शिक्षणसेवक पद रद्द करा,गोरगरिबांचे शिक्षण वाचवा यासह शिक्षकांच्या अनेक मागण्याचा शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आक्रोश! ‘जुनी पेंशन संघटनेचा लक्षवेधी आक्रोश मोर्चा’
शिक्षणसेवक पद रद्द करा,गोरगरिबांचे शिक्षण वाचवा यासह शिक्षकांच्या अनेक मागण्याचा शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आक्रोश!
‘जुनी पेंशन संघटनेचा लक्षवेधी आक्रोश मोर्चा’
२२०० च्यावर शिक्षकांचा सहभाग
कोल्हापूर/मारुती फाळके
रद्द करा रद्द करा,शिक्षणसेवक पद रद्द करा,
सन १९८२ / ८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करा,गोर गरिबांच्या शाळा बंद करणारा संचमान्यतेचा अन्यायी निर्णय बदला,आश्वासित योजना लागू करा,समान काम समान वेतन अशा अनेक मागण्याचा आक्रोश करत महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेने आज जिल्हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, खाजगी प्राथमिक, महानगरपालिका,नगरपालिका शिक्षक व शिक्षणसेवकांच्या वतीने उपसंचालक कार्यालयावर लक्षवेधी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
दुपारी ३ वाजता आक्रोश मोर्चा टाऊन हॉल महानगरपालिका , बिंदू चौक मार्गे शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडकला. यावेळी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी नंदकिशोर भंडारे यांना शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन मंगेश धनवडे व मोर्चा त सहभागी शिक्षक संघटना नेत्यांनी दिले,यानंतर
मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
या आक्रोश मोर्चात जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना,शिक्षक, शिक्षणसेवक यांनी शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्याचा गजर केला.वेगवेगळ्या मागण्याचे फलक घेऊन मोर्चेकरी सहभागी झाले होते.मोर्चेकर्यांनी हातात घेतलेले विविध मागण्यांचे फलक लक्षवेधी ठरले,महिलांची संख्या लक्षणीय होती.
यावेळी मोर्चात आक्रोश व्यक्त करताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी शासनाला खडे बोल सुनावले ते म्हणाले,समान काम समान वेतन या सूत्रानुसार शिक्षण सेवक पद रद्द होणे आवश्यक आहे. शिक्षण सेवक सारखे वेठबिगारी पद रद्द न झाल्यास राज्यस्तरावर मोठे आंदोलन छेडले जाईल. जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र लढण्यास सज्ज आहे. रणरणत्या उन्हात आज जिल्ह्यातील तमाम शिक्षकांनी आक्रोश व्यक्त करून हा संदेश दिला आहे की येणाऱ्या काळात या दोन विषयांना घेऊन लढाई अधिक तीव्र करण्यात येईल. शिक्षण सेवक पद रद्द करावे, डीसीपीएस व्याज व अनुदान मिळावे, शिक्षकांसाठी आश्वासित या आंदोलनाची दखल घेऊन यथोचित कार्यवाही न झाल्यास भविष्यकाळात राज्यस्तरावरती तीव्र लढा उभा केला जाईल. समान काम समान वेतन आणि सर्वांसाठी एक पेन्शन हे तत्व राबवले गेलेच पाहिजेत. गोरगरिबांचे शिक्षण टिकले पाहिजे यासाठी अखंड महाराष्ट्रात आक्रोश मोर्चाचा जागर केला जाईल.असे ते म्हणाले.
चौकट-१
राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा- अमर वरुटे
समान काम समान वेतन या सूत्रानुसार शिक्षण सेवक पद रद्द होणे आवश्यक आहे. शिक्षण सेवक सारखे वेठबिगारी पद रद्द न झाल्यास राज्यस्तरावर मोठे आंदोलन छेडले जाईल. जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र लढण्यास सज्ज आहे. रणरणत्या उन्हात आज जिल्ह्यातील तमाम शिक्षकांनी आक्रोश व्यक्त करून हा संदेश दिला आहे की येणाऱ्या काळात या दोन विषयांना घेऊन लढाई अधिक तीव्र करण्यात येईल.
अमर वरुटे,शिक्षक बँक संचालक
जिल्हा सल्लागार,जिल्हा नेते
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना
चौकट -२
मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत पाठपुरावा-संतोष गायकवाड- जिल्हा उपाध्यक्ष
आज जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने लक्षवेधी आक्रोश मोर्चा आयोजित केला होता . या मोर्चात शिक्षण सेवक पद कायमचे रद्द व्हावे ,अन्यायकारक संच मान्यता आदेश रद्द व्हावा तसेच ३१ मार्च २०२१ नंतर डीसीपीएस रकमेवर व्याज अनुदान तात्काळ मिळावे, यासह अनेक मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येत मोर्चा संपन्न झाला. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संघटनेच्या वतीने आम्ही पाठपुरावा करत राहू. आणि निश्चितच यातून न्याय मिळवू हा ठाम विश्वास आहे.
– संतोष गायकवाड
जिल्हा उपाध्यक्ष
चौकट -३
शाहूवाडीकरांची एन्ट्री
मोर्चाच्या प्रसंगी टाऊन हॉल बागेत प्रवेश करताना शाहुवाडी तालुका जुनी पेन्शन संघटना तालुका शाखेने शिक्षकांच्या विविध मागण्यांचे फलक अंगात परिधान करत बागेत प्रवेश करताच संपूर्ण मोर्चा समूहाचे लक्ष शाहूवाडीकरांच्या एन्ट्रीवर गेले.प्रत्येकाच्या अंगामध्ये शिक्षकांच्या विविध मागण्यांचे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.सभास्थळी येताना ‘एकच मिशन-जुनी पेन्शन, शिक्षण सेवक पद रद्द करा, समान काम- समान वेतन,सरकारी शाळा वाचल्याच पाहिजेत या घोषणांनी मोर्चेकर्यांनी परिसर दणाणून सोडला. यामध्ये
शिक्षक बँकेचे संचालक शिवाजी रोडे पाटील,सदाभाऊ कांबळे,शाहूवाडी जुनी पेंशन चे अध्यक्ष उमेश कुंभार,तौसिफ पटेल, युवराज काटकर, एम एम गुरव, अमर पाटील, राहुल सातपुते,अमोल कामगुंडा, शंकर देवकते, सचिन भोसले, उमेश काळे, सुनील केंद्रे, राम घोलप,अजिनाथ जाधवर, प्रवीण भोसले, नागनाथ चंनागिरे, शिक्षणसेविका मेघा कुंभार,ज्योती दडमल,अमृता खांडके, स्वप्ना भोज, शिक्षणसेवक शुभम सानप,बालाजी राठोड,अभंग,रवी शिवरकर,महादेव गुंजकर तसेच तालुक्यातील शिक्षक सहभागी झाले होते.
या आहेत आंदोलनातील प्रमुख मागण्या
१) शिक्षण सेवक पद रद्द व्हावे.
२) ०१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना मार्च २०२१ नंतर डीसीपीएस योजनेतील व्याज व अनुदान मिळावे.
३) ०१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जाहिरात व अधिसूचना नियमाचा लाभ व्हावा.
४) १५ मार्च चा संच मान्यतेचा शासन आदेश रद्द व्हावा.
५) सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दुरुस्त व्हावी. शिक्षकांना १०:२०:३० आश्वासित प्रगती योजना लागू व्हाव.
६) अनुकंपा शिक्षकांसाठी टीईटी ची अट रद्द व्हावी.
७) खाजगी शाळेतील मुख्याध्यापकांना स्थगित केलेला अर्जीत रोखीकरणाचा लाभ मिळावा.
८) पगार नियमित वेळेवर व्हावेत.
या मोर्चात सर्व संघटनांचे प्रतिनिधी
या आंदोलनात शैक्षणिक व्यासपीठाचे एस डी लाड,भरत रसाळे,शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख राजमोहन पाटील,शिक्षक संघ थोरात गटाचे रविकुमार पाटील,पुरोगामी चे जिल्हाध्यक्ष एस के पाटील,शिक्षक भारती चे गजानन कांबळे,शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील, संचालक शिवाजी रोडे पाटील, शिक्षक समितीचे अर्जुन पाटील, राजेंद्र पाटील, प्रमोद तोउंदकर, प्रभाकर कमळकर,रामदास झेंडे,राजीव परीट,बाजीराव पाटील,गणपती मांडवकर,
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे चेअरमन सुनील पाटील,शिक्षक महासंघाचे राजेंद्र कोरे,शिक्षक बँकेचे संचालक बाळासाहेब निंबाळकर, अर्जुन पाटील,पद्मजा मेढे ,शिवाजी रोडे- पाटील,गजानन कांबळे शिक्षक संघाचे प्रशांत पोतदार, बाजीराव कांबळे,मारुती दिंडे, शिक्षक समितीचे प्रभाकर कमळकर,राजेंद्र पाटील,राजीव परीट, बाजीराव पाटील, गणपती मांडवकर, सुरेश कोळी सुकुमार मानकर, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन, उपाध्यक्ष विजय कांबळे,राहुल तारळेकर, संतोष आयरे,मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे सरचिटणीस संजय दाभाडे, राजू दाभाडे ,प्राथमिक शिक्षक महासंघाचे सदानंद शिंदे, शिक्षक सेनेचे एम. एन. पाटील ,शिक्षक भारतीचे अमर खोत,तुकाराम चौगुले,नाना कांबळे, पीराप्पा कागले,शहर जुनी पेंशन चे किरण पाडळकर,मयूर जाधव
तसेच जुनी पेंशन संघटनेचे सल्लागार- शिक्षक बँकेचे संचालक अमर वरुटे, श्रीनाथराव पाटील, विजय रामाने,बालाजी पांढरे, निलेश कारंडे,मारुती फाळके, संतोष गायकवाड, विश्वनाथ बोराटे, प्रमोद पाटील, सुनील पाटील, महिला जिल्हाध्यक्ष आरती पोवार, संगीता कडूकर, संजय भोसले, बी एल कांबळे, राहुल कांबळे,सुनील पाटील, प्रकाश गुट्टे, संजय पाटील गजानन कुंभार, अमोल गायकवाड, सतीश रणशिंगे, रामेश्वर विभुते,विशाल देसाई, तालुकाध्यक्ष आनंद पाटील, संतोष जुगळे, अमोल पाटील, संदीप पाटील, विनायक गिरी, मारुती पोवार, दिलीप वाळवेकर, बाबुराव कांबळे, बाबुराव निकम, सत्यवान सोने, दीपक गायकवाड, उमेश कुंभार,राहुल कांबळे, सुशांत भंडारे,सचिन पाटील,विठ्ठल पाटील,राजकुमार शेटे,सागर पाटील,आनंदा घाटगे,रिजवान शेख,मुजाहिद पटेल, मुद्स्सर पटेल,यासिन कन्नूर,समीर नायकवडी तसेच महिला शिलेदार संगीता कडुकर,संध्या महाजन,सादिया मुजावर,जैनब शेख,स्नेहा माळी, संगीता दिवटे,सुहासिनी पाटील, सारिका गंधवाले यासह सागर खाडे पुणे विभागीय अध्यक्ष, अमोल शिंदे जिल्हाध्यक्ष सांगली, दत्तात्रेय क्षीरसागर, मिलन नागणे, अझरुद्दीन जमादार, शिक्षिका,शिक्षणसेवक,शिक्षणसेविका, विविध संघटनांच्या महिला प्रतिनिधी बहुसंख्येने सहभागी झाले होते.मोर्चा यशस्वी करण्यासाठी जिल्हाभरातील जुनी पेन्शन संघटनेच्या शिलेदारांनी महत्त्वाचे योगदान दिले
या आंदोलनाला शैक्षणिक व्यासपीठ अंतर्गत येणाऱ्या शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना, माध्यमिक संघटना, कास्ट्राईब, नपा, मनपा,खाजगी,अनुदानितच्या सर्व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला होता.
यावेळी एस.डी.लाड, भरत रसाळे, सांगली जुनी पेंशन चे जिल्हाध्यक्ष अमोल माने,सागर खाडे, शिक्षक बँकेचे संचालक अमर वरुटे,शिक्षक संघ राज्य संपर्क प्रमुख राजमोहन पाटील,गौतम वर्धन, संघटनेचे उपाध्यक्ष संतोष गायकवाड,कार्याध्यक्ष बालाजी पांढरे,शिक्षणसेवक जमीर तांबोळी,नीलम जाधव, किरण शिंदे यांची भाषणे झाली.
मोर्चात अडीच हजारच्या वर शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पेन्शन संघटनेच्या आजवरच्या मोर्चात हा एक अभूतपूर्व संख्येत झालेला मोर्चा होता.मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी केले.
————————————-
सर्वच शिक्षक संघटनांचा पाठिंबा
या आंदोलनाला शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूर अंतर्गत येणाऱ्या सर्व शिक्षक संघटना,मुख्याध्यापक संघ,शिक्षक संघ – (शि द पाटील,थोरात गट,)शिक्षकअखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना,पुरोगामी शिक्षक संघटना, कास्ट्राइब शिक्षक संघटना, अखिल भारतीय शिक्षक संघ, शिक्षक महासंघ,शिक्षक सेना,महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना,शिक्षक भारती तसेच नपा, मनपा,खाजगी,अनुदानितच्या अशा सर्वच शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला होता.
संपूर्ण मोर्चाचे निवेदन संघटनेचे कोषाध्यक्ष निलेश कारंडे, स्वागत प्रवक्ते प्रमोद पाटील तर आभार राधानगरी तालुकाध्यक्ष मारुती पोवार यांनी मानले.
फोटो ओळी-
१.शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन नंदकिशोर भंडारे यांना देताना एस डी लाड, संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे,अमर वरुटे, विजय रामाणे,निलेश कारंडे,संतोष गायकवाड,मारुती फाळके, विश्वनाथ बोराटे,शिक्षक बँकेचे चेअरमन बाळकृष्ण हळदकर,राजेंद्र पाटील,गजानन कांबळे,सागर खाडे आदी.
२. जुनी पेन्शन संघटनेच्या विराट लक्षवेधी आक्रोश मोर्चात सहभागी झालेले जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले जुनी पेन्शन संघटनेचे तसेच सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षक,शिक्षिका, शिक्षणसेवक शिलेदार आदी.










