March 24, 2026

उजळाईवाडी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी नायकु बागणे

0
IMG-20240130-WA0032

उजळाईवाडी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी नायकु बागणे

उजळाईवाडी/ मारुती फाळके

उजळाईवाडी ता. करवीर येथील ग्रामपंचायत तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी नायकु बळवंत बागणे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. निवड समितीच्या अध्यक्षपदी लोकनियुक्त सरपंच उत्तम आंबवडे होते. यावेळी उपसरपंच चंदा माने ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष सचिन पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नव्याने समिती स्थापन होऊन अध्यक्षाची निवड करण्यात आली.

        यापूर्वी देखील नायकु बागणे यांनी तंटामुक्त अध्यक्ष म्हणून प्रभावी कामकाज केले आहे.बागणे यांच्या निवडीनंतर ग्रामस्थ,ज्येष्ठ कार्यकर्ते, क्रांती तरुण मंडळ,गावातील विविध सामाजिक तरुण मंडळ यांनी एकच जल्लोष केला.बागणे हे आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील गटाचे निकटवर्तीय कार्यकर्ते व गावातील प्रमुख कार्यकर्ते आहेत.,त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या निवडीवेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप माने, मेघा गुमाने, सारिका माने,पोपट नाईक, सोनाली मजगे, विलास कुंभार, माधुरी दळवी, प्रतिभा पवार, अशोक लांडगे, चंदू पंडित, बुलगानीन कांबळे, विनायक बागणे,भाग्यश्री पारके, प्रकाश पाटील, शिल्पा हजारे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!