December 12, 2025

करवीर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचा कारभार सहकाराला दिशा देणारा- आम. जयंत आसगावकर

0
IMG-20250921-WA0033

करवीर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचा कारभार आदर्शवत- आमदार जयंत आसगावकर

अहवाल सालात संस्थेला विक्रमी नफा- चेअरमन धनाजी पाटील

४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

कोल्हापूर/ मारुती फाळके

करवीर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक शिखर संस्था असलेल्या करवीर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा कारभार सभासदाभिमुख आणि सहकाराला दिशा देणारा असून संस्थेने सातत्याने सभासद हित व सभासद सन्मानाचा कारभार केला असल्याचे प्रतिपादन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी व्यक्त केले. ते संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

     ते म्हणाले,करवीर पतसंस्थेने सभासद हित व सभासद सन्मानाची परंपरा कायमपणे जोपासली असून या संस्थेचा आदर्श घेण्यासारखा आहे.या संस्थेचा कारभार सहकारातील अन्य संस्थांना दिशा देणारा असल्याचे गौरवोउद्गार शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी काढले.

प्रारंभी स्वागत व्हा. चेअरमन दीपाली भोईटे यांनी केले. यानंतर प्रास्ताविकपर भाषणात बोलताना संस्थेचे चेअरमन धनाजी पाटील म्हणाले,अहवाल सालामध्ये संस्थेला ३० लाख ९७ हजार २४१ रु चा विक्रमी नफा झाला असून ठेवीमध्ये सातत्याने वाढ होत आहे कर्जाचा व्याजदर कमी करणारी जिल्ह्यामधील ही पहिली पतसंस्था असून लाभांश वाटप, वर्षभरातील अन्य सभासद हिताचे उपक्रम, सेवानिवृत्त सभासद, गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक, पुरस्कार प्राप्त शिक्षक व खेळाडूंचा सातत्याने गौरव केला जातो.

यावेळी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, दिगंबर मेडशिंगे, करवीरच्या गटशिक्षणाधिकारी अर्चना पाथरे, उपशिक्षणाधिकारी उदय सरनाईक,व्याख्याते मधुकर पाटील,गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार यांनी मनोगते व्यक्त केली.

वार्षिक सर्वसाधारण सभेस शिक्षक नेते कृष्णात कारंडे,शिक्षक बँकेचे व्हा. चेअरमन सुरेश कोळी,संचालिका वर्षा केनवडे शिक्षक बँकेच्या संचालिका वर्षा केनवडे,शरद केनवडे,सुकाणू समिती,संघटनेचे पदाधिकारी, डी. ए. पाटील प्रकाश आंग्रे, बाबा धुमाळ, गजानन मोरे आदींसह संस्थेचे संचालक यशवंत चौगले, सुकुमार मानकर, धनाजी सासने, शशिकांत धुत्रे, संदीप मगदूम, राजेंद्र तौंदकर, दीपक पाटील, प्रताप पाटील, बाळासाहेब कांबळे, सचिन पावसकर, गीता कोळी, संतोष गायकवाड, शब्बीर आवटी तसेच सभासद,संस्थेचे सचिव संदीप शिंदे, लिपिक प्रमोद कारंडे  उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय शिंदे तर आभार राजेंद्र तौदंकर यांनी मानले.

चौकट-१
संस्थेला विक्रमी नफा

अहवाल सालामध्ये पतसंस्थेला तब्बल ३० लाख, ९७ हजार २४१ रुपयाचा नफा झाला असून संस्थेने सभासदांना १५ टक्के प्रमाणे भरघोस डिव्हिडंड वाटप केला आहे. वर्षभरात संस्था सातत्याने सभासद हिताचे व संस्था वृद्धीचे उपक्रम राबवत असून सातत्याने संस्थेला प्रगतीपथावर नेण्यांमध्ये सभासदांचा बहुमोल वाटा असल्याचे चेअरमन धनाजी पाटील यांनी सांगितले.

चौकट-२
सामाजिक बांधिलकी जपणारा सातत्यपूर्ण उपक्रम

करवीर ता. प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था ही करवीर तालुक्यातील सर्वात प्रथम स्थापन झालेली पतसंस्था असून या संस्थेच्या नेतृत्व करणाऱ्या मंडळींनी सभासदाभिमुख कारभार करून सातत्याने सेवानिवृत्त शिक्षक,सभासद, गुणवंत विद्यार्थी तसेच आदर्श शिक्षक यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन सामाजिक बांधिलकी जपली असे आमदार जयंत आसगावकर म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

(फोटो ओळी-करवीर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना आ. जयंत आसगावकर,व्यासपीठावर विश्वास सुतार,उदय सरनाईक,मधुकर पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी डी.ए. पाटील, कृष्णात कारंडे,सुरेश कोळी,धनाजी पाटील,दीपाली भोईटे,वर्षा केनवडे आदी.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!