March 26, 2026

म.रा.प्राथमिक शिक्षक संघ करवीर शाखेचे आज त्रैवार्षिक अधिवेशन

0
IMG-20230502-WA0003

म.रा.प्राथमिक शिक्षक संघ करवीर शाखेचे आज त्रैवार्षिक अधिवेशन

कोल्हापूर/मारुती फाळके

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा करवीरचे त्रैवार्षिक अधिवेशन व करवीर तालुका शिक्षक शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्थेच्या नूतन संचालकांचा सत्कार आज दि २ मे २०२३ रोजी मनोहर कोतवाल नगर सांस्कृतिक हॉल बोंद्रे नगर रिंग रोड फुलेवाडी कोल्हापूर येथे होत असल्याची माहिती महाराष्ट्र शिक्षक संघाचे माजी राज्य अध्यक्ष तथा सल्लागार राजाराम वरुटे यांनी दिली.,

 

ते म्हणाले आजवर शिक्षक संघाच्या माध्यमातून शिक्षकांच्या हिताची अनेक कामे मार्गे लावली आहेत., यामध्ये सातवा वेतन आयोग निश्चिती,सेवा पुस्तक अद्ययावत करणे एमएस-सीआयटी वसुली- स्थगिती आणि पाठपुरावा,चटोपाध्याय व निवडश्रेणी मंजूर करणे,प्रॉव्हिडंट फंड प्रकरणी फरक बिले, शिक्षक पगार, पंचायत समिती स्तरावरील विविध कामे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे., तसेच संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी- शिक्षकांसाठी वेळोवेळी नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. सन २०२०-२१ सालात निवडले गेलेल्या करवीर कार्यकारणी शाखेची मुदत संपल्यामुळे नूतन कार्यकारिणी निवड या कार्यक्रमात करणार येणार आहे., या कार्यकारणी पदासाठी ज्यांना अर्ज करावयाचे आहेत त्यांनी वेळेत अर्ज करावेत.

दरम्यान करवीर तालुका शिक्षक शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्थेची 2022 ते 27 कालावधीतली पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे या संस्थेच्या नूतन संचालकांचा सत्कार समारंभ देखील आयोजित केला आहे.,या कार्यक्रमासाठी शिक्षक संघाच्या सर्व सभासद कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे नेते माधवराव पाटील, केशवराव जाधव राज्याध्यक्ष,लायक पटेल राज्य सरचिटणीस, लोमेश वराडे राज्य कार्याध्यक्ष, संभाजी बापट राज्य कोषाध्यक्ष,राज्य सल्लागार दि.रा.भालतडक, बाळासो काळे, वसंतराव हारगुडे, तुकाराम कदम, विजय बहाकर सौ स्मिता सोहनी हे राज्य संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत असेही ते म्हणाले.

 

यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बी. एस.पाटील कोनवडेकर, सरचिटणीस डी.पी. पाटील, कार्याध्यक्ष भैरवनाथ शिंदे, कोषाध्यक्ष सर्जेराव सुतार, जिल्हा नेते दा. श. सुतार,राजाराम कारखान्याचे नूतन संचालक शिवाजी रामा पाटील, दिलीप बच्चे, वसंत जोशीलकर, रवींद्र नागटिळे, राजू जुगळे, उत्तम सुतार, वसंत जाधव, मारुती गुरव, शिक्षण बँकेचे माजी चेअरमन राजमोहन पाटील, बजरंग लगारे, प्रशांत पोतदार, बाजीराव कांबळे, साहेब शेख, दिलीप पाटील,जी एस पाटील, शिवाजी पाटील,नामदेव रेपे, कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे संचालक श्रीकांत चव्हाण, जिल्हा महिला संघाच्या अध्यक्षा श्वेता खांडेकर, सरचिटणीस स्मिता डीग्रजे, लता नाईकवडी, कोषाध्यक्ष नसीम मुल्ला, तालुकाध्यक्ष उत्तम पाटील, अनिल चव्हाण, तुकाराम राजुगडे,मायकेल फर्नांडिस, राजेंद्र मांडेकर, बाबा साळोखे, मदन कांबळे, पी.एस. पाटील, तानाजी धारपवार, संतोष भोसले, राजेंद्र पाटील (कोल्हापूर मनपा), किरण दिवटे (इचलकरंजी न पा),बी एल कांबळे(गडहिंग्लज न पा),अशोक हेरवाडे(कागल न.पा.)आदी कार्यकर्ते उपस्थित होते.,कार्यक्रमास संघप्रेमी सर्व शिक्षक कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ(शि.द. पाटील गट) करवीर शाखेने कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!