March 26, 2026

मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच!- शिक्षक संघटना समन्वय समिती.

0
IMG-20230315-WA0006

कारवाईची भीती न बाळगता सर्व शिक्षकांनी संपात सहभागी व्हावे कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समिती 

कोल्हापूर : मारुती फाळके
कोल्हापूर प्रेस क्लब येथील कार्यालयात कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत जुनी पेन्शन योजनेसाठी सुरू असलेल्या संपामध्ये सगळया शिक्षक संघटनांचा सक्रिय सहभाग असल्याचे सांगितले. सर्व शिक्षक संघटनेची ऐकी अभेद्य असल्याचे त्यांनी सांगितले.अजूनही संपात सहभागी नसणाऱ्या शिक्षकांनी कारवाईची भीती मनात ना बाळगता संपात सहभागी व्हावे,असे आवाहन केले आहे.

सन 2005 नंतरच्या शासकीय -निम शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना 1882 जुनी पेन्शन योजना लागू करावी हे एकमेव मागणीसाठी राज्यातील राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना तसेच शिक्षक शिक्षकेतर संघटना १४ मार्चपासून बेमुदत संपावर आहेत या संपामध्ये कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक अंतर्गत १७ प्राथमिक शिक्षक संघटना सक्रियपणे शाळा बंदची हाक सहभाग घेतला आहे.यामध्ये जिल्ह्यातील सुमारे सुमारे ५५०० शिक्षक संपात सहभागी झाले आहेत.१४ मार्चपासून संप मोठ्या प्रमाणात सुरू झाला असताना राज्यातील एका ज्येष्ठ शिक्षक नेत्याने संपातून माघार घेतली ही बातमी सोशल मीडिया माध्यमातून जरी पसरली असली तरी त्या संघटनेचे प्रतिनिधी राज्यातील सर्व कर्मचारी संपात सक्रियपणे सहभागी आहेत, या माघार विधानाचा कसलाही परिणाम झालेला नाही .हा संपूर्ण प्राथमिक शिक्षक संघ थोरात गट शाळा बंद करून सहभागी आहेत.जे अजूनही संपात सहभागी नाहीत त्यांना संपात संबंध होण्याचे आवाहन केले असून उद्यापासून तेही संपात सहभागी असतील अशी माहिती कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे नेते राजाराम वरुटे, प्रसाद पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष गौतम वर्धन, सचिव सर्जेराव सुतार यांनी दिली. संपामध्ये जितके दिवस शाळा बंद राहणार तितके दिवस आम्ही सुट्टीत शाळा भरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढणार असल्याची यावेळी सांगण्यात आले. याशिवाय पालकांच्याकडूनही या संपाला पाठिंबा मिळत आहे असे समन्वय समितीने सांगितले.

काल सरकारने संपाचा धसका घेऊन जरी अभ्यास समिती नेमली असली तरी तोपर्यंत जुनी पेन्शन मिळत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. संपात सहभागी कर्मचारी माघार घेण्यासाठी सरकार विविध प्रकारच्या माध्यमातून वापर करून विविध परिपत्रकाचा वापर करत आहे. कर्मचाऱ्यावर दडपण आणत असले तरी कर्मचाऱ्यांनी कुठल्याही पद्धतीने या धमक्यांना घाबरून न जाता हा संप यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी बैठकीस समन्वय समितीचे नेते मोहन भोसले,मार्गदर्शक कृष्णात कारंडे, रघुनाथ खोत,संभाजी बापट, प्रमोद तोंदकर,  रविकुमार पाटील, सुनील पाटील, एस व्ही पाटील, बी एस पाटील,सतीश बरगे,अर्जुन पाटील,सुनील एडके, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे,निलेश कारंडे,विजय रामाणे,मारुती फाळके,बालाजी पांढरे, जिल्हाध्यक्ष संदीप पाडळकर, तुषार पाटील, संजय कुर्डूकर, तानाजी घरपणकर, शिवाजी ठोंबरे,डी पी पाटील, जीवन पाटील, सुकुमार पाटील, नेताजी कमळकर,सुधाकर भाऊ खांबे, संजय दाभाडे,बाजीराव पाटील, सुरेश कोळी, सुरेश कांबळे निवास पाटील, श्वेता खांडेकर आदी, पदाधिकारी उपस्थित होते.

या संपात कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती अंतर्गत सतरा प्राथमिक शिक्षक संघटनांनी सक्रियपणे शाळा बंदची हाक देऊनसहभाग घेतला आहे .

शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी माघार घेत असल्याची घोषणा केली असली तरी सगळा शिक्षक संघटना आणि शिक्षकांचा बेमुदत संपामध्ये सक्रिय सहभाग आहे असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. थोरात यांच्या विधानाचा संपावर कसलाही परिणाम झालेला नाही. आणि होणारही नाही.

हा संप जितके दिवस चालेल तितके दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक शिक्षक संपात एकजुटीने शाळा बंद करून शंभर टक्के सहभागी आहेत.

तसेच जिह्यातील काही शाळेतील शिक्षक शाळेवर जात आहे. त्यांना संपात सहाभगी होण्याचे आवाहन केले असून उद्यापासून तेही संपात
सहभागी होत आहे. अशी माहिती कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक  समन्वय समितीचे मार्गदर्शक नेते  राजाराम वरुटे, प्रसाद पाटील, गौतम वर्धन, सचिव सर्जेराव सुतार सर यांनी दिली आहे.

संपामध्ये जितके दिवस शाळा बंद राहणार आहे तितके दिवस आम्ही सुट्टीत शाळा भरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढणार आहे .त्यामुळे पालकांच्या कडूनही या संपाला पाठिंबा मिळत आहे. असेही समन्वय समितीने सांगितले आहे.

सरकारने संपाचा धसका घेऊन जरी अभ्यास समिती नेमली असली तरी जोपर्यंत जुनी पेन्शन मिळत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहणार आहे .अशी माहिती यावेळी देण्यात आलेली आहे.संपातून कर्मचाऱ्यांनी माघार घ्यावी यासाठी सरकार विविध प्रकारच्या माध्यमाचा वापर करून विविध परिपत्रकाचा वापर करत आहे.कर्मचाऱ्यांवर दडपण आणत असले तरी कर्मचाऱ्यांनी कुठल्याही पद्धतीने घाबरून न जाता हा संप यशस्वी करण्याचे आवाहन  समन्वय समितीने केले आहे.

या बैठकीस समन्वय समितीचे नेते  रघुनाथ खोत, प्रमोद तोंदकर,  संदीप पाडळकर, बी एस पाटील, बालाजी पांढरे, तानाजी घरपणकर, सुकुमार पाटील, नेताजी कमळकर, सुधाकर होनखांबे, बाजीराव कांबळे प्रशांत पोतदार, श्रीकांत वरुटे, संजय दाभाडे, तुषार पाटील, महिला आघाडीच्या श्वेता खांडेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!