अमर परीट यांना शब्दमंथन साहित्य समूहाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
अमर परीट यांना शब्दमंथन साहित्य समूहाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
कोल्हापूर /मारुती फाळके
अखिल भारतीय शब्दमंथन साहित्य समूह वाळवे खुर्द ता.कागल यांच्या वतीने देण्यात येणारा डॉ. रविराज आसबे स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार तांदूळवाडी ता.पन्हाळा येथील पुरस्कार उपक्रमशील शिक्षक अमर परीट यांना नुकताच साहित्यिक डॉ. श्रीकांत पाटील, साहित्य परिषदेचे कार्यवाह राजन मुठाणे, गटशिक्षणाधिकारी गणपती कमळकर, साहित्यिक परशराम आंबी,तानाजी आसबे,नसीम जमादार,राहुल कुंभार,संगीता बोडके आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अमर परीट हे उपक्रमशील शिक्षक असून नोकरीच्या सुरवातीच्या काळात लोकविकास निधीतून जागा उपलब्ध करून गृहिणी ता.भोर जि.पुणे येथे आदर्श शाळा उभारून नावलौकिक मिळवला.शैक्षणिक गुणवत्ता,शिष्यवृत्ती, शाळाविकास, स्नेहसंमेलन,बालआनंद मेळावा यामध्ये भरीव कामगिरी केली आहे .जिल्हास्तरापर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेतील अनेक खेळाडू घडवले आहेत.
सध्या ते विद्यामंदिर तांदुळवाडी ता. पन्हाळा येथे कार्यरत असून विविध प्रशिक्षणातून त्यांनी मार्गदर्शक, सुलभक म्हणून काम केले आहे .जिल्हास्तरावर शैक्षणिक प्रदर्शन, कला, कार्यानुभव विषयातील नवोपक्रम,घरे बनलीत प्रयोगशाळा,कृतीयुक्त उपक्रमातून शिक्षण हे त्यांचे गाजलेले शैक्षणिक उपक्रम आहेत. “घरे बनलीत प्रयोगशाळा” या उपक्रमासाठी त्यांना “सर फाउंडेशन कोल्हापूर” यांच्या वतीने प्रथम क्रमांक देण्यात आला होता.
आजवर त्यांना प. स. भोर शिक्षण विभाग यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार,कोविड 19 मध्ये ऑनलाईन व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल थँक्यू टीचर अभियान अंतर्गत आदर्श शिक्षक पुरस्कार, शाहूवाडी येथील शिव शाहू फाऊंडेशनचा चा सुपर थर्टी आदर्श शिक्षक पुरस्कार, पुरस्कार प्राप्त आहेत.
शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती, सांस्कृतिक कार्यक्रम, व्हाट्सअप द्वारे विविध शैक्षणिक उपक्रमांचे प्रसारण, स्वतःचे शैक्षणिक यूट्यूब चॅनेल यामधून ते सतत शैक्षणिक कृतीसाठी कार्यप्रवण असतात. अमर परिट यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
(फोटो ओळी -तांदुळवाडी ता. पन्हाळा या जिल्हा परिषदेच्या शाळेतील उपक्रमशील शिक्षक अमर परीट यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करताना राजन मुठाणे, डॉ. श्रीकांत पाटील, गणपती कमळकर, तानाजी आसबे, परशुराम आंबी, नसीम जमादार, संगीता बोडके, राहुल कुंभार आदी.)










