अर्णव पाटील ची विविध स्पर्धा परीक्षेत उत्तुंग भरारी.
अर्णव पाटील ची विविध स्पर्धा परीक्षेत उत्तुंग भरारी.
भेडसगाव/मारुती फाळके
शिंपे ता.शाहुवाडी येथील व म.न.पा प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर जाधववाडी कोल्हापूर क्र. ३२या शाळेचा विद्यार्थी अर्णव सुकेश पाटील याने इयत्ता ५ वी मध्ये घेण्यात आलेल्या गणित प्रज्ञाशोध परीक्षेत गोल्ड मेडल तसेच मंथन स्पर्धा परीक्षेत (राज्यात पाचवा), गणित प्राविण्य परीक्षेत यश (जिल्ह्यात ३रा). छ.राजर्षी शाहू शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्तीधारक आणि ऑल इंडिया सैनिक स्कूल-प्रवेशपात्र. अशा विविध स्पर्धा परीक्षेतून उज्वल यश संपादन केले.
या यशात वर्ग शिक्षिका सौ.नूरजहाॅ खतीब मॅडम, सौ वृषाली आडके मॅडम तसेच आई प्राथमिक शिक्षिका ललिता पाटील व वडील प्राथमिक शिक्षक सुकेश पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक प्रतापसिंह निकम यांच्याकडून प्रेरणा मिळाली. समाजाच्या विविध स्तरातून अर्णवचे कौतुक होत आहे.










