March 26, 2026

शिक्षक संघ व समिती ही सख्खी भावंडं-संभाजीराव थोरात

0
IMG_20221003_221404

शिक्षकांच्या प्रश्नासाठी दोन्ही संघटना राज्य पातळीवर एकत्र लढा देणार -संभाजीराव थोरात

       शिवाजीराव रोडे पाटील यांचे कार्य समाजाला दिशादर्शक 

भेडसगाव/ मारुती फाळके

शिक्षक संघ व समिती ही सख्खी भावंडं असून या दोन्ही संघटनांचा जन्म एकाच आईच्या उदरातून झाला असून दोन्ही संघटनाची विचाराची कूस एकच आहे. भविष्यात शिक्षकांच्या प्रश्नासाठी दोन्ही संघटना राज्य पातळीवर एकत्रपणे लढा देणार असल्याचे मत शिक्षक संघाचे राज्य नेते संभाजीराव थोरात यांनी व्यक्त केले. ते सरूड ता.शाहूवाडी येथीलप्राथमिक शिक्षकांची यशवंत सहकारी पतसंस्थे च्या ४१ व्या व शिक्षक नेते शिवाजी रोडे पाटील गृह तारण पतसंस्थेच्या ५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

थोरात पुढे म्हणाले,कोल्हापुरातून जन्म झालेली संघ- समिती ची युती राज्यांत शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हातात हात घालून काम करेल.कोल्हापूर ही पुरोगामी विचारांची भूमी आहे,जे कोल्हापुरात घडते ते राज्याला दिशादर्शक असते,म्हणूनच कोल्हापुरातल्या तमाम सुज्ञ शिक्षक सभासदांनी परिवर्तनवादी विचाराला साथ देऊन शिक्षक बँकेत परिवर्तन घडवले याबद्दल त्यांनी सभासदांना धन्यवाद दिले.शिक्षकांच्या पुढे आज अनेक प्रश्न आहेत.शासन २० पटाखालील शाळा बंद करण्याचा कुटील डाव रचत आहे, कोणे एक पुढारी शिक्षकांच्या घरभाडे वरून रान उठवत आहे,समाजाची दिशाभूल करत आहे,या प्रवृत्तीला रोखण्यासाठी शिक्षकांनी संघटित व्हावे.बहुजनांच्या मुलांचे शिक्षण वाचवण्यासाठी राज्यभर जनजागृती करणार  असल्याचे व शासनाला हा निर्णय मागे घेण्यसाठी भाग पाडणार असल्याचे ते यावेळी म्हणाले, कोल्हापूर शिक्षक बँकेचे नूतन संचालक,शिक्षक नेते शिवाजी रोडे पाटील यांनी अत्यंत संघर्षातून आपली वाटचाल करून ओळख निर्माण केली आहे. नेतृत्व करत असलेल्या या दोन पतसंस्थेच्या कारभाराबद्दल त्यांनी शिवाजी रोडे पाटील व सर्व संचालक मंडळ,कार्यकारिणी,सभासद ,कार्यकर्ते यांचे कौतुक केले.

 

संघटनेत व सहकारात काम करताना शिक्षकी व्रत नेहमी ध्यानात ठेवून कार्यरत रहा.,असा मौलिक सल्ला दिला,तसेच दोन्ही संस्थेच्या नेत्रदीपक प्रगतीबद्दल सर्व संचालक मंडळ व सल्लागार मंडळ यांचे विशेष कौतुक केले.सहकार पारदर्शी व सभासद हिताचा करण्यासाठी अतिशय मौलिक व अभ्यासपूर्ण सखोल मार्गदर्शन केले.आपल्या नेहमीच्या विनोदी व हजरजबाबी रोखठोक शैलीत उपस्थित नेतेमंडळी, शिक्षक बँकेचे तसेच दोन्ही संस्थेचे संचालक तसेच सभासदांना बँक,संस्था तसेच सभासदहिताच्या अनेक महत्वाच्या बाबी सांगितल्या.आदरणीय श्री. संभाजीराव थोरात तात्यांनी आपल्या दीड तासाच्या भाषणात चौफेर व प्रदीर्घ मार्गदर्शन केले.

 

सभेस मार्गदर्शन करताना शिक्षक नेते जोतीराम पाटील म्हणाले, ‘सहकार’ व संघटना समृद्ध करण्यासाठी नेहमी सचोटी,सचेपना,संवाद,जिव्हाळा व कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करावा लागतो. राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडी कोल्हापूर शिक्षक बँकेला नवी दिशा व आयाम देईल असे ते म्हणाले.

यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कोल्हापूर जिल्हा-सरचिटणीस,श्री.सुनिल पाटील यांनी संस्थेच्या गौरवशाली वाटचालीत व दैदिप्यमान प्रगतीमध्ये संचालक व सभासदांच्या अनमोल योगदानाचे विशेष कौतुक केले.

 

यावेळी बोलताना शिक्षक बँकेचे संचालक शिवाजी रोडे-पाटील म्हणाले नेहमीच पाय जमिनीवर ठेवून प्रत्येक शिक्षकाच्या सुख दुख:त सहभागी झालो आहे. शिक्षक सभासदांच्या प्रेमावर दोन्ही संस्था सक्षमपणे व आदर्शवत कारभाराने चालू आहेत,बँकेच्या अपेक्षाबाबत सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही., यावेळी शिक्षक बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. हेमंत भालेकर,सदाशिव कांबळे ,सुनिल सुतार यांनी संस्थेच्या वाटचालीबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

 

दरम्यान पुरोगामी शिक्षक समिती’चे माजी शाहूवाडी तालुका-अध्यक्ष श्री.संजय थोरात यांनी आपल्या कार्यकत्यांसह प्राथमिक शिक्षक संघात जाहीर प्रवेश केला.

 

यावेळी,उपस्थित प्राथ सुकाणू समिती-नेतेमंडळी व शिक्षक बँकेचे चेअरमन, व्हा-चेअरमन व नूतन संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला,तसेच संस्थेचे सेवानिवृत्त शिक्षक सभासद,आदर्श शिक्षक, व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

         संस्थेने यावेळी सलग तिसऱ्या वर्षी सभासदांच्या शेअर्सवर विक्रमी १४ % डिव्हिडंड व रोख-दीपावली-भेट ३% असा एकत्रितपणे १७ % इतका रोख लाभांश वाटप केला.

यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य-कार्याध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी,शिक्षक बँकेच्या सुकाणू समितीचे नेते,रवीकुमार पाटील,रघुनाथ खोत,विलास चौगुले, सुनील पाटील,आनंदराव जाधव,मधुकर येसणे,प्रकाश खोत,बाजीराव पाटील,सुकुमार पाटील,भिवाजी काटकर,.विजय भोसले,.शरद पाटील,प्रकाश सोहनी,भिमराव रेपे,संजय मोळे,शंकर शर्मा,विलास मोरबाळे,.दीपक जगदाळे,संभाजी पाटील,बाळासाहेब वालीकर,अनिल बागडी,.विनायक पोवार,.सचिन कांबळे,आप्पासाहेब शिवणे,अशोक पाटील,गणपती मांडवकर,.पी.के.कांबळे,.संतोष जुगळे,.कुबेर गावडे,.धनाजी पाटील,विश्वास पाटील.तसेच प्राथमिक शिक्षक बँकेचे व्हा. चेअरमन पद्मजा मध्ये,संचालक गौतम वर्धन,बाळासाहेब निंबाळकर,अमर वरुटे,राजेंद्र पाटील,सुनील एडके,गजानन कांबळे, सुरेश कोळी,वर्षा केनवडे, रामदास झेंडे,शिवाजी बोलके, बाबू परीट,नंदकुमार वाईंगडे,सर्व संचालक मंडळ, सल्लागार मंडळ व सभासद बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

सूत्रसंचालन भानुदास सुतार,किरण शिंदे व संजय जगताप यांनी केले. आभार गृहतारण संस्थेचे व्हा-चेअरमन,सर्जेराव काळे यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!