जुनी पेन्शन संघटनेचे २०ऑक्टोंबर रोजी धरणे आंदोलन-मंगेश धनवडे
जुनी पेन्शन संघटनेचे २० रोजी धरणे आंदोलन..
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी जुनी पेन्शन संघटना आक्रमक- जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे
कोल्हापूर/ मारुती फाळके
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत जिल्हा परिषदेकडे वारंवार अवगत करूनही शिक्षकांच्या प्रश्नांच्या कडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे, याबाबत लक्ष वेधण्यासाठी २० ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्हा परिषद समोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी कोल्हापूर टाईम्स 24 शी बोलताना सांगितले.
ते म्हणाले डिसेंबर 2022 पर्यंत बारा वर्षे पूर्ण होणारे शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मागणी करून जवळजवळ एक वर्षाचा कालावधी होऊन गेला, परंतु अद्यापही ते मंजूर झालेले नाहीत. प्रशासनाच्या प्रत्येक टेबलवर विहित मुदतीत एखादे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना प्रस्ताव मागणी करून, अधिकृत पत्राद्वारे सूचित केलेली कागदपत्रे आणि त्रुटी काढली नंतरची कागदपत्रे जमा करून ही वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर झालेले नाहीत.
आपल्या जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकाचा व बदली होऊन गेलेल्या शिक्षकाचा डीसीपीएस हिशोब R- 3 फॉरमॅट मध्ये पाठवणे,ठेवणे.,तसेच आंतरजिल्हा बदलीने गेलेल्या शिक्षकाचा हिशोब R 3 फॉरमॅटमध्ये जिल्हा परिषदेचे पाठवणे आवश्यक असताना सुद्धा वारंवारी मागणी करूनही प्रत्यक्ष कारवाई होताना दिसत नाही ,त्यामुळे एनपीएस मध्ये रकमा वर्ग करण्यास विलंब तर होतच आहे त्यासोबत कर्मचाऱ्याच्या व्याजाचे देखील नुकसान होत आहे, त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला होणारी एन पी एस मधील कपात त्याच महिन्यात प्रत्येक शिक्षकाच्या अकाउंटला जमा होणे आवश्यक असताना सुद्धा यामध्ये अनियमितता दिसून येते.
सद्यस्थितीत जून, जुलै ऑगस्ट या तीन महिन्याची कपात अजूनही खात्यात जमा झालेली नाही; त्यामुळे होणाऱ्या व्याजाच्या नुकसानास कोण जबाबदार?याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. शिक्षण सेवक नियमितीकरण होऊन एक वर्षाचा कालावधी होऊन गेला परंतु प्रत्येक बांधवाला देय असलेला फरक अजूनही मिळालेला नाही.,मेडिकल बिले, वरिष्ठ वेतन श्रेणी, फरक बिले, सातव्या वेतन आयोगाच्या फरकातील रक्कम गेले दोन वर्षापासून जिल्हा परिषद प्रशासनाकडे पेंडिंग आहेत.,इतर जिल्ह्यांना वेळोवेळी अनुदान मिळते मग कोल्हापूर जिल्ह्यात उचित कार्यवाही होताना दिसून येत नाही. मयत झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे शालेय शिक्षण विभागाच्या शासन आदेशानुसार फॅमिली पेन्शन प्रस्ताव तयार करणेबाबत तालुक्यांना सूचना देण्यात याव्यात, त्याचबरोबर बहिस्थ शिक्षण सुट्टीच्या कालावधीतच पूर्ण केले जाते मग बहिस्थ पद्धतीने शिक्षण घेत असताना पूर्वपरवानगीची अट शिथिल करण्यात यावी., शाळेची लाईट बिले ग्रामपंचायतीच्या निधीतून भरण्यात यावीत, याबाबत चौदावा वित्त आयोगातून बिल भरण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांचे पत्र असताना सुद्धा अजूनही ग्रामपंचायती याबाबत ठोस कार्यवाही करताना दिसत नाहीत.
जिल्हा परिषद मधील रिक्त असलेल्या सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, सर्व विषयांचे विषय शिक्षक पदावर तात्काळ पदोन्नती प्रक्रिया घेण्यात यावी. डीसीपीएस योजनेतील सन 2021 ते सन 2020 पर्यंत व्याज मागणी करण्यात यावे.जी रकमा एनपीएस मध्ये ट्रान्सफर झाल्या तरी व्याज जमा करण्याची लेखी हमी जिल्हा परिषदेने घ्यावी, याचबरोबर शालेय कामकाजात मुख्याध्यापकांच्याकडे दररोज प्रशासकीय कामांची मागणी होत असताना त्याचा अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर परिणाम होताना दिसतो.,यासाठी मुख्याध्यापकाकडे प्रशासकीय कामाची मागणी करण्यासाठी ठराविक कालावधी -दिवस निश्चित करावा, याचबरोबर जिल्हा परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे प्राथमिक शिक्षकांच्याही क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात या आणि अन्य मागण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी सांगितले.
यावेळी संघटनेचे राज्य सहकोषाध्यक्ष श्रीनाथराव पाटील,राज्य समन्वयक प्रकाश गुट्टे, मार्गदर्शक राहुल कांबळे, संजय भोसले, बी. एल. कांबळे, शिक्षक बँकेचे संचालक अमर वरुटे, जिल्हा सरचिटणीस विजय रामाने,कार्याध्यक्ष बालाजी पांढरे,कोषाध्यक्ष निलेश कारंडे, महिला जिल्हाध्यक्ष आरती पवार, महिला जिल्हा सरचिटणीस संगीता कडूकर,प्रकाश भोसले, प्रमोद पाटील, विश्वनाथ बोराटे, संजय पाटील, गजानन कुंभार ,दीपक गायकवाड,सनी सुतार,जिल्हा मीडिया प्रमुख मारुती फाळके, प्रशांत काळे,कृष्णात कांबळे, सुनील शिरसाठ, सागर पाटील,सुहासिनी पाटील यांच्यासह विविध तालुक्यांचे तालुकाध्यक्ष उमेश कुंभार, दिलीप वाळवेकर, संतोष जुगळे,दीपक गायकवाड, राजकुमार शेटे,जहूरअहमद मुल्ला,सतिश रणशिंगे,गोपाळ लोंढे,राहुल जाधव,
चंद्रकांत कुंभार यांच्यासह जुनी पेन्शन संघटनेचे असंख्य शिलेदार उपस्थित होते.
या आंदोलनासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील जुनी पेन्शन संघटनेच्या शिलेदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे, जिल्हा सरचिटणीस विजय रामाने यांनी केले आहे.










