प्राथमिक शिक्षक बँकेला बँको पुरस्कार
प्राथमिक शिक्षक बॅंकेला बँको पुरस्कार,
खर्चास फाटा देऊन पोस्टाने स्वीकारला पुरस्कार
कोल्हापूर /मारुती फाळके:
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची शिखरसंस्था ओळख असणाऱ्या दि प्राथमिक शिक्षक बँकेच्या कामकाजाचा बँको ब्ल्यू रिबन पुरस्कारांनी गौरव झाला आहे. आर्थिक वर्षाच्या कालावधीतील बॅँकेच्या कामगिरीची दखल घेऊन या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
बँकेचे चेअरमन राजेंद्र पाटील म्हणाले, ‘बँकेत सत्ता परिवर्तन झाल्यापासून सभासद हिताचा व काटकसरीचा कारभाराला प्राधान्य दिले आहे. सभासदांच्या हिताचे कामकाज हे आमचे धोरण आहे. यंदा सभासदांना पाच टक्के लाभांश दिला आहे. बँकेचे यापूर्वीचे चेअरमन अर्जुन पाटील, सुनील एडके यांच्या कालावधीतील सभासदांचा विश्वास सार्थ ठरविणारा कामकाज झाला. माजी चेअरमन एडके यांच्या चेअरमनपदाच्या कारकिर्दीत या पुरस्कारासंबंधीची प्रक्रिया झाली होती. त्या आर्थिक वर्षातील बँकेच्या कामकाजाची दखल घेऊन बँको पुरस्कारांनी गौरविले आहे.
दरम्यान दमण येथे पुरस्कार वितरण समारंभ झाला. दरम्यान प्रवास शुल्क व अन्य खर्चाचा विचार करुन संचालक मंडळाने पुरस्कार वितरण समारंभाला न जाता हा पुरस्कार टपालाने स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवला. आणि त्यानुसार मानचिन्ह व प्रमाणपत्र बँकेतच मागवून घेतले. नुकताच हा पुरस्कार बँकेला मिळाला आहे. याप्रसंगी चेअरमन राजेंद्र पाटील, व्हाईस चेअरमन अमर वरुटे, संचालक अर्जुन पाटील, सुनील एडके, शिवाजीराव रोडे- पाटील, रामदास झेंडे, बाळकृष्ण हळदकर, सुरेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम, अकौटंट संतोष काळे, आदी उपस्थित होते.










