March 24, 2026

कबनुर येथील प्रशिक्षणात शिक्षक गिरवताहेत अध्ययन अध्यापनाचे अभिनव धडे

0
IMG-20240119-WA0053

काम निमपट परिणाम दुप्पट समाधान तिप्पट देणारे प्रशिक्षण म्हणजे “अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मूल्यमापन

कबनुर येथील प्रशिक्षणात शिक्षक गिरवताहेत अध्ययन अध्यापनाचे अभिनव धडे

कोल्हापूर/मारुती फाळके

विद्यार्थ्यांचे अध्ययन प्रभावी होण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि मूल्यमापन हे प्रशिक्षण पंचायत समिती हातकणंगले व व कोल्हापूर डाएट अंतर्गत कबनूर येथील कबनुर हायस्कुल कबनुर येथे सुरू आहे. आत्तापर्यंत शिकवायचे कसे? यावर आधारित प्रशिक्षण दिली जात होती पण प्रथमत:च विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे? यावर आधारित हे प्रशिक्षण दिले जात आहे .
मुले स्वयंप्रेरणेने स्वतः शिकू शकतात, शिक्षणात योग्य पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर केल्यास विद्यार्थ्यांची शिकण्याची गती वाढते, जागतिक दर्जाचे भविष्य वेधी शिक्षण देण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सहा कौशल्य(6c) विकसित करण्यासाठी या प्रशिक्षणाचा प्रभावीपणे वापर करता येईल.
प्रशिक्षणाचा पाचवा टप्पा कबनूर हायस्कूल कबनूर येथे सुरू असून या संस्थेचे संस्थापक जयकुमार कोले ,तालुका समन्वयक पूजा कांबळे यांच्या हस्ते प्रशिक्षणाच्या पाचव्या टप्प्याचे उद्घाटन झाले .

५ दिवस होत असलेल्या कोल्हापूर डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याता भोई सर यांनी प्रशिक्षण वर्गास भेट देऊन उद्बोधन केले. ते म्हणाले शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडथळे शोधून जागतिक ज्ञान ,भाषा,कौशल्य, अभिनव शैक्षणिक तंत्रज्ञानाची कास धरून ज्ञान, सामर्थ्य प्राप्त करण्याचे क्षमता विद्यार्थ्यांच्यात निर्माण करावे, असर,नास आणि पिसा लेवल चे विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांनी अद्यावत तंत्रज्ञान, शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर अध्ययन अध्यापनात करावा, विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यास प्रवृत्त करावे .,वर्गातील अध्ययन अनुभवाबरोबरच नैसर्गिक ज्ञान ,व्यवहारज्ञान सुद्धा देण्यात कसूर करू नये., असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र भाई यांनी केले.
ते म्हणाले जग वेगाने बदलत आहे, बदलाचा सामना करायचा असेल तर जगाशी स्पर्धा करणाऱ्या असामान्य बुद्धी पातळीच्या क्षमतेचे विद्यार्थी घडवने काळाची गरज आहे.

राष्ट्र जडणघडणीच्या कामांमध्ये शिक्षक म्हणून आपली मोलाची भूमिका आहे. यासाठी विश्व संशोधन, विश्वज्ञानाशी स्पर्धा करणारे विद्यार्थी शाळाशाळात घडावेत,. आणि हे फक्त आणि फक्त शिक्षकच करू शकतात. यासाठी बदलते तंत्रज्ञान स्वीकारून अपडेट रहावे, स्वतःला झोकून देऊन पिढी घडवण्याचे काम करावे असेही ते म्हणाले.

या प्रशिक्षणास सुलभक म्हणून आरती लाटणे, शितल कुंभार, संदीप कोळी, मारुती पाटील , अविनाश शिंदे , नितीन तांबडे तर हातकणंगले तालुक्यातील हुपरी, पट्टणकोंडोली,हेरले,आळते,रेंदाळ,इचलकरंजी मनपा, कबनुर, रुकडी,उर्दु हातकणंगले अशा विविध केंद्रातील १०० शिक्षक प्रशिक्षण घेत आहेत.

(फोटो ओळी- प्रशिक्षणातील तज्ज्ञ मार्गदर्शक आरती लाटणे, शितल कुंभार, संदीप कोळी, मारुती पाटील , अविनाश शिंदे , नितीन तांबडे यांचा सन्मान करताना हातकणंगले तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी जे टी पाटील व कबनुर संस्थेचे संस्थापक जयकुमार कोले)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!