राजर्षी शाहू गव्हमेंट सर्व्हन्ट्स बँकेच्या अध्यक्षपदी अतुल जाधव तर उपाध्यक्ष अजित पाटील
राजर्षी शाहू गव्हमेंट सर्व्हन्ट्स बँकेच्या अध्यक्षपदी अतुल जाधव तर उपाध्यक्षपदी अजित पाटील
कोल्हापूर/मारुती फाळके
शतकोत्तर महोत्सवी वाटचाल करीत असलेल्या कोल्हापूर येथील राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हनट्स को.ऑपरेटिव्ह बॅंकेच्या अध्यक्षपदी अतुल जाधव तर उपाध्यक्षपदी अजित पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी सभाध्यक्ष मा.प्रेरणा शिवदास सहायक निबंधक,सहकारी संस्था कोल्हापूर यांना सर्वांची ओळख करून दिली, त्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये अतुल जाधव यांचे नाव अध्यक्षपदासाठी रवींद्र पंदारे यांनी सुचवले, त्यास मधुकर पाटील यांनी अनुमोदन दिले, उपाध्यक्ष पदासाठी अजित शंकर पाटील यांचे नाव विलास कुरणे यांनी सुचवले त्यास रमेश घाटगे यांनी अनुमोदन दिले.
नूतन अध्यक्ष अतुल जाधव यांनी आपल्या मनोगतांमध्ये सभासदांनी दाखवलेल्या विश्वासास सार्थ आणि कटिबद्ध राहून बँकेच्या प्रगतीसाठी नेहमीच कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी बिनविरोध निवडीबद्दल अध्यक्ष अतुल जाधव,उपाध्यक्ष अजित पाटील यांनी सर्व संचालक,सभासद यांनी सोपवलेल्या जबाबदारीचे सर्वतोपरी पालन करीत उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी बँकेचे ज्येष्ठ संचालक रवींद्र पंदारे यांच्या हस्ते सभाध्यक्ष सहकारी निबंधक प्रेरणा शिवदास, नूतन चेअरमन अतुल जाधव,व्हा.चेअरमन अजित पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या निवडीवेळी बँकेचे संचालक रवींद्र पंदारे,शशिकांत तिवले, मधुकर पाटील, रोहित बांदिवडेकर,विलासराव कुरणे, रमेश घाटगे, संचालिका हेमा पाटील,मनोज रेणके,संजय खोत, किशोर पवार, अरविंद अहिरे प्रकाश पाटील उपस्थित होते. शेवटी आभार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी मानले.










