शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटना मजबूत करा-आ.जयंत आसगावकर
म.रा.प्राथमिक शिक्षक संघ करवीर शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न,
माजी राजाध्यक्ष व राज्य सल्लागार राजाराम वरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन कार्यकारिणी निवड
कोल्हापूर/मारुती फाळके
संघटनेच्या माध्यमातूनच प्राथमिक शिक्षकांचे असंख्य प्रश्न सुटले आहेत, भविष्यात संघटना मजबूत केल्याशिवाय पर्याय नाही. यासाठी संघटना प्रबळ करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटना मजबूत करा असे आवाहन आमदार जयंत आसगावकर यांनी केले ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ करवीर तालुका नूतन कार्यकारिणी निवड व करवीर तालुका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या नूतन संचालकांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते. फुलेवाडी रिंग रोड येथील मनोहर कोतवाल नगर येथील सांस्कृतिक हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमांमध्ये नूतन पदाधिकारी निवडी करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शामराव जाधव गुरुजी होते.
आसगावकर म्हणाले, प्राथमिक शाळातून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पुरेशी शिक्षक संख्या असणे आवश्यक आहे, यासाठी रिक्त असलेल्या शिक्षकांचा जाग्या तात्काळ भरणे गरजेचे आहे. शासनाने शाळांच्या भौतिक सुविधाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.प्रश्न मांडत असताना मी प्राथमिक व माध्यमिक असा कधीच भेदभाव केलेला नाही. शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवण्यासाठी संघटनांची एकजूट कायम राहणे महत्त्वाचे असल्याचे आसगावकर यांनी सांगितले.
यावेळी बोलताना शिक्षक संघाचे माजी राज्याध्यक्ष व सल्लागार राजाराम वरुटे म्हणाले, संघटनेच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवलेले आहेत., आजवर शिक्षक संघाच्या माध्यमातून शिक्षकांच्या हिताची अनेक कामे मार्गी लावली आहेत.,यामध्ये सातवा वेतन आयोग निश्चिती,सेवा पुस्तक अद्ययावत करणे, एमएस-सीआयटी वसुली- स्थगिती आणि पाठपुरावा,चटोपाध्याय व निवडश्रेणी मंजूर करणे,प्रॉव्हिडंट फंड प्रकरणी फरक बिले, शिक्षक पगार, पंचायत समिती स्तरावरील विविध कामे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे., तसेच संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी- शिक्षकांसाठी वेळोवेळी नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. शिक्षकांच्या सर्वच प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली शिक्षक संघ ही महाराष्ट्रातील अभेद्य आणि मोठी पाठबळ असणारी संघटना आहे असेही ते म्हणाले.
यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बी.एस. पाटील- कोनवडेकर, सुकाणू समिती सदस्य रवींद्र नागटिळे,राजेंद्र जुगळे,शिक्षक बँकेचे माजी चेअरमन प्रशांत पोतदार,बाजीराव कांबळे यांची भाषणे झाली.शिक्षक संघाचे मावळते करवीर तालुकाध्यक्ष मारुती दिंडे यांनी संघटना कार्याचा आढावा घेतला तर पतसंस्थेचे चेअरमन संभाजी पाटील यांनी पतसंस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. करवीर तालुका शिक्षक शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्थेच्या नूतन संचालकांचा सत्कार आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.,
कार्यक्रमास सरचिटणीस डी.पी. पाटील, कार्याध्यक्ष भैरवनाथ शिंदे, कोषाध्यक्ष सर्जेराव सुतार, जिल्हा नेते दा. श. सुतार,राजाराम कारखान्याचे नूतन संचालक शिवाजी रामा पाटील, दिलीप बच्चे, वसंत जोशीलकर, रवींद्र नागटिळे, राजू जुगळे, उत्तम सुतार, वसंत जाधव, मारुती गुरव, शिक्षण बँकेचे माजी चेअरमन राजमोहन पाटील, बजरंग लगारे, प्रशांत पोतदार, बाजीराव कांबळे, साहेब शेख, दिलीप पाटील,जी एस पाटील, शिवाजी पाटील,नामदेव रेपे, पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाडळकर,सदिया मुजावर,कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे संचालक श्रीकांत चव्हाण, माजी संचालक बंडोपंत संकेश्वरे,अशोक संकपाळ,शंकर भोई, आनंदा बेडेकर,राजाराम शिर्के,जिल्हा महिला संघाच्या अध्यक्षा श्वेता खांडेकर, सरचिटणीस स्मिता डीग्रजे, लता नाईकवडी, कोषाध्यक्ष नसीम मुल्ला, तालुकाध्यक्ष उत्तम पाटील, अनिल चव्हाण, तुकाराम राजुगडे,मायकेल फर्नांडिस, राजेंद्र मांडेकर, बाबा साळोखे, मदन कांबळे, पी.एस. पाटील, तानाजी धारपवार, संतोष भोसले, राजेंद्र पाटील (कोल्हापूर मनपा).,
करवीर पतसंस्थेचे चेअरमन संभाजी पाटील,व्हा.चेअरमन ज्योस्ना महात्मे,संचालक बाजीराव पाटील, धोंडीराम पाटील, अनिल कंगने,संभाजी पाटील, संतोष कांदळकर, प्रकाश निकम,विजय मालाधारी, वर्षा सनगर, नुरजहा मुलानी, भिवाजी लोखंडे, नीता ठाणेकर, नामदेव पाटील, सचिव अमोल लगारे,अमृत काटे,मोहन कोळी, महावीर कांबळे, पंढरीनाथ काशीद, उत्तम पोकर्णेकर ,दिलीप जाधव, पांडुरंग कुंभार, लक्ष्मण निकम, नामदेव कुंभार आदी सर्व शिक्षक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुकाणू समिती सदस्य राजू जुगळे, रविंद्र नागटिळे, शिक्षक बँक माजी चेअरमन बाजीराव कांबळे, प्रशांत पोतदार यांनी मनोगते व्यक्त केली.
त्रैवार्षिक अधिवेशनात निवडण्यात आलेली नूतन तालुका कार्यकारिणी.
पुरुष तालुका कार्यकारिणी.
अध्यक्ष-
मा.साताप्पा चौगले
सरचिटणीस-
विजयकुमार केंद्रे
कार्याध्यक्ष-
राजेंद्र कांबळे
कोषाध्यक्ष-
भिमराव देशमुख
महिला कार्यकारिणी
अध्यक्षा-
सौ शुभांगी मेथे पाटील
सरचिटणीस-
सौ रुपाली पाटील
कार्याध्यक्ष-
अश्विनी परिट
कोषाध्यक्ष-
मनिषा एकशींगे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मारुती दिंडे यांनी तर आभार संभाजी पाटील यांनी मानले.










