March 24, 2026

संजय जगताप यांची सीसीआरटी प्रशिक्षणासाठी निवड

0
5a24bcfa58fe4753adefa555a8b17d35

संजय जगताप यांची सीसीआरटी प्रशिक्षणासाठी निवड

कोल्हापूर टाइम्स 24 प्रतिनिधी
कडवे ता.शाहूवाडी व केंद्रीय प्राथमिक शाळा माण चे पदवीधर अध्यापक तथा केंद्रप्रमुख संजय जगताप यांची सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्र नवी दिल्ली यांच्यामार्फत ‘रोल ऑफ पपेट्री इन एज्युकेशन इन लाईन विथ एन.इ.पी.२०२०’ या प्रशिक्षणासाठी मधापूर,हैदराबाद येथे निवड झाली आहे. सदर प्रशिक्षण दि.०६/१२/२०२३ ते दि.२०/१२/२०२३ या कालावधीत संपन्न होणार आहे.

 

जगताप हे कोल्हापूर जिल्ह्यात उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचित आहेत. यापूर्वीही त्यांची नवी दिल्ली,गुवाहाटी, दिमापुर नागालँड,शिलॉंग मेघालय येथे सीसीआरटी प्रशिक्षणासाठी निवड झाली होती.तसेच त्यानी महाराष्ट्र शासनाच्या सिंगापूर देशाचा शैक्षणिक अभ्यास दौरा त्यांनी यशस्वी पूर्ण केला आहे.त्याचबरोबर एससीईआरटी टी पुणे येथे शाळांचे मूल्यमापन करण्यासाठी गुणवत्ता मानके तयार करण्याच्या समितीवर ही त्यांची निवड झाली आहे.नुकतीच त्यांची एससीईआरटी पुणे येथे विषय सहाय्यक(गुणवत्ता कक्ष) या पदावर प्रतिनियुक्तीवर निवड झाली आहे. त्यांना गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार, शिक्षण विस्तार अधिकारी आनंदराव सुतार मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, शाळा समिती माणचे अध्यक्ष विजय पाटील,उपाध्यक्ष विठ्ठल पाटील,शिक्षक स्टाफ यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!