मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे- विकास तांबे
मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे- विकास तांबे
कोल्हापूर/मारुती फाळके
मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे या मागणीसाठी
मातंग क्रांती महामोर्चा च्या वतीने आझाद मैदानावर जनआंदोलन उभारण्याचा इशारा मुंबई काँग्रेस चे सचिव विकास तांबे यांनी दिला. ते मराठी पत्रकार संघ या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पत्रकार परिषदेमध्ये तांबे म्हणाले, अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये विकासाच्या प्रक्रियेमध्ये मातंग समाज अजूनही कोसो दूर आहे अजूनही परंपरागत व्यवसाय शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नोकरीसाठी करावा लागणार संघर्ष शासनाची उदासीन भूमिका यामुळे मातंग समाज समाजात अपेक्षित प्रमाणात प्रगती झालेली दिसून येत नाही अनुसूचित जाती प्रवर्गातील इतर जातींचा विकास पाहिला तर मातंग समाज या प्रमाणात अत्यल्प प्रगतीपथावर आहे यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील मातंग समाजाला वेगळे आरक्षण द्यावे अ ब क ड वर्गीकरण करून त्याप्रमाणे मातंग समाजाला आरक्षणाचा आरक्षणाचे प्रमाण ठरवावे अशी मागणी त्यांनी केली.
मातंग समाजाला स्वातंत्र्य टक्के आरक्षण मिळावे., जातीनिहाय जनगणना करावी, समाजातील उच्च शिक्षण घेतलेल्या व्यवसाय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही कागदपत्रांचा आटापिटा न करता विनाअठ अर्थसहाय्य उपलब्ध करावे यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी ही मागणी त्यांनी यावेळी केली.
यासाठी येत्या १८ फेब्रुवारी पासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.या पत्रकार परिषदेस कोअर कमिटीचे अशोक ससाने, देवेंद्र खडसे ,राजकुमार शिंदे, राजेंद्र साठे ,बाळासाहेब कसबे, नानाभाऊ पाटोळे, गणेश साबळे सुनिता ताई तुपसुंदर,आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










