२१ सप्टेंबर ला करवीर तालुका प्राथ. शिक्षक सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा
२१ सप्टेंबर ला करवीर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा
सेवानिवृत्ती,आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजन
करवीर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक शिखर संस्था
कोल्हापूर/ प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक शिखर संस्था व सातत्याने शिक्षक सभासदांचे आर्थिक हित व सन्मान करणाऱ्या करवीर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २१ सप्टेंबर रोजी आयोजित केली असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन धनाजी पाटील व व्हा.चेअरमन दीपाली भोईटे यांनी दिली. या कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक सभासद,आदर्श शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार करण्याची परंपरा याही वर्षी संस्थेने जपली आहे. ही सर्वसाधारण सभा २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन , दसरा चौक ,कोल्हापूर येथे होत आहे. तरी संस्थेच्या सर्व सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.
या सर्वसाधारण सभेत सत्कार समारंभाचे अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील असणार आहेत व प्रमुख उपस्थिती आमदार जयंत असगावकर असणार आहेत. सभेस माजी आमदार ऋतुराज पाटील, जि.प. चे माजी अध्यक्ष राहुल पाटील, दिगंबर मेडशिंगे, बी एच पाटील,राजेंद्र सूर्यवंशी , शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, प्रेमदास राठोड, अतुल आकुर्डेकर, अर्चना पाथरे, संदीप भंडारे, आय. सी. शेख,आर व्ही कांबळे, उदय सरनाईक,विश्वास सुतार,प्रकाश आंग्रे,डी ए पाटील, शिक्षक नेते कृष्णात कारंडे, प्राथमिक शिक्षक बँकेचे व्हा. चेअरमन सुरेश कोळी , संचालिका वर्षा केनवडे, शिक्षक समिती संघटनेचे विविध पदाधिकारी, सुकाणू कमिटी व सल्लागार समिती उपस्थिती राहणार आहेत.
यावेळी संस्थेचे संचालक करवीर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा,यशवंत चौगले, सुकुमार मानकर, धनाजी सासने, शशिकांत धुत्रे, चंद्रकांत पाटील, संदीप मगदूम, राजेंद्र तौंदकर दीपक पाटील, प्रताप पाटील, बाळासाहेब कांबळे, सचिन पावसकर, गीता कोळी, संतोष गायकवाड, शब्बीर आवटी हे उपस्थित होते.
*संस्थेची ठळक वैशिष्ट्ये :(2024/25)
• दिवाळी भेट वस्तू.
• विक्रमी 15% डिव्हीडंड( लाभांश )
• ऑडिट वर्ग अ
• सभासदांना निवासाची सोय
• सभासदांचा आदर व सन्मान
• संगणकीकरण
• निव्वळ नफा 30 लाख 97 हजार 241 रुपये .
• सोनेतारण कर्ज सुविधा
• एस एम एस सुविधा
• अपघाती विमा योजना
• कुटुंब कल्याण निधी
• कर्जाचा व्याजदर 9%
• कर्ज मर्यादा 38 लाख
•सभासद संख्या 870 (31मार्च 2025अखेर)
•ठेवीचा व्याजदार 8%










