March 24, 2026

करवीर पो.पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी रवींद्र जाधव, उपाध्यक्षपदी स्वप्नील साठे

0
IMG-20240112-WA0014(1)

करवीर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी रवींद्र जाधव, उपाध्यक्षपदी स्वप्नील साठे व सचिवपदी पंढरीनाथ ताशीलदार

कोल्हापूर/प्रतिनिधी

करवीर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी रवींद्र जाधव, उपाध्यक्षपदी स्वप्नील साठे तर सचिवपदी पंढरीनाथ ताशीलदार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

करवीर तालुका पोलिस पाटील संघटनेची वार्षिक कार्यकारिणी मिंटिंग बुधवार रोजी स्वामी समर्थ सांस्कृतिक हाॅल केर्ले या ठिकाणी पार पडली.संघटनेचे मावळते अध्यक्ष सचिन भोपळे (केर्ले) उपाध्यक्ष अर्चना पाटील (पाडळी खुर्द), सचिव आशिष भाट (हिरवडे दुमाला), करवीर कार्यकारिणी कमिटी यांच्या व बाळासाहेब पाटील, विश्वास पाटील,अजितदादा पाटील, गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा सचिव सागर जाधव, अजित तिवले यांच्या उपस्थितीत या निवडी आनंददायी वातावरणात पार पडल्या.यामध्ये गतसालात झालेल्या जमा खर्च हिशोब व सर्व ताळेबंद मांडण्यात आला.

यावेळी विजय सादळेकर(पोलीस पाटील सरनोबतवाडी) यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

नवीन कार्यकारिणी अशी-
अध्यक्ष – रवींद्र बापूसाहेब जाधव (हणमंतवाडी)
उपाध्यक्ष – स्वप्नील बापुराव साठे (उचगाव)
सचिव – पंढरीनाथ गणपती ताशीलदार (कसबा बीड)
सदस्य – तानाजी श बनकर ( कोगील ब्रुदुक)

सदस्य – संदिप दगडू खाडे (वडडवाडी), रवींद्र मनोहर कांबळे (चिंचवाड), लक्ष्मण शामराव पाटील(तेरसवाडी),जालिंदर आनंदा जामदार (कोपार्डे)
सदस्या – लता पंढरीनाथ पाटील ( आमशी) , राजश्री जितेंद्र जाधव (वाडीपीर), अरुणा कुमार दळवी (प्रयाग चिखली),स्मिता संदिप पाटील (जैताळ),मेघा शिवाजी पुजारी ( नेर्ली)

यावेळी निवड झालेल्या अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,सचिव व सर्व कार्यकारिणीचे करवीर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!