March 26, 2026

भेडसगावचा चौफेर विकास साधणारे सरपंच अमरसिंह पाटील यांचे काम आदर्शवत-माजीआ.सत्यजित पाटील

0
IMG_20221005_094808

सरपंच अमरसिंह पाटील यांचे काम आदर्शवत -माजी आमदार सत्यजित पाटील
भेडसगाव येथे cctv कॅमेरा,१५% मागासवर्ग निधी  व विविध विकासकामांचे लोकार्पण

भेडसगाव/ मारुती फाळके

सरपंच अमरसिंह पाटील यांनी मिळालेल्या संधीचे सोने करत गावाचे प्रश्न समजून घेऊन गाव विकासाचा आराखडा प्रत्यक्ष कृतीत उतरवला यामुळेच भेडसगाव एक आदर्शवत गाव म्हणून नावारूपास आले याची सर्वस्वी श्रेय हे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील व सरपंच अमरसिंह पाटील व त्यांच्या सर्व सदस्यांना जाते असे गौरवोद्गार माजी आमदार सत्यजित पाटील यांनी काढले ,ते भेडसगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने झालेल्या विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.

 

ते पुढे म्हणाले, मनापासून काम केलं तर कोणत्याही जाहिरातबाजीची गरज नाही, तरुण कार्यकर्त्यांनी मिळालेल्या संधीचे सोनं करत स्वतःला सिद्ध केलं म्हणूनच भेडसगाव स्मार्ट ग्राम म्हणून जिल्ह्यात नावारूपास आले आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी गावांचे प्रश्न समजून घेण्यासाठी लोकांत मिसळण्याची आवश्यकता आहे. यावेळी सत्यजित पाटील यांच्या हस्ते गावातील अंतर्गत २५ सीसीटीव्ही कॅमेरे, १५ टक्के मागासवर्गीय निधीतून दलित समाजाला भांडी वाटप,टेबल पंखा व गावातील प्रत्येक कुटुंबाला ओला कचरा व सुका कचरा वेगळ्या करण्यासाठी कचराकुंडी चे वाटप करण्यात आले.

 

सत्यजित पाटील म्हणाले, विचारांशी -कामाशी एकनिष्ठ राहणं ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची नैतिक जबाबदारी असते, सत्ता कोणाचीही असो पण लोककल्याणाची, लोक विकासाची कामं होणे अत्यंत गरजेचे आहे.गावची ग्रामपंचायत ही लोकांच्या विश्वासावर, सहकार्यावर लोकांच्या पाठबळावर चालते. गावामध्ये आता कोणते काम उरले आहे असा प्रश्न लोकांना पडावा असे भेडसगाव आदर्शवत गाव झाले आहे.यावेळी त्यांनी हंबीरराव पाटील यांनी साकारलेल्या राज्यातील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र, ऐतीहासिक भवानी तलावाची प्रदूषणमुक्ति,अद्ययावत सुविधानी परिपूर्ण प्राथमिक शाळा, ग्रामदैवत नीलकंठेश्वरला ” वर्ग पर्यटन स्थळात समावेश केल्याबद्दल हंबीरराव पाटील व अमरसिंह पाटील यांचे कौतुक केले.

माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील म्हणाले, आमच्यावर माजी आमदार बाबासाहेब पाटील, केशव कारभारी यांच्या विचारांचा संस्कार आहे.विकासाला प्राधान्य देत असताना नेहमीच लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य दिले आहे.२०१२ साली आपण दिलेल्या वचन नाम्यानुसार गावविकासाचा आराखडा हातात घेतला. गावाला दिलेला वचननामा आम्ही पूर्ण केला आहे. गावातील दवाखाना,शाळा ग्रामपंचायत, अंतर्गत गल्लीतील रस्ते, शंभर वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक भवानी तलावातील गाळ काढण्यात आम्ही यश मिळवले. ग्रामदैवत नीलकंठेश्वर देवालयाला ” वर्ग पर्यटन स्थळात समावेश करून गावाचा सन्मान केला आहे. भविष्यात आपण अशीच साथ द्यावी,गावात हायटेक सुविधा करण्यावर भर राहील.

 

यावेळी सरपंच अमरसिंह पाटील म्हणाले, भेडसगावातल्या लहान थोरापासून आबाल वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या समस्येला गेल्या पाच वर्षात धावून गेलो आहे. सरपंच पदाच्या खुर्चीची झुल न पांघरता नेहमी लोकात मिसळलो, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, प्रभागानुसार विकासाचा आराखडा डोळ्यासमोर ठेवून गावातील विकासाचे मायक्रो प्लॅनिंग तयार केले. यासाठी शासनाच्या विविध विकास निधीतून आरोग्य व बांधकाम समिती सभापती हंबीरराव पाटील यांच्या मार्गदर्शन व सहकार्यातून गावात कोट्यावधी रुपयांची विकास कामे पूर्ण केली.वाटर एटीएम, डिजिटल ग्रामपंचायत ,ग्रामसचिवालय नूतनीकरण, गावातील अंतर्गत रस्ते, कचऱ्याच्या नियमित उठावासाठी कचरा गाडी, दळप कांडप केंद्र, गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची टाकीची डागडुजी, प्राथमिक शाळा सुशोभीकरण प् नूतन वास्तूत प्राथमिक शाळा, अद्यायावत ई लर्निग साहित्य, अत्याधुनिक सुविधांनी प्राथमिक आरोग्य केंद्र,भवानी तलावाची प्रदूषण मुक्ती, मागासवर्गीय निधीमधून प्रत्येक वर्षी दलित समाजाला 15% फंडातून भांडी वाटप,दलित वस्ती सुधार योजना,शासनाच्या विविध विकास निधीतून लोककल्याणाची अनेक कामे केली आहेत.शासनाच्या घरकुल योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना घराघरापर्यंत पोहचवील्या आहेत. या विकासकामांच्या जोरावरच भेडसगावातील जनता प्रत्येक निवडणुकीत माझ्या पाठीशी राहिली आहे. याबद्दल ग्रामस्थांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

 

यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील,उद्योगपती आप्पासाहेब साळुंखे, आनंदा फाळके यांची भाषणे झाली. यावेळी गावातील बौद्ध समाजाला 15 टक्के मागासवर्गीय निधी मधून भांडी वाटप, 15% मागासवर्गीय निधीतून इतर मागासवर्गीय समाजाला टेबल पंखा वाटप व गावातील प्रत्येक कुटुंबाला ओला कचरा व सुका कचरा वेगळा करण्यासाठी कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले. गावातील अंतर्गत 25 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील, हंबीरराव पाटील,अमरसिंह पाटील व अन्य सदस्यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी पदोन्नती झालेबद्दल निवास कांबळे(महसूल विभाग),सचिन कारंडे(उपकेंद्र सहाय्यक महावितरण) यांचा तसेच सोसायटी चेअरमन लक्ष्मण पाटील, व्हा. चेअरमन आबासो घाटगे,पोलीस पाटील प्रदीप तांबे, शरद नलगे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास ग्रामपंचायत उपसरपंच सुनील पाटील,ग्रा प सदस्य नरेंद्र गायकवाड, जालिंदर मस्कर, गोविंद लगारे, बाळाबाई पाटील, गीता मस्कर,नंदा नलगे तसेच गावातील ज्योतिर्लिंग सेवा संस्थेचे चेअरमन लक्ष्मण पाटील,धोंडीराम पाटील, बाबासो पाटील, धोंडीराम नाईक,धोंडीराम चौगुले,दगडू फाळके,संजय पाटील, आकाराम तांबे, विजय नलगे, तुकाराम पाटील, संदीप पाटील,संदीप कारंडे, प्रशांत नाईक,संजय नाईक, दत्ता पाटील,भारत प्रभावळे,अमर देसाई,प्रकाश लगारे, जयसिंग शेळके,प्रशांत नाईक,राघू फाळके,खंडू फाळके,माखु फाळके,रंगराव कांबळे, सुदाम कांबळे,जगन्नाथ तांबे,चंद्रकांत तांबे,साहेबराव तांबे,यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी साहेबराव तांबे,गंगाराम तांबे,भीमराव फाळके,मानसिंग कांबळे,पांडुरंग पाटील यांनी परिश्रम घेतले.

 

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मारुती फाळके तर आभार ग्रा.प.सदस्य नरेंद्र गायकवाड यांनी मानले.

—————————————————————-

          ग्रामपंचायत निवडणुक लढविणार नाही -सरपंच अमरसिंह पाटील..

       गावच्या राजकारणात तरुण कार्यकर्त्यांना संधी देणार असून तरुणांनी सक्रिय व्हावे,आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सज्ज राहावे,स्वतः ग्रामपंचायत निवडणुक लढविणार नसल्याचे सरपंच अमरसिंह पाटील यांनी सांगून आगामी जिल्हा परिषद किंवा अन्य निवडणुक लढविणार असल्याचे त्यांनी यावेळी संकेत दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!