कार्यकर्तृत्वाची दखल घेणे हेही महत्त्वाचे असून अशा कार्यक्रमांच्यामुळे कर्तुत्ववान आणि गुणीजनांना प्रेरणा मिळते. तांबे यांनी आपल्या वडिलांचा सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा उत्कृष्ट चालवलेला आहे. यावेळी बोलताना मुख्य आयोजक विकास तांबे म्हणाले, माझे वडिलांचा सामाजिक कार्याचा वसा मी माझ्या तालुक्यासाठी कायमस्वरूपी चालू ठेवणार माझ्या मातीतील गुणवंतांचा सत्कार मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो कारण मी ज्या मातीत जन्म घेतला त्याचे ऋण फेडणे माझे कर्तव्य आहे. गेल्या पंधरा वर्षापासून आमचे फाउंडेशन सामाजिक कार्यासाठी अग्रेसर आहे.

यावेळी पोलीस निरीक्षक विजय घेरडे, जि प सदस्य हंबीरराव पाटील (बापू) ,प्रा .प्रकाश नाईक, पत्रकार आनंदराव केसरे, लाला नाईक, विनोद खिलारे, सुभाष कुंभार, पांडुरंग खोत यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी मंत्रालय सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल दिग्विजय पाटील, प्रमोद पाटील, तसेच तालुक्यातील पोलीस पाटील आणि पत्रकार व गुणीजनांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी शिवाजी पन्हाळे, अभिजीत पाटील, प्रदीप तांबे, राजेंद्र डोंगरे, महेश साळुंखे,मधुकर तांबे ,राजाराम पाटील; महेश पाटील, प्रियांका पाटील,दिपाली गवळी,बिस्मिल्ला वाघारे, रामेश्वरी पाटील, दिपाली घोलप, संजय कांबळे, सदाशिव सुतार आधीसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. स्वागत प्रस्ताविक, सूत्रसंचालन रमेश डोंगरे यांनी केले आभार प्रदीप तांबे यांनी मानले.

फोटो ओळी-भेडसगाव ता.शाहूवाडी येथे शाहू फाउंडेशन व कामगार नेते दिवंगत शामराव तांबे प्रतिष्ठान यांच्या वतीने गुणगौरव कार्यक्रमात बोलताना डीवायएसपी आप्पासो पवार,व्यासपीठावर तहसीलदार रामलिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक विजय घेरडे,विकास तांबे,प्रा.प्रकाश नाईक, राजू डोंगरे आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!