भेडसगाव नागरी पतसंस्थेला २ कोटी १३ लाखांचा नफा : हंबीरराव पाटील ३०३ कोटी व्यवसाय करणारी महाराष्ट्रातील नामांकित संस्था
भेडसगाव नागरी पतसंस्थेला २ कोटी १३ लाखांचा नफा : हंबीरराव पाटील
३०३ कोटी व्यवसाय करणारी महाराष्ट्रातील नामांकित संस्था
भेडसगाव/मारुती फाळके:
ग्राहकांच्या मनात पारदर्शी व विश्वासार्ह कारभाराचा वस्तुपाठ निर्माण केलेली सहकारातील मानबिंदू गौरव पुरस्कार प्राप्त, ग्रामीण भागातून शहरी भागाकडे यशस्वी वाटचाल करत ओळख निर्माण केलेल्या भेडसगाव नागरी पतसंस्थेला या आर्थिक वर्षात निव्वळ नफा दोन कोटी तेरा लाख झाला असून महाराष्ट्र कार्यक्षेत्र असणाऱ्या संस्थेच्या पनवेल व साळवण ता.गगनबावडा येथे शाखा सुरू होत असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील- भेडसगावकर यांनी दिली. ते संस्थेच्या ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
ते म्हणाले, संस्थेकडे सध्या मार्च २०२५ अखेर भाग भांडवल व निधी २० कोटी लाख असून गतवर्षीच्या तुलनेत या ठेवीमध्ये १२.४१% वाढ होऊन एकूण ठेवी १८० कोटी २ लाख इतक्या झाल्या आहेत. तसेच कर्ज वाटपामध्ये १६.९८% वाढवून १२३ कोटी ६२ लाख इतके कर्ज वाटप केले आहे. तसेच उल्लेखनीय बाब म्हणजे संस्थेने सध्या ९८% कर्ज वसुली केली असून थकबाकी २% आहे.हे ग्रामीण भागात काम करणाऱ्या संस्थांसाठी आदर्शवत आहे. संस्थेचा नेट एनपीए १.६६% इतका राखण्यात यश मिळवले आहे. थकबाकी २% आहे. संस्थेच्या व्यवसायामध्ये १५% नी वाढ होऊन मिश्र व्यवसाय ३०३ कोटी पर्यंत पोहोचला आहे.
तसेच संस्थेने एकूण ठेवीच्या ४२% म्हणजे ७६ कोटी १२ लाख इतकी गुंतवणूक केली आहे.संस्थेच्या एकूण ठेवी १८० कोटी असून रोख व बँक शिल्लक ५. कोटी,८१ लाख बँकेतील गुंतवणूक ७०.३१ कोटी, ठेवतारण कर्जे ६.३७ कोटी, सोने तारण कर्जे ४७.६१ कोटी अशी एकत्रित रक्कम १३०.१० कोटी असून त्याचे संस्थेच्या ठेवीशी प्रमाण ७२.२७% आहे.यावर्षी सभासदांना १०% प्रमाणे ९७ लाख रुपये डिव्हीडंड वाटप करण्यात येत आहे.
सध्या सहकारात वॉकिंग बिझनेस कमी झाला असून ई व्यवहाराकडे लोकांचा कल वाढला आहे, समाजातील सर्व घटकांचा संस्थेच्या व्यवहारात सहभाग करून आर्थिक वृद्धी करणे,संस्थेचा शाखाविस्तार हे आगामी काळातील संस्थेचे उद्दिष्ट आहे., संस्थानी राष्ट्रीयीकृत बँकेच्या पुढे एक पाऊल टाकून आपला कारभार चालवायला हवा. मुंबई शहरात सध्या ५ शाखा चालू केल्या असून इथेही पुर्णतः ऑनलाइन प्रणाली अवलंबली आहे, ऑनलाईन कर्जवसुली ला याचा फायदा होत आहे.
संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असून हक्काची कर्जे वसूल असून सभासदांच्या अडचणीच्या काळात संस्थेतील कर्ज व इतर योजनांचा सभासदांना फायदा होत आहे. या वर्षात संस्था १०% डिव्हिडंड म्हणजे ९७ लाखाचा डिव्हीडंड वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. लवकरच संस्थेच्या प्रधान कार्यालयाचे बांधकाम सुरू करण्याचा मानस व्यक्त केला.
आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच व्यवसाय वाढीची ध्येय धोरणे निश्चित करून वर्षभर वसुली यंत्रणा गतिमान करून नियोजन आणि सातत्यपूर्ण कामामुळे थकबाकी नगण्य असल्यामुळे संस्था आर्थिकदृष्ट्या भक्कम स्थितीत आहे . यावेळी त्यांनी संस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या ठेवीदार, कर्जदार, सभासदांचे सहकार्याबद्दल आभार मानले.
संस्थेमार्फत मयत सभासदांच्या वारसांना मदत, कर्जदार साहाय्य योजना, आजारी सभासदांना मदत निधी, कर्मचारी व सभासद यांचा मेडिक्लेम व संस्था कर्मचाऱ्यांना दहा लाखाचे विमा संरक्षण, वीज बिल भरणा, ऊस बिले इत्यादी सेवा सुविधा पुरवल्या जातात.
संस्थेच्या कार्याची व प्रगतीची दखल घेऊन शासनाने संस्थेला सहकार विभागामार्फत देण्यात येणारा ‘सहकारातील मानबिंदू गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पाऊले गतिमान करत संस्थेने आरटीजीएस, एनएफटी, मोबाईल अँप, एसएमएस सुविधा उपलब्ध केल्या आहेत. संस्थेला सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा कार्यक्षेत्र दर्जा मिळाला असून अत्याधुनिक सेवा पुरवत २१ शाखांद्वारे महाराष्ट्रात ग्राहकांना सेवा देण्याचे काम संस्था करीत आहे. पुढील आर्थिक वर्षाअखेर २०० कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण करून ३०३ कोटींचा मिश्र व्यवसाय पूर्ण केला आहे. भविष्यात संस्था ५०० कोटी व्यवसाय करण्याचा मानस असल्याचे पाटील यांनी सांगितले.
युवा नेते अमरसिंह पाटील म्हणाले, येत्या मार्चपर्यंत ४०० कोटी ठेवीचा टप्पा पार करण्यासाठी कर्मचारी सभासद यांनी उद्दिष्ट ठेवावे., ३०० कोटी पेक्षा अधिक व्यवसायाकडे वाटचाल करणारी पश्चिम महाराष्ट्रातील एक नामांकित संस्था म्हणून संस्था प्रगतीपथावर आहे. सध्या संस्थेच्या अद्यावत संगणकीकृत २१ शाखा असून मुदत ठेव, लखपती ठेव योजना, धनसंचय योजना अशा अभिनव योजना सुरू करण्यात आल्या आहेत. सामान्य सभासद अंतिम मानून राजकारण विरहित सहकार हिताचेच काम संस्थेत चालते. ग्राहकांनी संस्थेचा कार्यविस्तार लक्षात घेऊन जास्तीत जास्त ठेवी संकलनासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी नारायण पाटील,मारुती फाळके यांची भाषणे झाली.
सभेस व्हा. चेअरमन पांडुरंग डांगे, संग्राम पाटील, संस्थेचे जनरल मॅनेजर संजय पाटील,संचालक मंडळ-आप्पाजी पाटील,आबा लगारे, विठ्ठल कुसळे, इंदुबाई पाटील, शिवाजी पाटील, नंदाताई पाटील, बाळकृष्ण पाटील, महादेव बुवा, विलास यादव, अशोक आडसुर, राजेंद्र कूसळे, तसेच सभासद गणपती पाटील, बाबुराव चौगुले, आबा घाटगे, रामचंद्र नाईक, रवींद्र पाटील, संजय परीट, सचिन वाकडे, लक्ष्मण पाटील, शिवाजी पाटील, एन के पाटील,आनंदा हारूगडे, दगडू कदम, शंकर रावण, विलास परीट, अमर सूर्यवंशी तसेच संस्थेचे विभागीय अधिकारी बाबासो चौगुले, दीपक पाटील, दत्ता पाटील, बाबासो नाईक, विश्वास पाटील, गोविंद पाटील, युवराज पाटील संजय हारुगडे, वसुली अधिकारी भारत माईंगडे, एस के पाटील, नारायण हारूगडे, कृष्णदेव चौगले, तसेच संस्थेचे सभासद नरेंद्र गायकवाड, सागर पाटील, प्रवीण पाटील, अजित पाटील, संभाजी किटे, सुरेश पाटील आदी सभासद, गुणवंत पाल्यांचे पालक उपस्थित होते.
सभेचे प्रास्ताविक अमरसिंह पाटील, नोटीसवाचन शिवराज कुंभार सूत्रसंचालन संपत कोकाटे तर आभार कृष्णदेव चौगुले यांनी मानले.
सभेस सभासद, पाल्य, ग्रामस्थ, विविध गावचे पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट १.-गुणवंतांना शाबासकी!
सभेत सभासदांचे गुणवंत पाल्य, गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेत यशस्वी, विविध क्षेत्रांतील प्राविन्यप्राप्त खेळाडू, उत्कृष्ट पिग्मी एजंट, आदर्श कर्मचारी अशा तब्बल ५०च्या वर गुणिजनांचा संस्थेमार्फत रोख रक्कम, शिल्ड देऊन सन्मान करण्यात आला.
चौकट-२.कर्जदार साहाय्य योजनेचा आधार
संस्थेने सुरू केलेल्या ‘कर्जदार साहाय्य योजनेमुळे तब्बल ९ सभासद कर्जदारांचे ४ लाख ८६ रुपयांची कर्जमाफी करण्यात आली. या योजनेसारख्या मेडिक्लेम,वैद्यकीय मदत म्हणून सभासदांना बायपास सर्जरी १५ हजार,अँजिओप्लास्टी साठी १० हजार,मेजर मेंदूची सर्जरी २० हजार,किडनी ट्रान्सप्लांट २० हजार,कॅन्सर साठी २० हजार यासाठी वैद्यकीय मदत केली जाते. संस्थेने आकर्षक व्याजदराच्या धनसंचय योजना व सभासदहिताच्या योजना संस्था राबवत असल्याचे संस्थापक हंबीरराव पाटील यांनी सांगताच सभागृहाने टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले.
(फोटो ओळी- ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना संस्थेचे संस्थापक चेअरमन हंबीरराव पाटील, सोबत एन के पाटील, अमरसिंह पाटील, संजय पाटील व संचालक मंडळ.)










