March 24, 2026

भाजपा कोल्हापूर जिल्हा अनु. जाती पश्चिम ग्रामीण च्या अध्यक्षपदी महेश चौगुले

0
IMG-20240120-WA0060

भाजपा कोल्हापूर जिल्हा अनु जाती पश्चिम ग्रामीण च्या अध्यक्षपदी महेश चौगुले

कोल्हापूर/प्रतिनिधी
भाजपा अनुसूचित जाती कोल्हापूर जिल्हा पश्चिम ग्रामीण च्या अध्यक्षपदी उचगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य महेश तुकाराम चौगुले
यांची निवड करण्यात आली.नुकतेच त्यांना निवडीचे पत्र उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

चौगुले हे गत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपा तून उचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत निवडून आले होते.जिल्हा परिषद सदस्य असताना शासनाच्या सामूहिक व वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांनी लोकांपर्यंत पोहचविल्या आहेत.
समाज कल्याण समितीचे सदस्य म्हणून कार्यरत असताना या विभागाच्या अनेक योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविल्या आहेत.

भारतीय जनता पार्टीचे काम समाजातील तळागाळातील घटकापर्यंत पोहचवून,समस्या सोडवून पक्ष विस्ताराचे काम करण्याची जबाबदारी या निमित्ताने महेश चौगुले यांच्यावर सोपवन्यात आली आहे. महेश चौगुले हे उचगाव येथील भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून गेली कित्येक वर्ष कार्यरत आहेत.

जिल्हा परिषद सदस्यत्वाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक लोकाभिमुख, विकासात्मक कामे मार्गे लावली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भाजपा अनुसूचित जाती कोल्हापूर जिल्हा पश्चिम ग्रामीणच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली.

 

यावेळी भाजपचे संसदरत्न खा. धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक,शाहू ग्रूप चे अध्यक्ष समरजित घाटगे,भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे,भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई
उपस्थित होते.

फोटो ओळी -भाजपा कोल्हापूर जिल्हा अनुसूचित जाती पश्चिम ग्रामीणच्या अध्यक्षपदी निवडीचे पत्र माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चौगुले यांना देताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,सोबत राहुल देसाई,राहुल चिकोडे आदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!