March 26, 2026

महिला मेळाव्यातून लाभले सुप्त कलाविष्काराचे व्यासपीठ-आशा उबाळे

0
IMG-20230405-WA0006

महिला मेळाव्यातून शिक्षिकेना लाभली नवी ऊर्जा

महिला शिक्षकांना मिळाले सुप्त कलाविष्काराचे व्यासपीठ..

शिक्षक संघाच्या महिला मेळाव्यातून मुक्तव्यक्त होण्याची लाभली संधी.

कोल्हापूर/मारुती फाळके ….

शिक्षक संघाच्या महिला मेळाव्यातून नवीन ऊर्जा लाभली असून महिला शिक्षकांना सुप्त कलाविष्काराचे व्यासपीठ शिक्षक संघाने उपलब्ध करून दिले. शिक्षक संघाच्या या महिला मेळाव्यातून मुक्तव्यक्त होण्याची संधी मिळाली असून अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाची कार्यकुशल राहण्यासाठी गरज आहे ,असे मत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी व्यक्त केले.त्या कोल्हापूर येथील प्राथमिक शिक्षक संघ (शि. द.पाटील) गटाच्या वतीने राम गणेश गडकरी सभागृहात आयोजित महिला मेळाव्यात बोलत होत्या.

     त्या पुढे म्हणाल्या,शिक्षक संघाने महिला मेळाव्यातून महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करण्याचे विलक्षण काम केले आहे. कार्यक्रमास  प्रमुख पाहुणे म्हणून सपना भालेकर, दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी प्रभाकर हेरवाडे, शिक्षक संघाचे राज्य सल्लागार तथा माजी राज्याध्यक्ष राजाराम वरूटे,राज्य कोषाध्यक्ष संभाजी बापट उपस्थित होते.

 

यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील महिला शिक्षिकांनी कराओके गायन, वेशभूषा, नाट्यीकरण, सोलो डान्स, कथाकथन,वैयक्तिक नृत्य,समूह नृत्य असे विविध भारदस्त कार्यक्रम सादर केले.यात जिल्ह्यातील ४५० हुन अधिक महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या. यामध्ये इचलकरंजी नगरपालिकेच्या शिक्षिका शितल कुंभार यांनी ‘अर्धनारीनटेश्वर’ही वेशभूषा व लल्लाटी भंडार हा गोंधळ सादर केला, उदगाव ता. शिरोळ येथील सुरेखा कुंभार आणि त्यांच्या ग्रुपने राजस्थानी गीत व जुन्या गीतांवर ग्रुप डान्स सादर केला.चंदगडच्या १५ ते १६ महिला शिक्षकांनी कराओके समूहगीत,तसेच राधानगरीच्या शिक्षिकेने बाजीराव मस्तानी चित्रपटातील मस्तानीची वेशभूषा सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. यावेळी स्पॉट गेम च्या माध्यमातून प्राविण्यप्राप्त महिलांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.,असे अनेकविध कलाविष्कार या कार्यक्रमातून पाहावयास मिळाले.

 

         कार्यक्रमाचे स्वागत जिल्हा महिला शाखेच्या सचिव स्मिता डिग्रजे, प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष श्वेता खंडेकर तर आभार कार्याध्यक्ष नसीम मुल्ला व कोषाध्यक्ष लता नायकवडे यांनी मानले.मेळावा यशस्वी करण्यासाठी शिक्षक संघाच्या कार्यकारिणी व कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य लाभले., यामध्ये ज्योत्स्ना महात्मे, नीता ठाणेकर, नूरजहा मुलाणी, वर्षा सनगर यांचे सहकार्य लाभले.

 

कार्यक्रमास शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बी एस पाटील कोनवडेकर, माजी संचालक प्रशांत पोतदार, बाजीराव कांबळे,साहेब शेख राजमोहन पाटील, जी एस पाटील, बजरंग लगारे,जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे श्रीकांत चव्हाण, शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष सर्जेराव सुतार, तालुकाध्यक्ष अनिल चव्हाण, मारुती दिंडे, बाबासो साळोखे, संजय ठाणेकर,शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन संभाजी पाटील,संचालक अनिल कंगणे, विजय मालाधारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोगिता महाजन यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!