May 14, 2026

भेडसगाव नागरीच्या मुंबईत लवकरच ३ शाखा-संस्थापक हंबीरराव पाटील

0
IMG-20231027-WA0032

भेडसगाव नागरीच्या मुंबईत लवकरच ३ शाखा – संस्थापक चेअरमन हंबीरराव पाटील

मोबाईल अँप,सभासद- कर्मचारी यांचा वैद्यकीय विमा, दीपावली निमित्त मुदत ठेव या अभिनव योजना

संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र दर्जा 

भेडसगाव/मारुती फाळके

अल्पावधीत ग्राहकांच्या मनात पारदर्शी व विश्वासार्ह कारभाराचा वस्तुपाठ निर्माण केलेली,बँको गौरव पुरस्कार, महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्याने सहकारातील मानबिंदू गौरव पुरस्कार देऊन गौरवलेली भेडसगाव नागरी पतसंस्थेच्या लवकरच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांमध्ये कल्याण, मानखुर्द,विरार या ठिकाणी नव्या ३ शाखा सुरू करत असल्याची माहिती भेडसगाव नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन,कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील- भेडसगावकर यांनी दिली.

 

ते म्हणाले, पारदर्शी कारभार,चोख व्यवस्थापन, व्यवसायवृध्दी, ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यामुळे भेडसगाव पतसंस्था नावारूपास आली आहे.यापूर्वी मुंबईत डिलाईल रोड,कोपरखैराणे या २ शाखा यशस्वीपणे सुरू आहेत,मुंबईत ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद यामुळे नव्या ३ शाखा सुरू करत आहे.आजवरच्या अनेक नामांकित संस्था या शहराकडून ग्रामीण भागाकडे येतात पण भेडसगाव पतसंस्था ही एकमेव संस्था ग्रामीण भागातून शहराकडे यशस्वी आगेकूच करत असलेली एकमेव पतसंस्था आहे.सुसज्ज, अद्ययावत असलेल्या दर्जाच्या शाखा, ग्राहकाभिमुख व्यवहार, सचोटीच्या कारभारावर सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे दमदार वाटचाल सुरू केली असून सध्या संस्थेकडे स्वतःचे भक्कम भागभांडवल आहे.

संस्थेला सध्या संपूर्ण महाराष्ट्राचा कार्यक्षेत्राचा दर्जा मिळाला असून संस्थेचे सध्याचे भाग भांडवल १६ कोटी ८१ लाख, ठेवी १४८ कोटी १० लाख पैकी कर्जेवाटप १०७ कोटी ६० लाख, गुंतवणूक रोख व बँक शिल्लक ६२ कोटी ६२ लाख असून ३१ मार्च २०२३ अखेर संस्थेला निव्वळ नफा १ कोटी ७३ लाख झाला आहे. सतत ऑडिट वर्ग ‘अ’ असून निव्वळ एन पी ए ३.८% आहे, संस्थेमध्ये सध्या एसएमएस बँकिंग सुविधा, आरटीजीएस, एनएफटी बँकिंग, सुविधा, सभासदांना वैयक्तिक वैद्यकीय मदत, मोबाईल ॲप तसेच दीपावलीनिमित्त संस्थेची मुदत ठेव नावाची नवीन योजना सुरू झाली असून ४४४ दिवसांसाठी ९.२५ % व्याज दराने ठेवीवरती व्याज मिळणार आहे., या योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा.

अल्पावधीतच ३०० कोटी व्यवसायाकडे वाटचाल करणारी पश्चिम महाराष्ट्रातील एक नामांकित संस्था म्हणून संस्था प्रगतीपथावर आहे.,सध्या संस्थेच्या अद्यावत संगणकीकृत १८ शाखा असून मुदत ठेव अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे.,तसेच भविष्यात संस्थेचा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात शाखाविस्तार, व्यवसायवृध्दी यावर लक्ष केंद्रित असल्याची माहिती संस्थापक चेअरमन हंबीरराव पाटील यांनी दिली.,यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन पांडुरंग डांगे,युवा नेते अमरसिंह पाटील,संग्राम पाटील, सर्जेराव पाटील,बाळासाहेब पाटील, गणपती पाटील, आप्पासो साळुंखे,संस्थेचे संचालक जयसिंग लगारे, बाळकृष्ण पाटील, विलास यादव, राजेंद्र कुसळे, नंदाताई पाटील, विठ्ठल पाटील, महादेव बुवा, इंदुबाई पाटील, शामराव कदम, संस्थेचे जनरल मॅनेजर संजय पाटील, संस्था अधिकारी नारायण पाटील, गोविंद पाटील, बाबासो चौगुले, बाबासो पाटील,संपत कोकाटे,शिवराज कुंभार, बाबासो नाईक,दीपक पाटील,संजय हारुगडे,भरत माईंगडे,सुनील तांबे, मानसिंग शेळके,सागर पाटील,प्रशांत नाईक,संदीप कारंडे, विनोद पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!