May 14, 2026

शाहूवाडीतील पर्यटन येईल राज्याच्या नकाशावर-विजय पाटील

0
IMG-20220930-WA0001

शाहूवाडीतील पर्यटन येईल राज्याच्या नकाशावर: पोलीस निरीक्षक विजय पाटील

भेडसगाव/मारुती फाळके

पर्यटनासाठी आवश्यक असलेल्या सर्वच बाबतीत आग्रेसर असणाऱ्या शाहूवाडी तालुक्यातील ऐतिहासीक, धार्मिक, साहसी आणि निसर्ग व जंगल पर्यटनाचा आराखडा बनवून त्यादृष्टीने काम केल्यास शाहूवाडी तालुक्यातील पर्यटन राज्याच्या नकाशावर येईल असा विश्वास शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्हाप्रशासनाच्या वतीने जागतिक पर्यटन सप्ताहाच्या निमित्याने गुरुवारी आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. शाहूवाडी तहसिल कार्यालयाच्या सभाग्रहामध्ये जिल्हा पर्यटन समितीचे सदस्य सुखदेव गिरी, शाहूवाडीचे नायब तहसिलदार रविंद्र मोरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी .. यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाहूवाडीतील हॉटेल चालक मालक संघाचे प्रतिनिधी, कृषी पर्यटन केेंद्रचालक, होम स्टे आणि न्याहरी निवास चालकांसह पर्यटन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला नायब तहशिलदार रविंद्र मोरे यांनी पर्यटनदिन सप्ताहा निमित्य आयोजीत कार्यक्रमाचे महत्व सांगितले. तर जिल्हा पर्यटन समितीचे सदस्य सुखदेव गिरी यांनी जगभरात पर्यटन दिनानिमित्य यावर्षी पुनर्विचारात्मक पर्यटन हे घोषवाक्य करण्यात आले असून त्याद्वारे पर्यटन म्हणजे पक्त बाहेरून पिरून येणे असे नाही तर, साहस, नविन बघण्याची उर्मी, हेरीटेज वॉक, साहसी रॅली, पक्षी निरीक्षणासह स्थानिक भागातील वैशिष्ठपुर्ण परिसरातील पर्यटकांचा सहभाग वाढवणे महत्वाचे असल्याचे सांगितले. शाहूवाडी तालुक्यातील पर्यटनदृष्टया विकसित होवू शकणाऱ्या ठिकाणावर विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शाहूवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी .. यांनी शाहूवाडीतील पर्यटनातील स्वच्छता महत्वाची असून स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून ठोस कामे करण्यात येतील अशी माहीती दिली. यावेळी साहसी पर्यटनात काम करणारे स्वराज्य प्रतिष्ठाणचे डॉ.झुंजार माने, पर्यटन आणि निसर्ग अभ्यासक अजिंक्य बेर्डे यांनी शाहूवाडीतील पर्यटनाची वैशिष्ठे सांगून पर्यटनाच्या वाढीस मोठा वाव असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!