March 26, 2026

भेडसगाव पतसंस्थेला१कोटी६५लाख नफा-संस्थापक चेअरमन हंबीरराव पाटील 

0
IMG-20230403-WA0003

भेडसगाव पतसंस्थेला १ कोटी ६५ लाख नफा -संस्थापक चेअरमन हंबीरराव पाटील 

सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे दमदार वाटचाल

संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र मंजूर

भेडसगाव/ मारुती फाळके

       ग्राहकाभिमुख पारदर्शी कारभार आणि ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातही दमदार पाऊल टाकलेल्या भेडसगाव नागरी सहकारी पतसंस्थेची सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे यशस्वीपणे वाटचाल सुरू असून २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात संस्थेस १कोटी ६५ लाखाचा नफा झाल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती, संस्थेचे संस्थापक चेअरमन हंबीरराव पाटील -भेडसगावकर यांनी दिली.

 

ते म्हणाले संस्था ठेवीदाराच्या विश्वासात पात्र ठरल्याने आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवीमध्ये १९.०६% वाढ होऊन एकूण ठेवी १४० कोटी ६२ लाख आहेत व कर्ज वाटपामध्ये ११.७७% वाढ होऊन ८८ कोटी ५०लाख इतकी कर्जे वाटप केली आहेत. संस्थेने ९६% कर्ज वसुली केली असून संस्थेचा नेट एनपीए ३% आहे. संस्थेच्या एकूण व्यवसायामध्ये १६.१३% नी वृद्धी होऊन एकूण ठेवी १४०.६२ व ८८.५० कोटी कर्जे असा २२९.१२ कोटीचा व्यवसाय संस्थेने केला आहे. संस्थेने सध्या एकूण ठेवीच्या ४९% म्हणजेच ६८.६३ कोटी इतकी गुंतवणूक इतर बँकात केली आहे.

          पुढील वर्षात संस्था १६५ कोटी ठेवींचा टप्पा पार करण्याचा मानस आहे.संस्थेचे सध्याचे भाग भांडवल व निधी १५ कोटी ७८ लाख असून सभासदांना प्रतिवर्षी १०% लाभांश दिला जातो. मयत सभासदांच्या वारसांना विशेष सवलत,आजारी सभासदांना मदत निधी,संस्था कर्मचारी व सभासद यांना ३ लाखाचा मेडिक्लेम व संस्था कर्मचाऱ्यांचा १० लाखांचा विमा संस्थेने उतरवला आहे. सहकार शताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने ‘सहकाराचा मानबिंदू’ म्हणून या संस्थेला गौरवलेली आहे,आजवर संस्थेला आदर्श पतसंस्था पुरस्कार,बँको अवॉर्ड पुरस्कार मिळालेले आहेत. 

संस्थेमध्ये सध्या RTGS व NFT सुविधा, डिमांड ड्राफ्ट, वीज बिल भरणा सुविधा, विश्वास साखर व उदय साखर कारखाना ऊस बिल वितरण आदी सुविधा उपलब्ध आहेत. संस्थेला संपूर्ण “महाराष्ट्र राज्य” कार्यक्षेत्र वाढ मिळाली असून भविष्यात संस्थेचा शाखा विस्तार, ठेवीमध्ये व कर्जवाटप वाढ ,व्यवसाय वृद्धी यावर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे संस्थापक चेअरमन हंबीरराव पाटील यांनी सांगितले.,यावेळी त्यांनी सभासद,संस्था कर्मचारी,पिग्मी एजंट, ठेवीदार,नियमित कर्ज फेडणारे कर्जदार यांचे अभिनंदन केले.

 

यावेळी भेडसगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच अमरसिंह पाटील,संग्राम पाटील, संस्थेचे व्हा.चेअरमन पांडुरंग डांगे,जनरल मॅनेजर संजय पाटील,शाखाधिकारी गोविंद पाटील, संचालक विठ्ठल पाटील,महादेव बुवा,विलास यादव,बाळकृष्ण पाटील,राजेंद्र कुसळे,जयसिंग लगारे, शामराव कदम,नंदाताई पाटील,इंदूताई पाटील,पतसंस्थेचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!