March 26, 2026

युवा उद्योजक सुशील भोसले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमानी साजरा

0
IMG-20231015-WA0016

युवा उद्योजक सुशील भोसले याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमानी साजरा

कोल्हापूर/ मारुती फाळके-

           कोल्हापुरातील युवा उद्योजक सुशिल शिवाजी भोसले हे दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक संस्थांना मदत करतात . यावर्षी त्यांनी हॅडिकॅप्ट विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या समर्थ विद्यालय उचगाव या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .स्वाती प्रमोद उपाध्ये व हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ट कोल्हापूर या संस्थेच्या सचिव कु रेखाताई मुतालीक देसाई यांचेकडे १० हजार रुपयचा धनादेश तसेच मतिमंद विद्यार्थ्यासाठी कामकरणाऱ्या चेतना विकास मंदिर शेंडपार्क या संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष श्री . पवन खेबूडकर सर व अधिक्षक श्री .कृष्णात चौगले सर यांचेकडे १० हजार रुपयचा धनादेश देण्यात आला . यावी दोन्ही शाळांतील ९०० विद्यार्थ्यांनाही खाऊ दोन्ही शाळेसाठी २० हजार रुपयांची मदत दिली आहे .

 

अवास्तव खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपणारे युवा उद्योजक सुशील भोसले यांनी तसेच यावेळी सामाजिक बांधिलकी म्हणून C. P .R . हॉस्पिटल परिसरातील सुरु असणाऱ्या नंदबन फौडेशन मार्फत गरीबाना पोटभर जेवण म्हणून शिवथाळी दिली जाते त्या गोर गरीबाला माझा कष्टाचे चार घास जावेत या भावनेतून त्याने याही फौडेशन साठी १० हजार मदत दिली तो प्रत्येक वर्षी आपल्या वाढदिवसाईतकी रक्कम रंजल्या गांजल्याना अनाथाना गेली ५वर्षे मदत करत . ३० व्या वाढदिवसा निमित्य ३० हजार रुपय ची मदत खऱ्या गरजवंतपर्यत पोहचली याचे आत्मिक समाधान असल्याचे त्यानी मत व्यक्त केले तसेच हाच संदेश नवीन तरून पिडीने द्यावा असे मत त्याने व्यक्त केले.

 

यावेळी त्यांचे वडील कोल्हापूर महानगर पालिका खाजगी प्राथामिक शिक्षक पतसंस्था चेअरमन शिवाजी भोसले सर, शिक्षक नेते खाजगी प्राथमिक शिक्षक समिती राज्याध्यक्ष भरत रसाळे सर ,सुशिलची पत्नी सौ संज्योती सुशिल भोसले ,खा प्राथ शिक्षण समिती विभागीय अध्यक्ष महादेव डावरे सर ,सरस्वती सावंत विद्यामंदिरचे मुख्याध्यापक व पतसंस्था सचिव शिवाजी सोनाळकर , सुर्वेनगर प्रभागाचे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत खतकर, हरिश सलगर ,सलमान शेख ,अक्षय कांबळे दोन्ही शाळांचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!