March 24, 2026

शिक्षक संघाचे कार्य सामान्य शिक्षकांपर्यंत पोहोचवा– राजाराम वरुटे.

0
IMG20240107155720

 

शिक्षक संघाचे कार्य सामान्य शिक्षकांपर्यंत पोहोचवा-,संघटना अभेद्य ठेवूया
राजाराम वरुटे.
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी येथे महामंडळ सभा संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी

राज्यात शिक्षक संघाची ताकद मोठी आहे. आज पर्यंत संघाच्या माध्यमातून शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. आणि सोडवत आहे. याचाच आदर्श घेवून कोल्हापूर जिल्हा शाखा जिल्ह्यात जिल्हा परिषद स्तरावरील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सातत्याने अभ्यासपूर्ण पाठपुरावा करत आहे. जिल्हा संघाचे हे कार्य जिल्ह्यातील तळागाळातील सामान्य शिक्षकांपर्यंत पोहोचवून शिक्षक संघ मजबूत करा असे आवाहन कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सल्लागार राजाराम वरुटे यांनी केले.

महामंडळ सभा जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी हॉल मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी सभेच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना शिक्षक संघाचे राज्य नेते श्री. राजाराम वरुटे म्हणाले की, शिक्षक संघाचे कार्य राज्य,राष्ट्रीय पातळीवर आहे,हे कार्य सर्वश्रुत
होण्यासाठी जिल्हा, तालुका कार्यकारिणीने प्रयत्न करावेत,
यावेळी संघाचे राज्य कोषाध्यक्ष संभाजी बापट यांनी राज्य संघाच्या वतीने केलेल्या कार्याचा, आणि सद्या सुरु असलेल्या राज्य स्तरीय पाठपुराव्याचा आढावा, तसेच संघाच्या राज्य अधिवेशन बाबत माहिती सांगितली.
जिल्हाध्यक्ष बी एस पाटील यांनी प्रास्ताविकात जिल्हा संघाने केलेल्या कार्याची माहिती सांगितली. यामध्ये
वरिष्ठ वेतन श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण यशस्विता, प्रॉव्हिडंट फंड,चटोपाध्याय प्रस्ताव, नव साक्षरता अभियान प्रशिक्षण बहिष्कार, प्रशिक्षण वेळेतील बदल,बायोमेट्रिक कॅम्प, बहिस्थ शिक्षण पूर्वपरवानगी प्रस्ताव आदेश, मेडिकल बिले आदी प्रश्नांची सोडवणूक संघाच्या माध्यमातून केली आहे.

यावेळी जिल्हा अध्यक्षा सौ श्वेता खांडेकर, माजी चेअरमन राजमोहन पाटील, साहेब शेख, शिक्षक संघाचे नेते बबन केंकरे, मारूती दिंडे, नवनाथ व्हरकट, माजी संचालक वसंत जाधव, माजी चेअरमन बाजीराव कांबळे, करवीर तालुका अध्यक्ष साताप्पा चौगले, पन्हाळा सरचिटणीस संजय ठाणेकर, भुदरगड सरचिटणीस राजेंद्र कडव, पंडित पाटील, श्रीकांत मानगावकर, अमृत काटे, चिदंबर चित्रगार,आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी अनिल कंगणे, सुरेश शेळवाडकर,प्रकाश पाटील, बाजीराव पाटील, कांदळकर सर, रामचंद्र बचाटे, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागत व सूत्र संचालन जिल्हा कोषाध्यक्ष सर्जेराव सुतार यांनी केले तर आभार जिल्हा कार्याध्यक्ष.बी.एल.शिंदे यांनी आभार मानले.
यावेळी महामंडळ सभेत
1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संघाच्या वतीने व्यापक लढा उभा करणे,
शैक्षणिक वर्ष ग्राह्य मानून शिक्षक हजेरी पत्रक,किरकोळ रजा यासाठी मा.शिक्षणाधिकारी
व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे पाठपुरावा करणे,विषय शिक्षक यांच्या बाबत संघाच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण कायदेशीर लढा देणार यासाठी संबधित शिक्षकांची मीटिंग घेवून पुढील रणनिती आखणे,शिक्षकांच्या सुट्टी यादी बाबत जिल्ह्यातून संकलित केलेल्या सूचनांचा विचार करून सुट्टी पत्रक यादी मद्ये आवश्यक बदल करणे,जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया तात्काळ सुरु करावी यासाठी मंत्रालय स्तरावरून पत्र काढण्यासाठी प्रयत्न करणे,मेडिकल देयके मंजूर आदेशानुसार अदा होण्यासाठी तालुका कार्यकारिणी सक्रिय करणे,
जिल्हा बदली आगावू वेतनवाढ बाबत कायदेशीर बाबी विचारात घेऊन प्रश्न सोडविणे,
बहिस्थ शिक्षण कार्योत्तर परवानगी मिळण्यासाठी पाठपुरावा करणे,आस्वासित योजनेचा पाठपुरावा,कॅशलेस मेडिकल बिल,आयकर स्लॅब वाढवून मिळावा यासाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा होनेसाठी खासदार महोदय यांच्या मार्फत पाठपुरावा करणे,
आदी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्य, जिल्हा संघ सातत्याने अभ्यासपूर्ण पाठपुरावा करेल याबाबत शिक्षक संघाचे राज्य सल्लागार राजाराम वरुटे यांनी सविस्तर चर्चा व मार्गदर्शन केले.

(फोटो ओळी) -जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीत झालेल्या महामंडळ सभेत उपस्थिताना मार्गदर्शन करताना शिक्षक संघाचे राज्य सल्लागार राजाराम वरुटे,सोबत डावीकडून वसंत जाधव, राजेंद्र पाटील, बाजीराव कांबळे, रजमोहन पाटील , प्रशांत पोतदार,साहेब शेख,संभाजी बापट , बी एस पाटील, श्वेता खांडेकर, सर्जेराव सुतार, बबन केकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!