करवीर ता.शिक्षक पतसंस्थेच्या वतीने दीपावली भेटवस्तू वाटप
करवीर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने दीपावली भेटवस्तू वाटप
कोल्हापूर/मारुती फाळके
करवीर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने दीपावली भेटवस्तू वाटप समारंभ संपन्न झाला.पतसंस्थेच्या वतीने सर्व सभासदांना सहा टक्के रोख डिव्हिडंट ,दीड लिटर चा तांब्याचा जार, व पाच लिटर खाद्यतेल दीपावली निमित्त भेट देण्यात आले.
यावेळी पन्हाळा तालुका पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल अनिल अंगठेकर संचालक पदी निवड झाल्याबद्दल संभाजी चौगुले, युवराज गाडगीळ शिक्षक समिती शाखा पन्हाळाच्या सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल अभिजीत काटकर यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे सभासद शिवाजी आळवेकर यांच्या कन्या ऋचा आळवेकर, प्रेरणा आळवेकर यांनी राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत कास्यपदक मिळवल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
समारंभास चेअरमन चंद्रकांत पाटील व्हाईस चेअरमन शशिकांत धुत्रे ,शिक्षक बँक संचालक सुरेश कोळी ,संचालक कृष्णात कारंडे, संदीप मगदूम ,सुकुमार मानकर, यशवंत चौगुले,धनाजी सासने, मंगल चौगले,राजेंद्र तौंदकर सचिन पावसकर ,प्रताप पाटील तसेच राजेश सोनपराते,प्रभाकर कमळकर, बाजीराव पाटील सलीम जमादार, हरिदास वर्णे ,धनाजी पाटील, शिवाजी लवटे,बाबासो धुमाळ, यांच्यासह सभासद उपस्थित होते.










