March 24, 2026

स्वेच्छानिवृत्ती घेऊनही मतदार यादीत नाव कसे?- खंडेराव जगदाळे

0
IMG-20240104-WA0077

स्वेच्छानिवृत्ती घेऊनही मतदार यादीत नाव कसे?- खंडेराव जगदाळे

कोल्हापूर/प्रतिनिधी

कोजिमाशि पतपेढीचे जे सभासद सहा महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झाले, त्यांची नावे मतदार यादीतून वगळली आहेत. आमदार जयंत आसगावकर यांनी दोन वर्षांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली.त्यांचे नाव मात्र मतदार यादीत पंचवीस अनुक्रमांक वर आहे हा संस्थेत मनमानी कारभार सुरू आहे.’असा आरोप विनाअनुदानित शाळा कृती समितीचे अध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी केला.

स्वाभिमानी सहकार आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन बी.जी.बोराडे होते. स्वाभिमानी आघाडी प्रमुख दादा लाड म्हणाले, सत्ताधारी मंडळींनी दोन लाखापर्यंतचे कर्ज नऊ टक्के व्याजदराने केवळ अडीच कोटी रुपये दिले आहेत आणि अकरा टक्के दराने 30 कोटी कर्ज वितरित केले आहे.प्रचारात मात्र एक अंकी कर्जाचा व्याजदर केल्याचे सांगून सत्ताधारी कर्जदार सभासदांची सरळ सरळ फसवणूक करत आहेत.सभासद यावेळी निश्चित परिवर्तन करून स्वाभिमानी आघाडीला विजयी करतील. ’

याप्रसंगी विलास साठे, समीर घोरपडे, पतपेढीचे माजी उपाध्यक्ष एन. के. पाटील, कोजिमाशिचे संचालक राजेंद्र रानमळे, राजेंद्र पाटील, सचिन पाटील, मनोहर जाधव यांची भाषणे झाली. कोजिमाशि पतसंस्थेचे चेअरमन बाळ डेळेकर, मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील, रंगराव तोरस्कर, आर. वाय. पाटील, गजानन चव्हाण, शरद पाटील, राजेश वरक उपस्थित होते.कैलास सुतार यांनी स्वागत केले. मनोहर पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!