विद्यमान संचालक मंडळाचा कारभार सभासद हिताचा-आमदार जयंत आसगावकर.,विरोधकांचे आरोप बिनबुडाचे
विद्यमान संचालक मंडळाचा कारभार सभासद हिताचा-आमदार जयंत आसगावकर ,
विरोधकांचे आरोप बिनबुडाचे
राजर्षी शाहू सत्तारूढ आघाडीचा राधानगरी येथे मेळावा.
कोल्हापूर/मारुती फाळके
विद्यमान संचालक मंडळाचा कारभार सभासद हिताचा असून व्यवसायवृद्धी, सभासद हित डोळ्यासमोर ठेवून संस्थेचा उत्कर्ष साधला आहे, असे प्रतिपादन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी व्यक्त केले.
विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून
‘विद्यमान संचालक मंडळाचा कारभार हा चांगला आहे. सभासदाभिमुख योजनेमुळे पतपेढी प्रगतीपथावर आहे.’असे मत त्यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ म्हणाले, पतपेढीचा शाखा विस्तार हा सभासदांच्या हिताचा विचार करुन झाला आहे.,विद्यमान संचालक मंडळींनी सभासद हिताचा कारभार केला असून,सुकाणू समितीच्या मार्गदशनाखाली सभासद हिताच्या योजना राबवल्या आहेत.,सभासदांचा विश्वास संपादन केल्यामुळे विजय निश्चित असल्याचेही ते म्हणाले.
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजर्षी शाहू सत्तारुढ आघाडीच्या प्रचारार्थ राधानगरी तालुक्यात मेळावा झाला. या सभासद मेळाव्यात त्यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख मांडला. पांडूरंग हुजरे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार जयंत आसगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्तारुढ आघाडीतर्फे ठिकठिकाणी सभासद मेळावे होत आहेत. या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार आसगावकर म्हणाले, ‘पतपेढीच्या प्रगतीत संचालक मंडळाच्या कारभारासह सभासदांचेही योगदान मोठे आहे. या निवडणुकीत सभासद सत्तारुढ आघाडीसोबत राहतील. ’पतपेढीचे अध्यक्ष महादेव चौगले यांनी नोकरभरतीसंबंधी विरोधकांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगितले. यावेळी कृती समितीचे बाबा पाटील, एस. के. पाटील, विश्वास केणे, युवराज पाटील, प्रभाकर धामणे, सूरज पाटील, संजय तिबिले आदी उपस्थित होते. सुदेश जाधव यांनी स्वागत केले. राजेंद्र कारंडे यांनी आभार मानले.










