March 24, 2026

खोटं बोल पण रेटून बोल ही विरोधकांची प्रवृत्ती-बाबा पाटील

0
IMG-20240105-WA0029

खोटं बोल पण रेटून बोल ही विरोधकांची प्रवृत्ती-बाबा पाटील

पतपेढीचा कारभार उत्कृष्टपणे सुरू.

कोल्हापूर/प्रतिनिधी,

खोटं बोल पण रेटून बोलं ही विरोधकांची प्रवृत्ती आहे. पतपेढीचा कारभार उत्कृष्टपणे सुरू असल्यामुळे विरोधकांकडे प्रचाराचे मुद्दे नाहीत. ते धांदात खोटे आरोप करत आहेत.’असा पलटवार बाबासाहेब पाटील यांनी केला.

 

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतपेढीच्या प्रचारार्थ राजर्षी शाहू सत्तारुढ आघाडीतर्फे मेळावा आयोजित केला होता. कळे येथे झालेल्या या मेळाव्यात पाटील बोलत होते. आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला.

पाटील म्हणाले, ‘कोजिमाशि ही मोठी बहिण असल्याचे विरोधक म्हणत आहेत. पतपेढी अडचणीत होती, तेव्हा बहिणीचे नाते कुठे गेले होते ? आता बहिण सुखाने कामकाज करत असताना त्या कामकाजात डोकाविण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? तिच्या संपत्तीवर डोळा ठेवून विरोधक निवडणूक लढवित आहेत का ? ’

याप्रसंगी मारुतीराव परितेकर, शाहू काटकर, मुख्याध्यापक संघाचे सहसचिव अजित रणदिवे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही. जी. पोवार, एच. आर. पाटील, के. के. पाटील, उदय पाटील, के. के. पाटील, किरण पास्ते, विजय जाधव, एस. डी. लाड, आर. एस. मर्दाने, एस. डी. जरग आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!