March 24, 2026

नांदगाव शाळेत आठवडी बाजार उत्साहात

0
IMG-20240124-WA0020

नांदगाव शाळेत आठवडी बाजार उत्साहात संपन्न!

बालचमूनी घेतला खरेदी विक्रिचा स्वानुभव.

कोल्हापूर/मारुती फाळके
विद्या मंदिर नांदगाव शाळेत आज आठवडी बाजार व खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या भाज्या तसेच खाद्यपदार्थ यांची विक्री करून खरेदी विक्रीचा स्व अनुभव घेतला बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी नांदगाव व नांदगावच्या परिसरातील ग्रामस्थ पालक व विद्यार्थी यांनी गर्दी केली होती. आबाल वृद्धाने या ठिकाणी खरेदीचा मनसोक्त आनंद घेतला.

खाद्य महोत्सवामध्ये चटकदार बिर्याणी चमचमीत मिसळ पाणीपुरी पॅटीस आंबोळी वडापाव इडली आप्पे डोसा भेळ समोसा या पदार्थांचे रेलचेल होती.. तसेच भाजीपाला मध्ये,मेथी,पोकळा,मुळा, कोंथिबीर चाकवत,घेवड्याच्या शेंगा विक्रिसाठी उपलब्ध होत्या.सर्वाधिक विक्री कोल्हापुरी प्रसिद्ध मिसळ ची झाली.चिकन बिर्याणी वर ही खवय्यांनी ताव मारला.

आठवडी बाजार व खाद्य महोत्सवाचे फीत कापून उद्घाटन गावातील ज्येष्ठ नागरिक श्रीपती गुरव यांनी केले यावेळी सोनुर्ले केंद्रातील शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.
आठवडी बाजारास शिवगर्जना फौंडेशनचे दिगंबर चव्हाण यांनी भेट देऊन शाळेने घेतलेल्या या उपक्रमांचे कौतुक करून व्यवहारी ज्ञान वाढवण्यासाठी व खरेदी विक्रिचा स्वानुभव घेण्यासाठी असले उपक्रम दिशादर्शक ठरतात यासाठी आठवडी बाजार व खाद्य महोत्सव सारखे उपक्रम प्रत्येक शाळांनी आयोजित केले पाहिजेत असे मत व्यक्त केले.
आठवडी बाजार व खाद्य महोत्सव यशस्वी करण्यासाठी नांदगाव ग्रामस्थ,पालक, विद्यार्थी तसेच शाळेतील शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!