May 14, 2026

समाजाला आज धम्म विचारांची गरज- मलकापूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन

0
IMG-20231113-WA0069

आंबेडकरी चळवळ पुढे न्यायची असेल तर समाजाला  धम्म विचारांची गरज

मलकापूर बुद्ध विहारात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सवात साजरा

भेडसगाव/मारुती फाळके

समाजाला पुढे न्यायचे असेल तर आज तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची समाजाला आज गरज आहे,आपण घेणारे नाही तर देणारे होऊया असा विचार मलकापूर ता.शाहूवाडी येथे पार पडलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात उमटला.

शाहुवाडी तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमाने मलकापूर (ता. शाहुवाडी ) बुधवार पेठे येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल मध्ये ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व वर्षावास सांगता समारोप मोठ्या उत्सवात संपन्न झाला.

 

यावेळी तालुकांच्या पंचक्रोशीतील सर्व धम्म बांधव, उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. तथागत भगवान गौतम बुध्द व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी दिपक कांबळे मांजरेकर यांनी भूषविले. महिला अध्यक्ष दिपाली कांबळे स्वागत अध्यक्षपदी होत्या, सचिव जगन्नाथ कांबळे, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे,संजय कांबळे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या वेळी बौध्द उपासक आणि उपासिकांनी त्रिसरण व पंचशील ग्रहण केले. आजच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भंन्ते धम्मानंद बोधी, प्रमुख मार्गदर्शक प्रा.नितीन घोलप सर यांची उपस्थिती प्रार्थनीय होती.

यावेळी शाहुवाडी तालुका युवा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी चे संदीप कांबळे गोगवेकर यांनी आपले विचार मांडताना म्हणाले, वंचित बहुजन आघाडी या आंबडेकरी चळवळी मध्ये तालुकाचा युवा अध्यक्ष म्हणून काम करताना असताना, बाबासाहेबांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या मागे एक जुटीने उभे राहून, बाळासाहेब ज्या पक्षाबरोबर युती करतील त्या पक्षाबरोबर सोबत राहून त्यांना सहकार्य करू या आणि बाळासाहेबांच्या पाठीशी खंभीर पणे उभे राहिले पाहिजे असे आपल्या मनोगत मांडले.

जालिंदार कांबळे पेरिडकर हे आपले मनोगत मांडताना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि आपले मत व्यक्त करताना तुम्ही आम्ही जागृत राहून तुमचा आमचा जगण्याचा अधिकार आहे, तो अधिकार मतपेटीतून मतदान करून विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिल्या शिवाय आंबेडकरी चळवळीत स्वस्त बसायाचे नाही, आणि त्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ या ? तसेच भारतीय बौद्ध महासभेचे मुंबई माजी अध्यक्ष धोंडीबा कांबळे भेंडवडेकर यांनी मुंबई वरून येऊन या कार्यक्रमाला हजेरी लावली. आपले मत मांडताना सर्वांनी चळवळीत काम करताना,आपण एकजूट राहून चळवळीत आमचे धम्म बांधव आम्ही मुंबईत असलो तरी आमचे लक्ष शाहुवाडीतील आंबेडकरी चळवळी कडे असते, असे आपल्या भाषणात बोलत होते. आपण वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभे राहून त्यांना सहकार्य करू या,

वारुळचे जेष्ठ मार्गदर्शक आर. एस. कांबळे सर यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या, आम्ही पहिले शाहुवाडी तालुक्यात पंचक्रोशीत ग्रामीण भागात पाई-पाई जाऊन चळवळ वाढवली. यासाठी पायाला घुंगूर बांधून वाडी वसाहतीत जाऊन चळवळीला दिशा दिली.
माजी जिल्हा अध्यक्ष सुरेश कांबळे कोळगावकर यांनी आपले मनोगत मांडताना चळवळीची सुरुवात झाली, तेव्हा पासून आपण काम करत आहे. चळवळ मध्ये काम करत असताना. कोल्हापूर,सांगली,सातारा या तिन्ही जिल्ह्यात चांगल्या प्रकारे चळवळ सूरू असतात आणि जोमाने चळवळीत काम करत असताना कुठे ही मागे पडता कामा नाही, ही आपण दक्षता घेतली पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक प्रा.नितीन घोलप सर यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडी चे काम चांगले चालले आहे, आणि पुढे चळवळ अशीच चालू ठेवण्यात आपण त्यांना सहकार्य करून त्यांच्या पाठीशी व सोबत असले पाहिजे. पुढे सांगताना ते म्हणाले
बुद्ध काय सांगतात, तुम्ही जसे विचार कराला तसे तुम्ही चे शरीर विचार करते, आणि आपण आपल्या शरीराला पुढील माणसाच्या विचारात काय चालले आहे, हे निदर्शनात आणून आपण त्याच्या बरोबर बोलायाचे का नाही हे स्पष्ट होते.
आपण चळवळीत काम करत असताना, घेणारे नको कारण चळवळीला घेणारे नको तर देणारे होऊ या, तरच चळवळ चालेल, असे आपले मत माडले.
अध्यक्ष दिपक कांबळे मांजरेकर यांनी अध्यक्ष भाषण करताना, चळवळीतील सर्व धम्म बांधवांना मार्गदर्शन करताना. आपण आंबेडकरी चळवळीत एकजूट ठेऊन वाढवली पाहिजे. चळवळीत एकत्र आले पाहिजे, प्रत्येकाला सोबत घेऊन कामे केली पाहिजे आणि जेष्ठ विचारवंत बंधूनी आम्हाला चुकले तर मार्गदर्शन करावे असे नमूद केले. आपण बाबासाहेबांची चळवळ तालुक्यातील उदगिरी ते भाडळे खिंडीपर्यंत च्या टोका पर्यंत पिंझून काढली. आता चळवळ गतिमानाने पुढे चालू ठेवली पाहिजे, आम्ही कधी वळवळ करत बसलो नाही,तर चळवळ पुढे वाढवत बसलो आणि वळवळ करण्या पेक्षा चळवळ चालू ठेवत राहिलो पाहिजे, आणि आपण स्वाभिमाने जगले पाहिजे आणि चळवळीत स्वाभिमाने राहिलो पाहिजे हे महत्वाचे आहे असे आपले मत माडले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष दिपक कांबळे मांजरेकर, सचिव जगन्नाथ कांबळे, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे सर,सुरेश कांबळे कोळगावकर, संजय कांबळे वारुळकर,जालिंदर कांबळे पेरीडकर , आर एस कांबळे वारुळकर,दिपाली कांबळे, सुरेखा ढालके, सविता कांबळे, पुष्पा कांबळे, मच्छिंद्र कांबळे, आर. के. परळीकर,एस के परळीकर, जगन्नाथ नलावडे, अशोक गायकवाड, रमेश कांबळे, संजय कांबळे वंचित ता.अध्यक्ष, यशवंत कांबळे ,राम घोलप, नानासो लोखंडे,अरविंद सातपुते, दत्तात्रय टेकोलीकर, महादू पवार, अमोल घोलप, नितीन घोलप, अशोक कांबळे परीडकर, पंकज कांबळे, सागर कांबळे, बाबुराव कांबळे, दिलीप कांबळे, दिनेश कांबळे,सचिन कांबळे, संजय घोलप, संदीप कांबळे, संजय परळीकर, समता सैनिक जवान श्रीरंग कांबळे आदी उपस्थित होते.
सुत्रसंचालन जगनाथ कांबळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रदीप कांबळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!