संदीप जंगम यांच्या संवाद शास्त्र पुस्तकाचे प्रकाशन
संदीप जंगम यांच्या ‘संवादशास्त्र’ पुस्तकाचे अ. भा. ग्राहक पंचायत चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणभाई शहा यांच्या हस्ते प्रकाशन
कोल्हापूर/मारुती फाळके
अ.भा. ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र चे प्रांत अध्यक्ष,उचगाव व्यापारी असोसिएशनचे व मणेर मळा उचगाव येथील वारणा बझार चे संचालक संदीप जंगम यांच्या संवादशास्त्र पुस्तकाचे प्रकाशन अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणभाई शहा यांच्या हस्ते ओझर ता.जुन्नर येथे शानदार समारंभात नुकतेच पार पडले.
संवाद हा मानवी जीवनाचा अमूल्य भाग आहे, संवाद असेल तर जीवन व्यवहार प्रभावीपणे पार पडतील,सामाजिक संघटन,दैनंदिन जीवन व्यवहार समृद्ध होण्यासाठी संवादशास्त्र या पुस्तकाची गरज आहे असा विचार जंगम यांनी या पुस्तकात मांडला आहे.
जंगम हे उचगाव येथील वारणा बझारचे संचालक असून ग्राहक चळवळीमध्ये २७ वर्ष व्रत्तधारी कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या माध्यमातून दहा जिल्हे व दोन महानगर असा कार्यविस्तार असणाऱ्या मध्य महाराष्ट्राचे प्रांत सचिव म्हणून कार्यरत आहेत. ग्राहक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी विविध विषयावर व्याख्याने, ‘जागो ग्राहक जागो’चे उपक्रम चर्चासत्र, परिसंवाद, पथनाट्य, ललितबंध यामध्ये लेखनात्मक,प्रबोधनात्मक काम केले आहे. विविध वृत्तपत्रातून लिखाण आणि आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या ग्राहक प्रबोधनात्मक कार्यक्रमातून महत्वपूर्ण सहभाग घेतला आहे. त्यांच्या आजवर गावगाडा, लॉकडाऊन ची धग, ओझ, हिरकणी, राष्ट्रमाता जिजाऊसाहेब, रणसंग्राम पावनखिंडीचा, वरात या स्वलिखित कथा प्रसिद्ध आहेत. यापूर्वी त्यांना सलग २००३ ते २००५ यावर्षी सहकारी ग्राहक संस्थेच्या वतीने गुणवंत कामगार पुरस्कार,महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वोत्कृष्ट पत्रकारगौरव पुरस्कार, तसेच ते स्वतः चालवत असलेल्या वारणा बझारला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने त्यांना राज्यस्तर आदर्श व्यावसायिक उद्योजकता पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
या शानदार पुस्तक समारंभाच्या निमित्ताने बोलताना ते म्हणाले, “संवाद हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. संवाद नसेल तर कोणताही व्यवहार हा प्रभावी होऊ शकत नाही. व्यवहारातील संवादामुळे आपण ठरवलेले उद्दिष्ट सुनिश्चित रित्या पार पडू शकतो., हे पुस्तक समाजातील सर्व घटकांसाठी उपयुक्त असून अत्यंत माफक दरात उपलब्ध केले आहे. ग्राहकांनी या साहित्यकृतीचे स्वागत करून ‘संवादशास्त्र’ हे पुस्तक आपल्या जवळ घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.सामाजिक संघटन चळवळीसाठी हे पुस्तक दिशादर्शनाचे काम करेल असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला. पुस्तक मिळण्यासाठी वारणा सुपर बझार छ. शिवाजीनगर मनेर मळा उचगाव फोन नंबर
7083732020, 9022314520 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमास अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीचे सुर्यकांत पाठक राष्ट्रीय उपाध्यक्ष,
दिनकरजी सबनीस,राष्ट्रीय संघटन मंत्री
अरुणजी देशपांडेसो ,राष्ट्रीय सचिव,जयंतीभाई कथीरियासो ,राष्ट्रीय सह-सचिव धनंजयजी गायकवाड राष्ट्रीय कार्य. सदस्य,विजय सागर,राष्ट्रीय कार्य. सदस्य,विलास लेले,राष्ट्रीय कार्य. सदस्य,गजानन पांडे, क्षेत्रीय संघटन मंत्री सुहास काणे,
बाळासाहेब औटी, प्रांत अध्यक्ष
प्रसाद बुरांडे , प्रांत संघटन मंत्री भालचंद्र पाठक, प्रांत उपाध्यक्ष रमेश टाकळकर, प्रांत सह संघटन मंत्री या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला.
यांच्यासह सर्व पदाधिकारी व संघटनेतील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.










