March 24, 2026

मांगुर येथील भावगीत गायन स्पर्धेत रविराज सदाजय प्रथम

0
IMG-20240112-WA0012

मांगुर मध्ये झालेल्या भावगीत कराओके गायन स्पर्धेत रविराज सदाजय प्रथम,द्वितीय प्रमोद नाईक,वैष्णवी जाधव

कोल्हापूर/प्रतिनिधी
     मांगुर येथील अक्काश्री फाउंडेशन मांगुर यांच्यावतीने स्मृतीशेष अक्काताई श्रीकांत कांबळे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त घेण्यात आलेल्या भावगीत कराओके गायन  स्पर्धेत मांगुर मध्ये झालेल्या भावगीत कराओके गायन स्पर्धेत रविराज सदाजय प्रथम,द्वितीय प्रमोद नाईक व वैष्णवी जाधव यांच्या मध्ये विभागून, तृतीय क्रमांक जगदीश सरवडे व उदय कांबळे विभागून तर उत्तेजनार्थ बक्षीस सुरज कांबळे यांने पटकावले.
मांगुर येथील अक्काश्री फाउंडेशन मांगुर यांच्यावतीने स्मृतीशेष अक्काताई श्रीकांत कांबळे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
 या स्पर्धेमध्ये कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यातून अनेक स्पर्धकांनी भाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष  प्रशांत जयकर यांनी केले.
   या स्पर्धेत स्पर्धकांनी मन तळ्यात, पाहिले न मी तुला, या जगण्यावर या मरण्यावर, सांज ये गोकुळी, केव्हा तरी पहाटे, केतकीच्या  बनी तिथे अशी अनेक अमित भावगीते सादर केली कार्यक्रमाला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
     कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून वसंत वराळे हे उपस्थित होते. ज्येष्ठ बौद्ध उपासक आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते स्मृतीशेष यांचे पती श्रीकांत कांबळे गुरुजी, वंचित बहुजन आघाडी हुपरी शहराध्यक्ष पांडुरंग मानकापुरे,ऑल इंडिया पँथर संघटना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चरणदास कांबळे,गंगा कल्याण पाणीपुरवठा योजना मांगुर चे अध्यक्ष नंदकुमार वराळे,आंबेडकराईट एम्प्लॉईज फाउंडेशन चे अध्यक्ष सचिन माने,राजमाता रमाई गायन पार्टीचे अध्यक्ष सुकुमार कांबळे, मांगुर ग्रामपंचायतचे सदस्य देवदत्त राजहंस व मारुती मधाळे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण तज्ञ परीक्षक मारुती फाळके व अमर चोपडे  यांनी केले
    विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व बक्षीसाची रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन अकाश्री फाउंडेशन चे अध्यक्ष प्रशांत जयकर यांच्या नेटक्या संयोजनाखाली पार पडले.,स्पर्धेचे सूत्रसंचालन सुमित जयकर तर आभार स्वप्निल कांबळे  यांनी मानले.
फोटो ओळी- मांगुर मध्ये झालेल्या भावगीत कराओके गायन स्पर्धेत रविराज सदाजय याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देताना परीक्षक मारुती फाळके, अमर चोपडे,श्रीकांत कांबळे गुरुजी,प्रशांत जयकर व कुटुंबीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!