March 26, 2026

अ.भा.शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संयोगिता महाजन

0
IMG-20230501-WA0008

अ.भा.शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संयोगिता महाजन 

कोल्हापूर/ प्रतिनिधी

अ.भा.शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी   अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे साहित्य संमेलन ऐतिहासिक करवीर नगरमध्ये दिनांक 2 मे 2023रोजी जैन बोर्डिंग दसरा चौक येथे सम्पन्न होत असून संमेलनाच्या अध्यक्षपदी संयोगिता महाजन यांची निवड झाली आहे.

शाहू जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित्ताने करवीर नगरीत शिक्षक साहित्य संमेलन भरवले जात आहे.समाजातील सर्व घटकांशी शिक्षकांचा सहज संबध येतो आणि त्याचे प्रतिबिंब साहित्यातील लेखनात उमटते.म्हणूनच कोल्हापुरातील शिक्षक साहित्य चळवळ वाढली पाहिजे यासाठी शिक्षक साहित्य संमेलन घेण्यात येत आहे असे जिल्हाध्यक्ष संयोगिता महाजन यांनी स्पष्ट केले.
या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर,श्री राजेंद्र मुठाणे सर यांचा भव्य सत्कार आयोजित केला आहे.संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे खास बाल साहित्यिक काव्यवाचन,शिक्षक साहित्यिक कथाकथन, गझलमुशायरा,काव्यमैफिल आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्र शासन साहित्य पुरस्कार प्राप्त डॉ.श्रीकांत पाटील सर,ज्येष्ठ साहित्यिक डॉ संजीवनी तोफखाने,श्री तानाजी आसबे,राज्याध्यक्ष नटराज मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे.तरी सर्व रसिकांनी साहित्य संमेलनाच्या पर्वणीचा आनंद घ्यावा असे संयोजकांच्यावतीने अहवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!