वर्षाराणी वायदंडे यांची संचालिकापदी निवड
मनपा खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेच्या संचालिकापदी वर्षाराणी वायदंडे यांची निवड
कोल्हापूर/ मारुती फाळके
कोल्हापूर मनपा खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नूतन मराठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वर्षाराणी धोंडीराम वायदंडे यांची बहुमतानी संचालिका पदी निवड झाली. सौ वायदंडे यांनी तब्बल 230 मतदान घेत विक्रमी मताधिक्यानी विजयश्री खेचून आणली.
सौ वायदंडे यांचा असलेला जनसंपर्क,प्रेमळ स्वभाव,अजातशत्रू व्यक्तिमत्व, शिक्षकांच्या सुख दुःखाला धावून जाण्याच्या स्वभावामुळे सभासदांनी सर्वसाधारण महिला प्रवर्गातून त्यांना संचालिकापदी विराजमान केले.
त्यांच्या या यशामध्ये खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेचे सर्वेसर्वा,संस्थापक भरत रसाळे सर यांचे मार्गदर्शन व पाठबळ, सभासदांची बहुमोल साथ,याबरोबरच सौ .वायदंडे यांचे पती कोगील खुर्द जिल्हा परिषद शाळेचे विषयशिक्षक धोंडीराम वायदंडे यांची खंबीर साथ,चिरंजीव तुषार वायदंडे, हर्षल वायदंडे,सर्व कुटुंबीय,नातेवाईक यांचे प्रोत्साहन लाभले.










