March 26, 2026

‘जुनी पेंशन’चा लढा तीव्र करावा लागेल-मंगेश धनवडे

0
IMG-20230207-WA0006

जुन्या पेंशन’साठी वज्रमूठ घट्ट करावी लागेल- मंगेश धनवडे
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार
कोल्हापूर/ मारुती फाळके

आपल्या कामामुळे पदाची ओळख आणि उंची वाढत असते,संघटना मोठी झाली की आपोआप पदाला महत्व प्राप्त होते, यासाठी संघटन वाढवा,संघटना बळकट करा.,भविष्यात जुनी पेंशन पदरात पाडून घ्यायची असेल तर रस्त्यावरची लढाई अधिक तीव्र करावी लागेल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना कोल्हापूरचे नूतन जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी केले ते नूतन जिल्हा कार्यकारिणीच्या निवड समारंभ प्रसंगी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष व सांगली शिक्षक बँकेचे संचालक अमोल शिंदे होते.

धनवडे पुढे म्हणाले, पदवीधर शिक्षक निवडणुकीअगोदर सरकारचे जुन्या पेंशन संदर्भात वक्तव्य वेगळे होते,पण निकालानंतर हे वक्तव्य त्यांना बदलावे लागेल.,यासाठी राज्यभर हा लढा तीव्र करण्यासाठी संघटितपणे आपणाला एकीची मोट बांधावी लागेल.
संघटन चे विभागीय अध्यक्ष सागर खाडे म्हणाले,शासनाची उदासीनता बदलण्याचे सामर्थ्य फक्त आपल्या संघटनेत आहे,यासाठी जास्तीत जास्त कर्मचारी या लढ्याशी जोडा.
शिक्षक बँकेचे संचालक व संघटनेचे मार्गदर्शक अमर वरुटे म्हणाले, जुनी पेंशन संघटन हे राज्यातील बलाढ्य संघटना आहे,केवळ पेंशन संघटना एकसंघ होती म्हणून मला शिक्षक बँकेची उमेदवारी मिळाली आणि माझ्या संघटनेने मला भरभरून दिल्यामुळेच आज मी आपल्यासमोर बँकेचा संचालक म्हणून उभा आहे.,अशीच एकीची वज्रमुठ कायम ठेवली तर आपल्या तरुणांच्या हाती सर्व भविष्य आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना अमोल शिंदे म्हणाले,कोल्हापूर जिल्ह्याला प्रगल्भ नेतृत्व, कर्तृत्व व वक्तृत्व लाभलेले जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे हे राज्य संघटन ला अभिमान वाटावा असे व्यक्तिमत्त्व आहे,स्वार्थ आणि हव्यास याला तिलांजली दिलेले हे नेतृत्व कोल्हापूर च्या संघटन ला अधिक बळकट करेल असा मला ठाम विश्वास वाटतो.

जिल्हा मीडिया प्रमुख मारुती फाळके आपल्या मनोगतात म्हणाले,त्याग आणि समर्पण याचा प्रत्यय मंगेश धनवडे यांच्याकडे पहिल्यानंतर येतो.,जिल्ह्यात प्रस्थापित संघटनांच्या वरचढ काम या संघटनेचे असून लाभलेले नेतृत्व आश्वासक व कृतिशील आहे.,बऱ्याच अंशी नेतृत्व हे स्वतःला संधी शोधत असते परंतु संयम व कामाचा धडाका असलेले धनवडे हे कार्यकर्त्याला मोठे करणारे नेतृत्व आहे,भविष्यात सरकारला जुनी पेंशन चा निर्णय घ्यावाच लागेल.यासाठी संघटन बळकट करण्यासाठी प्रत्येकाने शिलेदारांची शृंखला वृद्धिंगत करावी असे फाळके म्हणाले.,यावेळी राज्य सहकोशाध्यक्ष श्रीनाथ पाटील,आरती बुवा,विजय रामाणे, आदींची भाषणे झाली.

यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना,कोल्हापूरच्या जिल्हा कार्यकारणी निवडीचा कार्यक्रम अतिशय खेळीमेळीत संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून विभागीय अध्यक्ष सागर खाडे, राज्यसह कोषाध्यक्ष श्रीनाथराव पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे,नेताजी भोसले व जिल्ह्याच्या १२ तालुक्यातुन शेकडोंच्या संख्येने संघटन चे शिलेदार उपस्थित होते.

यावेळी कार्यतत्पर जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांच्या नेतृत्वातच पेन्शनचा लढा अधिक तीव्र करण्यावर सर्वांचे एकमत झाले. त्यानुसार पुढील कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

जिल्हा मार्गदर्शक:—राहुल कांबळे,संजय भोसले, बि. एल. कांबळे, शिक्षक बँकेचे संचालक,पन्हाळ्याचे माजी अध्यक्ष अमर वरुटेजि

जिल्हाध्यक्ष:-मंगेश धनवडे, सरचिटणीस:- विजय रामाने कार्याध्यक्ष:- बालाजी पांढरे,.कोषाध्यक्ष:- निलेश कारंडे,. जिल्हा उपाध्यक्ष:-विश्वनाथ बोराटे, संजय पाटील,गजानन कुंभार,अमोल गायकवाड,.जिल्हा प्रवक्ता:- प्रमोद पाटील, सतीश रणसिंगे,.सहसचिव:- महादेव कोयले,सहकार्याध्यक्ष:- प्रकाश भोसले,सहकोषाध्यक्ष:- रामेश्वर विभुते,

मीडिया प्रमुख:- मारुती फाळके,कार्यालयीन चिटणीस:- सनी सुतार,

संपर्क प्रमुख:- प्रशांत काळे, नितीन जगताप, नितीन गोरे, सुरेश देशमुख,.

जिल्हा संघटक:-
रमेश मेढेवाड, उमेश काळे,
राम खोत,जनार्दन ओंकार,.जिल्हा प्रसिद्धी प्रमुख:-कृष्णात कांबळे, विलास तोडकर, सुनील शिरसाठ, रॉबर्ट बारदेस्कर,.

दरम्यान मीटिंगमध्ये संघटनेच्या महिला आघाडीची ही निवड करण्यात आली. यामध्ये..महिला अध्यक्षा:- आरती पोवार ,सरचिटणीस:- संगीता कडूकर,कार्याध्यक्षा:-ज्योती बामणे,कोषाध्यक्षा:- सुहासिनी पाटील,जिल्हा उपाध्यक्षा:- क्षमा जाधव,अमृता पाटील,अर्चना निळकंठ,शिलप्रभा पवार,. जिल्हा संघटक:- सारीका पाटील, मंगल सुतार,बिस्मिल्ला मुजावर, स्मिता शेटकर,.

जिल्हा प्रसिद्धी प्रमुख:- रुपाली सुतार,रेश्मा पोटे,अस्मिता साबळे,.याचबरोबर जुनी पेन्शनचा लढ्यामध्ये सर्व शासकीय कर्मचारी विभाग समाविष्ट करून घेण्याच्या हेतूने काही विभागप्रमुखांची ही नेमणूक करण्यात आली. त्यामध्ये

माध्यमिक शिक्षक विभाग प्रमुख: मदन देसाई,ग्रामसेवक विभाग प्रमुख:- राम हरी वरकले,रामकृष्ण वाघमारे,
तानाजी पाटील,.
मनपा विभाग प्रमुख: सुवर्णा शिरतोडे,
खाजगी प्राथमिक विभाग प्रमुख:-रमेश दराडे,.यांची एकमताने निवड करण्यात आली. यामध्ये काही तालुक्यांच्या कार्यकारणी निवडीनंतर जिल्हा कार्यकारणी विस्तार अजून करण्यात येणार आहे. असे जिल्हाध्यक्ष धनवडे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हातकणंगले तालुकाध्यक्ष दीपक गायकवाड यांनी तर आभार जिल्हा कोषाध्यक्ष निलेश कारंडे यांनी मांनले. यावेळी जिल्ह्यातून सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष, सरचिटणीस आणि पेन्शन शिलेदार बंधू-भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!