गझलनवाज भीमराव पांचाळे यांची कोल्हापूरात मैफल
गझलनवाज भीमराव पांचाळे यांची कोल्हापूरात मैफल
प्रयोदी फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन, संगीतसूर्य केशवराव भोसले येथे होणार शब्दसुरांची भावयात्रा
कोल्हापूर/मारुती फाळके :
गझलनवाज भीमराव पांचाळे यांची तब्बल वीस वर्षानंतर कोल्हापुरात गझल मैफल होत आहे. येथील प्रयोदी फाऊंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी, (१७ ऑक्टोबर) गझलनवाज पांचाळे यांची ‘शब्दसुरांची भावयात्रा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होत आहे.
गझलप्रेमीसाठी ही एक अनोखी पर्वणी ठरणार आहे. गझलनवाज पांचाळे यांचा कोल्हापुरात वीस वर्षानंतर कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्याशी सुरेल गप्पा, गझलांचे सादरीकरण यामुळे दसरा सणाचा आनंद आणखी द्विगुणित होणार आहे. मराठी आणि ऊर्दूतील नजाकतदार रचना, मनाला भिडणारे सादरीकरण हे पांचाळे यांच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असते.
दरम्यान प्रयोदी फाऊंडेशनतर्फ विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम होतात. दसऱ्याच्या मुहूर्तावर करवीरकरांना वेगळया कार्यक्रमाचा आस्वाद लुटता यावा म्हणून गझलनवाज पांचाळे यांच्या गझलांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रयोदी फाऊंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ही शब्दसुरांची भावयात्रा प्रेक्षकासाठी मोफत आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका उपलब्ध आहेत. प्रेक्षकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन फाऊंडेशनच्या अध्यक्षा योगिता कोडोलीकर व डॉ. प्रवीण कोडोलीकर यांनी केले आहे.
हा कार्यक्रम मोफत आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे सकाळी ९ ते १२ आणि सांयकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत उपलब्ध आहेत. ज्यांना या कार्यक्रमाच्या प्रवेशिका हव्या आहेत. त्यानी 9860919486 या मोबाईल नंबर वरती संपर्क करावा असं आवाहनही त्यांनी केले आहे.










