May 14, 2026

सातत्यपूर्ण व्यवसायवृद्धी व आधुनिकतेचा स्वीकार-कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती गृहतारण संस्था

0
IMG-20231029-WA0031

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती गृहतारण संस्थेच्या आकर्षक ठेव योजनांचा लाभ घ्या– संस्थापक सुरेश कांबळे

अल्पावधीत संस्थेची गरूडभरारी

सातत्यपूर्ण व्यवसायवृद्धी व आधुनिकतेचा स्वीकार

कोल्हापूर/मारुती फाळके

ट्रस्ट -ट्रुथ -अँड -डेव्हलपमेंट ‘हे ब्रीदवाक्य स्वीकारून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती गृहतारण पतसंस्थेने ग्राहकांचा विश्वास संपादन करत गरुड भरारी घेतली आहे. संस्थेच्या आकर्षक ठेव योजना यामध्ये मुदत ठेव, रिकरिंग ठेव, पिग्मी ठेव, सेव्हिंग ठेव या सर्व प्रकारच्या ठेवीला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. विविध ठेव योजनेवर आकर्षक व्याज दिले जाते. दिपावलीपर्यंत या ठेव योजना चालू असतील, ग्राहकांनी या ठेव योजनेचाा लाभ घ्यावा. ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर येत्या आर्थिक वर्षात संस्थेची आर्थिक उलाढाल २५० कोटीपर्यंत पोहचेल,ग्राहकांनी संस्थेच्या आकर्षक योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापक चेअरमन सुरेश कांबळे यांनी केले आहे.

यावेळी कोल्हापूर टाइम्स २४ शी बोलताना चेअरमन कांबळे म्हणाले, ‘सभासदांना केंद्रस्थानी ठेवून संस्थेने विविध योजना आखल्या आहेत. यामध्ये कर्ज योजना, संपूर्ण कोअर बँकिग प्रणालीचा समावेश आहे. संस्थेत गेल्या आर्थिक वर्षात १०५ कोटींची उलाढाल झाली. विजयादशमीनिमित्त संस्थेच्या पाचही शाख ठेव संकल्पनासाठी चालू होत्या. लोकांचा प्रतिसाद पाहता ठेव योजना दिपावलीपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा. संस्थेची सेव्हिंग खात्यावर सात टक्के व्याजाची नवीन योजना आहे. दीपावलीपर्यंत ठेवीसाठी १५ महिन्यापुढे १०.२५ टक्के व्याजदराच्या योजनेला मुदतवाढ दिली आहे. संस्थेने पुढील पाच वर्षासाठी नियोजन आराखडा तयार केला आहे. संस्थेतर्फे सभासदांना शेअर्स रकमेवर दहा टक्के लाभांश देण्यात येणार आहे.

खास दसरा दिपावली निमित्त ठेवीवरती १०.२५% तसेच ज्येष्ठ नागरिकासाठी १०.७५%,तसेच सेविंग ला ७% व्याजदर,पिग्मी कमिशन ४%, रिकरिंग बारा महिन्याकरिता ९% व्याजदर अशा आकर्षक योजनाचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आव्हान संस्थापक चेअरमन सुरेश कांबळे यांनी केले आहे. सध्या कोल्हापूर जिल्हा गृहतारण पतसंस्थेच्या कोल्हापूर शहरात मुख्य शाखा देवकर पानंद,शाहूपुरी ३ री गल्ली त्यानंतर इतर तालुक्यात कागल, गडहिंग्लज, मुदाळतिटा तसेच प्रस्तावित इचलकरंजी,कळे, भोगावती या ठिकाणी शाखा सुरू करण्याचा मानस आहे.सोने तारण,प्लॉट तारण यावरती संस्थेमध्ये आकर्षक कर्ज योजना सुरू असून याचाही ग्राहकांनी फायदा घ्यावा.संस्थेची सध्याची सांपत्तीक स्थिती व्यवहार १०५ कोटी असून २७ कोटींच्या ठेवी असून,यात सातत्याने वाढ होत असून ऑडिट वर्ग ‘अ’असून निव्वळ एनपीए २% तसेच सभासद संख्या ‘अ’वर्ग व ‘ब’वर्ग ५२०० असून सध्या संस्थेमध्ये एकूण ७५ कर्मचारी कार्यरत आहेत., एकूण कर्ज वाटप २४.३० कोटी केले असून संस्थेचे सध्याचे भाग भांडवल ९० लाख आहे. संस्थेने सध्या अद्ययावत तंत्रज्ञान स्वीकारून कोअर बँकिंग एनएफटी, आरटीजीएस, ऑटो डेबिट, क्यूआर कोड, आयएफसी कोड या माध्यमातून नाविन्याचा स्वीकार करत,स्पर्धा युगात वेगळेपण जपले आहे. तसेच तारण कर्ज ,प्रॉपर्टी कर्ज ,सोने तारण,प्लॉट तारण अशा अनेक कर्ज सुविधा सुरू आहेत.

कोविड सारख्या आव्हानात्मक काळात संस्थेने सुरुवात करून आज अखेर पारदर्शी आणि काटकसरीचा कारभार करत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. ग्राहक- सभासदांच्या मध्ये आर्थिक साक्षरता निर्माण होऊन त्यांची आर्थिक उन्नती साधावी या हेतूने संस्थापक सुरेश कांबळे यांनी या संस्थेची स्थापना केली. यापूर्वी ते शिक्षक बँकेमध्ये संचालक म्हणून देखील कार्यरत होते. अडचणीत असणाऱ्या शिक्षक बँकेला उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी त्यांनी त्या काळात महत्वाचे योगदान दिले होते. सध्या संस्थेला कोल्हापूर शहरात आणि ग्रामीण भागातही वाढता प्रतिसाद मिळत असून संस्थेचे सध्या २०० कोटी ठेवींचे उद्दिष्ट असून आर्थिक उलाढाल २५० कोटी च्या वर आहे. तसेच संस्था सध्या बदलत्या तंत्रज्ञांनाचा अवलंब करून ‘डोअर स्टेप सुविधा’ ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असून दिवसेंदिवस ग्राहकांचा प्रतिसाद संस्थेकडे वाढत आहे.,असेही सुरेश कांबळे म्हणाले.

            यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन कपिल पवार,संचालक पांडुरंग पाटील, शंकर पाटील,डी.डी. पाटील, एकनाथ पवार,तानाजी धारपवार, मीना गारे,कल्पना येसने, गुंगा पाटील, जहांगीर मुलांनी, माया कांबळे, रावसाहेब पाटील, एम. एस. चव्हाण तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋतूपूर्ण कांबळे, जनरल मॅनेजर मनोहर पाटील व कर्मचारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!