March 24, 2026

उजळाईवाडी ग्रामपंचायतीचे  महिलांसाठीचे उपक्रम दिशादर्शक: सरपंच उत्तम आंबवडे

0
IMG-20240205-WA0024

उजळाईवाडी ग्रामपंचायतीचे  महिलांसाठीचे उपक्रम दिशादर्शक: सरपंच उत्तम आंबवडे

महिलांनी लुटला बक्षिसांचा आनंदोत्सव

उजळाईवाडी/मारुती फाळके

उजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात येणारे महिलांसाठीचे उपक्रम दिशादर्शक आहेत. कुटुंबाची सामाजिक जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच उत्तम आंबवडे यांनी दिली.उजळाईवाडी ग्रामपंचायत वतीने घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर व मकर संक्रात कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या निमित्याने महिलांची लक्षणीय गर्दी बघायला मिळाली.  होम मिनिस्टर स्पर्धेतील आकर्षक बक्षिसांमुळे महिलांनी सभागृह तुडुंब भरले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच स्मिता आंबवडे व लोकनियुक्त सरपंच उत्तम आंबवडे, उपसरपंच चंदा माने यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात मानाची पैठणी व रेफ्रिरेटर प्रथक क्रमांकाच्या अंकिता मंहिंद यांनी जिंकली. द्वितीय क्रमांक वैष्णवी डोंगळे यांनी कुलर, तर तृतीय क्रमांक किरण गुमाने मिक्सर जिंकला या बरोबर उतेजनार्थ क्रमांक संगीता पाटील , श्रेया पोटे, योगिता सुतार, हेमा कळमकर, सुष्मा हिरुगडे, सरिता केसरकर, ललिता नाईक, यांनी बक्षिसे मिळवली,

या कार्यक्रमासाठी तंटामुक्ती अध्यक्ष नायकु बागणे, अशोक लांडगे, बुलगाणीन कांबळे, प्रतिभा पोवार, भाग्यश्री पारखे, सारिका माने, डॉ शिल्पा हजारे, सोनाली मजगे, मेघा गुमाणे,सुचिता सुर्यवंशी, माधुरी दळवी,संदीप माने, विलास कुंभार, पोप ट नाईक, प्रकाश पाटील, चंद्रकांत पंडित, विनायक बागणे, यांच्यासह महिला मोठ्या प्रमाणात हजर होत्या. या स्पर्धेसाठी उद्योजक संदीप पोवार, रविंद्र माने, अभिजीत माने, जयश्री बागणे, यांचे सहकार्य लाभले

(फोटो ओळी.उजळाईवाडी ग्रामपंचायत वतीने घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर व मकर संक्रात कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना सरपंच उत्तम आंबवडे व समोर उपस्थित महिला.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!