नवोपक्रम स्पर्धेत सहभागाचे आवाहन डायट प्राचार्य डॉ.आय सी शेख
कोल्हापूर/ मारुती फाळके
राज्यातील शिक्षक व अधिकाऱ्यांच्या सृजनशीलतेला व कल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी पाच गटात ही स्पर्धा होणार आहे.स्पर्धेचे गट- पूर्व प्राथमिक स्तरावर अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका, प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक, विषय सहाय्यक व विशेष साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती व ग्रंथपाल गट तसेच अध्यापकाचार्य व पर्यवेक्षीय अधिकारी अशा गटात ही स्पर्धा होईल या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त अधिकारी,शिक्षक अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक यांनी सहभाग नोंदवून आपले नवोपक्रम 20 नोव्हेंबर पर्यंत डायट कडे सादर करावेत,असे आवाहन कोल्हापूर डाएटचे प्राचार्य डॉ.आय सी शेख यांनी केले आहे.
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2022-23 मध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांनी खाली दिलेली लिंक सोमवार दि.07/11/2022 रोजी सकाळी 11:00 वाजेपर्यंत भरावी.
https://forms.gle/o7gSkb5AUq17sALV7
नवोपक्रम स्पर्धेत सहभागी शिक्षकांसाठी नवोपक्रम लेखन व अहवाल लिंकवर सादर करणेबाबत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे.
असेही प्राचार्य डॉ.आय.सी.शेख
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर यांनी कळवले आहे.










