May 14, 2026

जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पेर्धेचे विजेतेपद “करवीर” तालुक्याला

0
IMG-20240120-WA0002

जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेत करवीर ”चॅम्पियन, द्वितीय गडहिंग्लज तर तृतीय स्थानावर पन्हाळा

कोल्हापूर/मारुती फाळके

जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे विजेतेपद करवीर तालुक्याने पटकावले असून करवीर तालुक्याने सर्वाधिक क्रीडा प्रकारात यश मिळत अव्वल स्थान पटकावले. द्वितीय गडहिंग्लज व तृतीय क्रमांक पन्हाळा तालुक्याने पटकावला.क्रीडा प्रशाला शिंगणापूर व कोल्हापूर येथील क्रीडा संकुल येथे ३ दिवस या स्पर्धा खिलाडू वातावरणात पार पडल्या.

स्पर्धेचा निकाल –
लहान गट

क्रीडा प्रकार
लहान गट
लांब उडी(मुले )
१. सात्विक लाड(भुदरगड),
२.मयूर मनगुटी (गडहिंग्लज) ३.विघ्नेश मुसे (राधानगरी)

लांब उडी (मुली)
लहान गट
अनुक्रमे सायली हिंदुलकर (करवीर), द्वितीय- दुर्वा वाघ(शाहूवाडी),वैष्णवी दळवी(गडहिंग्लज)

गोळा फेक (मुले-मोठा गट)
१.श्रीवर्धन सुतार (करवीर) २.आयुष पाटील (करवीर) ३.शशांक कांबळे (राधानगरी)

गोळा फेक मुली (मोठा गट)
अनुक्रमे अनुष्का पाटील (करवीर), श्रेया शेळके (कागल), सानिका देवार्डे (शाहूवाडी)

थाळी फेक(मुली) मोठा गट-
अनुक्रमे
जान्हवी चोपदार(पन्हाळा),आर्या तिबिले(राधानगरी),
ऋतिका गावडे (चंदगड)

लांब उडी (मुले-मोठा गट )अनुक्रमे विश्वजीत पाटील (गगनबावडा), पृथ्वीराज चव्हाण (करवीर), समर्थ कांबळे (कागल)

लांब उडी( मुली-मोठा गट)
अनुक्रमे श्रुती संकपाळ (आजरा),
आर्या पाटील (गडहिंग्लज)
गौरी पाटील (पन्हाळा)

कुस्ती
२५ किलो मुले
१.संभव पाटील (पन्हाळा)
२. श्रीतेज मगदूम(कागल)
कुस्ती २५ किलो(मुली)
१.अद्विती फिरंगे (पन्हाळा) २.सर्वेशा पाटील (करवीर)

30 किलो मुले
अनुक्रमे-
अथर्व साळुंखे (करवीर)
कृष्णराज आरडे (पन्हाळा)
30 किलो मुली
प्रणोती पाटील( करवीर),
श्रद्धा माळवे (पन्हाळा)

कुस्ती 35 किलो-मुले
तेजस चेचर (पन्हाळा)
आशुतोष बच्चे (हातकणंगले)
कुस्ती 35 किलो-मुली
आराधना पाटील (हातकणंगले), राजनंदिनी चौगुले (करवीर)

कुस्ती 40 किलो मुले
१. रितेश मगदूम (कागल)
२ शुभम बागडी (हातकणंगले)

कुस्ती 40 किलो मुली
१.प्रणिती साठे (करवीर)
२. मधुरा पाटील (करवीर)

(४५ किलो मुले कुस्ती)
१.समर्थ सावंत (कागल )
२.सोहम मगदूम (करवीर)

कुस्ती ४५ किलो मुली
१.सिद्धी पाटील -शिरोळ
२ आलिक्षा कुराडे -करवीर

कुस्ती ५० किलो मुले

१.ओम खोत( पन्हाळा)
२.वीरेंद्र पाटील (पन्हाळा)

(मुली ५० किलो कुस्ती)
१.साक्षी तराळ (हातकणंगले) २.नम्रता झळके (गडहिंग्लज)

कबड्डी- लहान गट
प्रथम -कागल
द्वितीय- पन्हाळा
कबड्डी लहान गट -मुली
प्रथम – करवीर
द्वितीय- शाहूवाडी

कब्बडी मुले- लहान गट
प्रथम -कागल,
द्वितीय-पन्हाळा

(खो खो लहान गट मुले)
प्रथम-कागल,
द्वितीय- गगनबावडा

(खो खो मुली लहान गट)
प्रथम- करवीर
द्वितीय- गडहिंग्लज

कबड्डी मुले -मोठा गट
प्रथम- शाहूवाडी
द्वितीय -आजरा

(कबड्डी मुली- मोठा गट)प्रथम- गगनबावडा,द्वितीय- राधानगरी

(खो खो मोठा गट मुले)
१.गगनबावडा २.गडहिंग्लज

(खो खो मोठा गट मुली)
१.गडहिंग्लज
२. चंदगड

उंच उडी मुले
१.प्रथमेश सुतार (चंदगड)
२ आर्यन कुदळे (पन्हाळा) ३.विश्वजीत पाटील (गगनबावडा) लहानगट उंच उडी –
१.नितीन जोशी (राधानगरी) २.शिवराज चौगुले (कागल)
३.समर पाटील (शिरोळ)

उंच उडी मुली
१.आराध्या लोहार(हातकणंगले)
२.साक्षी येने चवंडी (गडहिंग्लज)
३.आरती डोणे

ह्या स्पर्धा कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.विजेत्या स्पर्धकांना कोल्हापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर,शिक्षण विस्तार अधिकारी तथा क्रीडा प्रमुख आर. व्ही. कांबळे, बी एन टोनपे,एम आय सुतार,रवींद्र ठोकळ, करवीर चे गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील,महानगरपालिकेचे प्रशासनाधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी एस  के यादव यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

बक्षीस वितरण समारंभाचे प्रास्ताविक शिक्षण विस्ताराधिकारी आर व्ही कांबळे यांनी, सूत्रसंचालन चिदंबर चित्रगार तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी बी एन टोनपे यांनी मानले.

 

जिल्हा क्रीडा स्पर्धेचे नियोजन केंद्रप्रमुख सुरेश कांबळे, के. वाय. कुंभार, चिदंबर चित्रगार, शंकर पाटील, आर. बी.चिंचने यांनी केले.पंच म्हणून के वाय कुंभार, महेश सूर्यवंशी, शिवाजी चौगुले, सयाजी पाटील,एल बी अंगज, एस के मासाळ, सीमा सूर्यवंशी यांनी काम पाहिले.
जिल्हा परिषद शिक्षण विभागातील सरिता वाठारकर,प्रतिभा चिले, प्रतिभा साळोखे, अश्विनी पाटील, दत्तात्रय पाटील,सुरेखा खटावकर,जयकुमार शेळके तसेच विद्यानिकेतन क्रीडा प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा संयोजनासाठी साहाय्य केले.

(फोटो ओळी- कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान स्वीकारताना करवीर तालुक्यातील विद्यार्थी, गटशिक्षणाधिकारी समरजित पाटील,क्रिडा शिक्षक के वाय कुंभार, सुरेश कांबळे, महेंद्र स्वामी,शंकर पाटील,अर्जुन कऱ्हाड, व मार्गदर्शक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!