May 14, 2026

भोगावती साखर च्या निवडणुकीत ३ पॅनेल रिंगणात

0
IMG-20231110-WA0056

भोगावती साखर च्या निवडणुकीत ३ पॅनेल रिंगणात

कोल्हापूर/मारुती फाळके

भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तीन पॅनेल मैदानात उतरले आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी, गुरुवारी राजकीय घडामोडींना वेग आला. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांच्या सत्ताधारी आघाडीला पाठिंबा दिला. कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली, ‘संस्थापक दादासाहेब पाटींल कौलवकर आघाडी’ या नावांनी पॅनेलची घोषणा झाली. तर माजी आमदार चंद्रदीप नरके, कारखान्याचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे सदाशिवराव चरापले यांच्यासह भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, रिपाईमधील मंडळीचा समावेश असलेल्या ‘शिव-शाहू परिवर्तन विकास आघाडी या पॅनेलची घोषणा केली. कारखाना निवडणुकीसाठी तीन पॅनेल झाल्याने तिरंगी लढत निश्चित झाली. कारखान्याच्या संचालकांच्या २५ जागांसाठी ८१ उमेदवार रिंगणात आहेत. सहा अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत काँग्रेस व शेकापमधील काही मंडळी वेगवेगळया पॅनेलमधून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

कारखान्याचे अध्यक्ष व सत्ताधारी आघाडीचे प्रमुख आमदार पी.एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आघाडीतील उमेदवारांची घोषणा बुधवारी करण्यात आली. सत्ताधारी आघाडीत अकरा विद्यमान संचालक आहेत. सहा माजी संचालक आहेत. आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपतराव पवार पाटील हे भोगावती निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. सत्ताधारी पॅनेलने बुधवारी पॅनेलची घोषणा केली.

दुसरीकडे कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली, ‘संस्थापक दादासाहेब पाटींल कौलवकर आघाडी’मधील उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये गट क्रमांक एक कौलव –धैर्यशील आनंदराव पाटील, महादेव मारुतीराव डोंगळे घोटवडे, शोभा उदय पाटील ठिकपुर्ली. गट क्रमांक दोन राशिवडे बुद्रुक – तानाजी बंडा ढोकरे राशीवडे बुद्रुक, आंबाजी दादासो पाटील येळवडे, एकनाथ तुकाराम पाटील तरसंबळे, संग्रामसिंह अरुण कलिकते शिरगाव. गट क्रमांक तीन कसबा तारळे –डॉ. सुभाष साताप्पा पाटील आणाजे, सुनील शंकर पाटील गुडाळ, संजय धोंडी पाटील कसबा तारळे. गट क्रमांक चार कुरुकली- आशितोष शिवाजी पाटील परिते, सुनील तुकाराम पाटील कुरुकली, सर्जेराव दादू पाटील हळदी, बाजीराव यशवंत लांबोरे बेले. गट क्रमांक पाच सडोली खालसा – निवास मारुती पाटील देवाळे, स्वरुपसिंह पांडूरंग पाटील सडोली खालसा, भगवान दत्तू देवकर गाडेगोंडवाडी, रघुनाथ बापू पाटील बाचणी. गट क्रमांक सहा हसूर दुमाला – तुकाराम पांडूरंग पाटील हसूर, शंकर बाबाजी पाटील कांचनवाडी. महिला गट – शारदा सुर्यकांत कुर्डू, सुमन तुकाराम पाटील राशिवडे बुद्रुक. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी – निवास पांडूरंग डकरे राशिवडे बुद्रुक. भटक्या विमुक्त जमाती प्रतिनिधी – आप्पासो साताप्पा हजारे वाशी. अनुसूचित जाती प्रतिनिधी- आनंदा गोपाळ कांबळे आमजाई व्हरवडे.
दरम्यान भाजप, शेकाप, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाई आणि शिवसेना अशा विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत शिवशाहू परिवर्तन विकास आघाडीची घोषणा केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा. जालिंधर पाटील यांनी आघाडीची घोषणा केली. गट क्रमांक एक कौलव –सदाशिवराव चरापले कौलव, भरत दत्तात्रय डोंगळे घोटवडे, आण्णाप्पा बाळू चौगुले कौलव. गट क्रमांक दोन राशिवडे बुद्रुक – मोहन तुकाराम धुंदरे राशिवडे बुद्रुक, संजय महादेव डकरे राशिवडे बुद्रुक, सुभाष पांडूरंग जाधव शिरगाव, शांताराम भाऊ बुगडे धुंडेवाडी. गट क्रमांक तीन- संग्राम शिवाजीराव पाटील गुडाळ, अरुण अनंत पाटील कसबा तारळे, शिवाजी विठृठल सावंत खिंडी व्हरवडे. गट क्रमांक चार कुरुकली – अजित पांडूरंग पाटील परिते, जनार्दन गुंडू पाटील परिते, हंबीरराव दिनकर पाटील हळदी, नामदेव ज्ञानदेव पाटील कुरुकली. गट क्रमांक पाच –उत्तम बाळासो पाटील वाशी, विक्रमसिंह संभाजीराव पाटील सडोली खालसा, तानाजी पांडूरंग जाधव बाचणी, दत्तात्रय बाळासाहेब मेडशिंगे कांडगाव. गट क्रमांक सहा –राजेंद्र महादेव पाटील हसूर दुमाला, लक्ष्मीबाई ब. पाटील म्हालसवडे. महिला गट –सुशिला संभाजी पाटील म्हाळुंगे, वंदना मोहन पाटील कोथळी. अनुसूचित जाती जमाती – बाळासाहेब नाना वाशीकर वाशी. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी –बाबासो विष्णू देवकर गाडेगोंडवाडी. भटक्या विमुक्त जाती –हिंदुराव सोनबा हजारे कांडगाव यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!