March 26, 2026

कायम ठेवीवर ७% व्याज जमा-चेअरमन सुनील एडके

0
IMG-20230402-WA0006

कायम ठेवीवर ७% व्याज जमा, सभासदांना दिलेल्या वचन नाम्याशी कटिबद्ध-चेअरमन सुनील एडके  

कोल्हापूर/प्रतिनिधी

प्राथमिक शिक्षकांची शिखरसंस्था असलेल्या दि प्राथमिक शिक्षक बँकेत जुलै महिन्यात सत्तेवर राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडी च्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने सभासदांभिमुख पारदर्शी कारभार करत सभासदांची आर्थिक उन्नती डोळ्यासमोर ठेवून शिक्षक बँकेत काटकसरीचा कारभार सुरू केला आहे.सभासदांचे आर्थिक हित लक्षात घेवून जाहीरनाम्यात दिलेल्या वचनाप्रमाणे नूतन चेअरमन,व्हा.चेअरमन व सर्व संचालक मंडळांनी निर्णय घेत कायम ठेवीवरील ७% टक्के व्याज खात्यावर जमा केल्याचे शिक्षक बँकेचे चेअरमन सुनील एडके यांनी सांगितले.

सभासदांनी ज्या विश्वासाने सध्याच्या संचालक मंडळास विक्रमी मताधिक्याने निवडून दिले त्या विश्वासास पात्र राहून सदैव सभासदाभिमुख पारदर्शी कारभार करणार असल्याचे व येत्या ५ वर्षात सभासदांच्या सुकानु समितीच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक लाभाचे निर्णय घेणार असल्याचे नूतन चेअरमन सुनील एडके यांनी सांगितले.

यावेळी बँकेचे व्हा.चेअरमन शिवाजी बोलके,माजी चेअरमन अर्जुन पाटील,शिक्षक बँकेचे संचालक साताप्पा पाटील,शिवाजी रोडे, अमर वरूटे,राजेंद्रकुमार पाटील, बाळकृष्ण हळदकर, रामदास झेंडे,बाळासाहेब निंबाळकर, गजानन कांबळे,नंदकुमार वाईंगडे, बाबू परीट, गौतम वर्धन, सुरेश कोळी,संचालिका वर्षा केनवडे, आणि पद्मजा मेढे व सुकानु समितीतील मार्गदर्शक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!