May 14, 2026

शनिवारी प्रकाश भोसले लिखित” बापाचं काळीज” कथासंग्रहाचा प्रकाशन

0
IMG-20240104-WA0088

शनिवारी प्रकाश भोसले लिखित” बापाचं काळीज” कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा

कोल्हापूर/मारुती फाळके

नवोदित लेखक प्रकाश भोसले लिखित यांच्या” बापाचं काळीज” कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार दि.६ जानेवारी दु.२ वा होणार असल्याची माहिती प्रकाशन सोहळा समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे व शिक्षक बँकेचे व्हा. चेअरमन अमर वरुटे यांनी दिली.

कोल्हापुरातील ऐतिहासिक राजर्षी शाहू स्मारक भवन येथे हा सोहळा आयोजित केला असून साहित्य रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती रहावे. “तुटपुंज्या शेतीत राबून दारिद्र्याने पिचलेल्या तरीही मुलाबाळांच्या पोषणासाठी व शिक्षणासाठी परिस्थितीशी अविरत झुंज देणाऱ्या प्रत्येक आई-बापास ही पहिली साहित्य कृती समर्पित केली असल्याची माहिती “बापाचं काळीज” या कथासंग्रहाचे लेखक प्रकाश भोसले यांनी दिली., या प्रथम साहित्यकृतीचे स्वागत आणि आशीर्वाद साहित्य रसिकांनी या नवीन साहित्यिकृतीचे स्वागत व आशीर्वाद द्यावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

पुस्तकाचा प्रकाशन सोहळा समाधान शेंडगे उपजिल्हाधिकारी कोल्हापूर,माजी शिक्षण संचालक महावीर माने, तसेच राष्ट्रपती व राज्य शासन पुरस्कार प्राप्त लेखक डॉ. श्रीकांत पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी प्राथमिक मीना शेंडकर, बालसाहित्यिक चंद्रकांत निकाडे ,शिक्षणविस्तारअधिकारी शशीकुमार पाटील,प्रा. सुरेश चौगुले, मुख्याध्यापक संघाचे संचालक श्रीकांत पाटील, शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र पाटील व्हा. चेअरमन अमर वरुटे, शिक्षक साहित्य मंचाचे अध्यक्ष तानाजी आसबे, केंद्रप्रमुख रंगराव बर्गे, सरदार सरनोबत या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याची माहिती लेखक प्रकाश भोसले व संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली.

प्रकाश भोसले हे नवोदित लेखक असून जिल्हा परिषदेच्या पोहाळवाडी ता. पन्हाळा येथे विषयशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. उपक्रमशील शिक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आहेत. आजवर त्यांचे अनेक लेख, कथा, कविता विविध वर्तमानपत्रे, मासिकातून, प्रसिद्ध झाले आहेत. अखिल साहित्य विचार मंच चे क्रियाशील सदस्य असून मार्मिक आणि आशयपूर्ण लेखन हा त्यांच्या लेखनाचा प्रांत आहे.

या कार्यक्रमासाठी सर्व साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन प्रकाशन सोहळा समितीच्या वतीने देण्यात आले.

यावेळी प्रकाशन सोहळा समितीचे विजय रामाने,संतोष गायकवाड ,बालाजी पांढरे,निलेश कारंडे,मारुती फाळके, श्रीनाथ पाटील, प्रमोद, पाटील, चेतन शिंदे,दिलीप वाळवेकर ,मारुती पोवार,प्रमोद पवार,विश्वनाथ बोराटे,राजेश मेडेवार,सुनील सुतार, दिगंबर मोहिते, सागर उबाळे,आरती बुवा, सादिया मुजावर यासह महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटनेचे शिलेदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!