बालवयातच स्पर्धा परीक्षा पाया आवश्यक-आ.ऋतुराज पाटील
स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी स्पर्धा परीक्षेतील यश महत्त्वाचे- आमदार ऋतुराज पाटील
कोल्हापूर/मारुती फाळके :
सध्याच्या स्पर्धेच्या यूगात टिकण्यासाठी बालवयातच स्पर्धा परिक्षेतील यश महत्त्वाचे आहे. यश संपादन केलेले हे विद्यार्थी भविष्यात स्पर्धा परीक्षेत सहज यशस्वी होतील असे प्रतिपादन करवीर दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार ऋतुराज पाटील यांनी केले.महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना शहर शाखा कोल्हापूर च्या वतीने आयोजित केलेल्या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी व मार्गदर्शन शिक्षक्ष यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील म्हणाले महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासोबत विद्यार्थ्यांसाठी व समाजासाठी कार्य करणारी पुरोगामी शिक्षक संघटना कार्यरत आहे. आतापर्यंत पुरग्रस्त मदत, कोवीड रूग्ण मदत, गंभीर आजारी विद्यार्थ्यांना मदत, निराधार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व अशा अनेक सामाजिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम पुरोगामी शिक्षक संघटनेने सातत्याने केले आहे.
महापालिका शिक्षण समिती प्रशासन अधिकारी एस.के.यादव म्हणाले, ‘ शिक्षकांनी अविश्रांत घेतलेल्या परिश्रमामुळे यावर्षी महापालिका शाळांतील तब्बल ९२ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनले असून पुढीलवर्षी नक्की शतक पूर्ण होईल.
पुरोगामी शिक्षक संघटनेचे शहर अध्यक्ष विलास पिंगळे यांनी बोलताना महापालिका शाळांतील शिक्षकांचा पगार ५०-५० टक्के होत असून पगारासाठीचे अनुदान १०० टक्के शासनाकडूनच मिळावे यासाठी आमदारांनी पाठपुरावा करावा.
यावेळी खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे नेते भरत रसाळे, शिक्षक महासंघाचे अध्यक्ष रांजेंद्र कोरे, पुरोगामीचे जिल्हाध्यक्ष एस के पाटील व उद्योगपती प्रशांत वाकडे, शिक्षिका पुष्पा गायकवाड यांची भाषणे झाले.
दरम्यान शिष्यवृत्ती धारक ९२ विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास द्रोणाचार्य पाटील, संतोष आंबेकर, प्रकाश गावडे, आनंदा पाटील, अरूण सुनगार, सुजाता पोवार, स्मिता कारेकर, गीता कुंभार, संजीवनी व्हरगे, दिपक कुंभार, कृष्णात पाटील, प्रभाकर लोखंडे, शिवाजी गुरव, विठ्ठल देवणे, मनिषा गुरव, रश्मी मनुगडे आदी शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
मिनाक्षी लोखंडे व शिवशंभू घाटे यांनी सूत्रसंचालन केले. स्मिता कारेकर यांनी आभार मानले.










