पतपेढीला समृद्ध करण्यासाठी परिवर्तन निश्चित-दादा लाड, २५० हुन अधिक मताधिक्यांनी विजयाचा दावा
पतपेढीला समृद्ध करण्यासाठी परिवर्तन निश्चित.-दादा लाड
२५० हुन अधिक मताधिक्यांनी विजयाचा दावा
आयर्विन ख्रिश्चन सभागृहात स्वाभिमानी सहकार आघाडीचा प्रचार मेळावा
कोल्हापूर/मारुती फाळके :
सभासदांना फसवून पतपेढीत मनमानी कारभार सुरू आहे,सेवानिवृत्त झालेले सभासद मतदार यादीतून वगळले आणि आमदार साहेब २ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले,पण त्यांचे नाव मतदार यादीत कसे?
‘आमदार जयंत आसगावकर यांचा कारभार हा सभासद हिताचा नव्हे तर स्वहिताचा आहे. २०१७ मधील निवडणुकीत आम्ही त्यांना पाठिंबा दिला. सत्तेवर बसविले ही मोठी चूक झाली. ती चूक दुरुस्त सुधारुण यंदा पतपेढीत परिवर्तन घडवू या. पतपेढीही कोजिमाशि पतसंस्थेची मोठी बहिण आहे. पतपेढीला आणखी मोठे करू या.’असे आवाहन स्वाभिमानी सहकार आघाडीचे प्रमुख व शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारार्थ आयर्विन ख्रिश्चन सभागृहात स्वाभिमानी सहकार आघाडीच्या झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष बी. जी. बोराडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पतपेढीचे माजी अध्यक्ष विलास साठे, कोजिमाशिचे माजी संचालक प्रा. समीर घोरपडे यांनी व्यासपीठावर उपस्थिती दर्शवित स्वाभिमानी सहकार आघाडीला पाठिंबा दिला.
शिक्षक नेते दादा लाड म्हणाले, एक अंकी आकस्मिक कर्जावर ९% व्याज,१० लाख कर्जावर १०%व्याज, १० लाखाच्यावर ११%व्याज, आणि त्यापुढील कर्ज रकमेवर वेगवेगळ्या व्याजाची आकारणी हे विसंगत आहे.आमदार आसगावकर यांनी केवळ ५ शाखा, ४२ कोटी उलाढाल,आणि १३ कर्मचारी असणाऱ्या पतपेढीत नोकरांच्या पगारावर खर्च करून पतपेढीचे आर्थीक नुकसान केले आहे. आमदारांच्या सोलापूर येथील संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा खर्चही पतपेढीतून झाला आहे. त्यांचा कारभार हा सभासदहिताचा नाही तर स्वहितासाठी आहे. त्यांनी नेमलेली सुकाणू समितीही बेकायदेशीर आहे. सुकाणू समिती कारभार चालवते हे सहकाराच्या कोणत्या नियमात बसते?म यंदा पतपेढीत परिर्वत निश्चित आहे. यामुळे आमदार गटाकडून दबावाचे राजकारण होत आहे. मात्र सभासद हा स्वाभिमानी सहकार आघाडीसोबत आहे. स्वाभिमानीचे सगळे उमेदवार २५० हून अधिक मताधिक्क्यांनी विजयी होतील.’सर्वांनी गुलालाची तयारी करा असेही ते म्हणाले.
विना अनुदानित कृती समितीचे खंडेराव जगदाळे म्हणाले,‘आमदार आसगावकर यांनी शिक्षक संघटना फोडण्याचे काम केले आहे. मात्र स्वार्थासाठी दुसरीकडे जाणारी माणसे आपली नसतात. विना अनुदानितच सगळे शिक्षक सभासद हे स्वाभिमानी सहकार आघाडीसोबत आहेत.’ अध्यक्षस्थानावरुन बोलताना बोराडे यांनी पतपेढीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले. पण सत्ताधारी आघाडीकडून प्रतिसाद मिळाला नाही असे सांगितले.
याप्रसंगी पतपेढीचे माजी उपाध्यक्ष एन. के. पाटील, कोजिमाशि पतसंस्थेचे संचालक राजेंद्र रानमळे, राजेंद्र पाटील सचिन पाटील (राधानगरी), शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे मनोहर जाधव यांची भाषणे झाली. कैलास सुतार यांनी स्वागत केले. मनोहर पाटील यांनी प्रास्ताविक केले. सभेला कोजिमाशि पतसंस्थेचे चेअरमन बाळ डेळेकर, व्हा.चेअरमन प्रकाश कोकाटे, मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील, रंगराव तोरस्कर, आर. वाय. पाटील, गजानन चव्हाण,जनार्दन गुरव,बी. टी. पाटील,शरद पाटील, संजय पाटील,राजेश वरक, प्रशांत पोतदार, बाजीराव कांबळे आदी उपस्थित होते.










