May 14, 2026

अ.म.मुख्याध्यापक महामंडळाचे अतिग्रे येथे राज्यस्तरीय अधिवेशन- खंडेराव जगदाळे

0
Screenshot_20231113_151937_3--800 (1)

अ.भा.मुख्याध्यापक महामंडळाचे अतिग्रे येथे १७ व १८ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय अधिवेशन- खंडेराव जगदाळे

कोल्हापूर/मारुती फाळके

अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संयुक्त महामंडळातर्फे राज्यस्तरीय साठावे शैक्षणिक संमेलन (वार्षिक अधिवेशन) १७ व १८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत होत आहे. हे दोन दिवसीय वार्षिक अधिवेशन संजय घोडावत विद्यापीठ येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनाला जवळपास पाच हजार मुख्याध्यापक उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संमेलनाचे अध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

शुक्रवारी सकाळी दहा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. माजी केंद्रीयमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री हसन मुश्रीफ, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदारांच्या उपस्थितीमध्ये या संमेलनचाचे उद्घाटन होईल. मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे संस्थापक रावसाहेब आवारी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

 

याप्रसंगी महामंडळाचे माजी अध्यक्ष वसंतराव पाटील, मारुती खेडेकर, विद्यमान अध्यक्ष के. एस. ढोमसे, पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष हिंदुराव जाधव, कार्याध्यक्ष दत्तात्रय कदम, मनोहर पवार, समन्वयक विनोद पाटील, मराठवाडा विभागाचे संजय शिप्परकर आदी उपस्थित असणार आहेत.

जुनी पेन्शन योजना लागू करावी, खासगी कंपन्यामार्फत भरती करू नका, समूह शाळा योजनेला विरोध, अशैक्षणिक कामे रद्द करा,’असे विविध विषय संमेलनाच्या केंद्रस्थानी आहेत. या दोन दिवसीय अधिवेशनात शिक्षणाशी निगडीत विविध विषयांच्या अनुषंगाने चर्चा होईल. संमेलन कालावधीत शोधनिबंध सादरीकरण, चर्चासत्र, मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन केले आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता खुले अधिवेशन व ठराव वाचन होईल.
पत्रकार परिषदेला सुभाष खामकर, प्रकाश पाटील, गजानन काटकर, जनार्दन दिंडे, आनंदा वाईगडे, शिवाजी खापणे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!